सप्तरन्गी बिझीनेस ग्रुप

Submitted by कविता१९७८ on 11 October, 2015 - 11:19

नमस्कार,

आम्ही नुकताच सप्तरंगी नावाचा बिझिनेस गृप सुरु केलाय. वेगवेगळ्या ठीकाणावर घरगुती व्यवसाय करणार्‍या महीलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा या दृष्टीने या गृपकडुन प्रयत्न केला जातोय. या ग्रुप मधे असणार्‍या प्रत्येकीने आपली आणि ग्रुप मधल्या दुसर्‍या प्रत्येकीच्या व्यवसायाची जाहीरात आपल्या व्हॉटस अ‍ॅप आणि फेसबुक फ्रेंड सर्कल मधे करुन नेटवर्क वाढवायचं अशी आयडीया आहे.

या ग्रुप मधे प्रवेश घेण्यासाठी वय, धर्म, जात, ठीकाण, व्यवसायाचे स्वरुप अशी कुठलीही अट नाही फक्त तो व्यवसाय ती महीला एकटी किंवा भागिदारीत करत असली तरीही चालेल पण स्वतःचा असावा (आपले भाउ बहीण, वडील, नवरा, अन्य नातेवाईक यांचा असु नये त्यासाठी त्यांनीच गृप मधे प्रवेश घेण्यास हरकत नाही) पण दुसर्‍यांचा पोस्टस ही शेअर करणं हे अपेक्षित आहे भले ही आपला व्यवसाय आणि दुसर्‍या मैत्रीणीचा व्यवसाय सेम असेल.

वेगळ्या वेगळ्या ठीकाणी एक्झिबिशन लावण्याच्या दृष्टीने देखील या ग्रुप मधे विचार केला जातोय.

कुणाला इंटरेस्ट असेल तर विपु करा.

मायबोलीकर कविता१९७८
मायबोलीकर कविन

===============
FB Link - https://m.facebook.com/groups/1494319160862389?ref=bookmarks
============

(फेसबुक ग्रुपात प्रवेश घेण्यासाठी प्रथम व्हाॅटसअॅप ग्रुपात प्रवेश आवश्यक)

प्रवेशासाठी आणि कुठल्याही प्रकारची फी किंवा पैसे गृपकडुन आकारले जाणार नाहीत . ग्रुपचा उद्देश फक्त नेटवर्कींग वाढवणं हा आहे.

सध्या गृप मधे पुढील व्यवसाय करणार्‍या मैत्रीणी आहेत.

१] दिवाळीचे फराळ करणार्‍या - स्थळ - फलटण
२] म्युचुअल फंड कंसल्टंट - स्थळ - पुणे
३] ड्रेस मटेरीयल , साड्या विकणार्‍या - स्थळ - मुंबई , पुणे
४] ज्वेलरी - स्थळ - मुबंई , डोंबिवली , पुणे
५] पर्स्नल स्टायलिस्ट स्थळ - ठाणे
६] हस्तकला वस्तु - स्थळ - मुंबई , पुणे
७] केक क्लास घेणार्‍या - स्थळ - डोंम्बिवली
८] भाजणी , तयार पीठ विकणार्‍या - स्थळ - ठाणे
९] अ‍ॅमवे स्कीन एक्सपर्ट - स्थळ - पुणे
१०] एक्झिबिशन ईवेंट करणार्‍या - स्थळ - नाशिक
११] घरगुती जेवण - स्थळ - नरसोबाची वाडी
१२] फोटोग्राफर — पुणे
१३] मोदी केअर प्रोडक्टस — पुणे
१४] कापडी व लेदर हॅंडबॅग्ज स्वत: शिवुन विकणार्‍या — चिपळुण , पुणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

..

एका प्रेरणेनं काम करणार्‍या स्त्रियांनी एकत्र येऊन एकमेकींना मदत करत पुढे जाण्यासाठी टाकलेलं हे पाऊल फार भावलं. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा!

सगळ्यांना मनापासुन शुभेच्छा.

कस्टमर्सना या ग्रुपपैकी कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कुठे करायचा? + १

शुभेच्छांकरीता मनापासून धन्यवाद!

चैत्रगंधा आणि नताशा, फेसबूक वर "सप्तरंगी" हा गृप "पब्लीक" आहे. तिथे दर आठवड्याला "विकली बझार (-डेट-)" या नावाने एक अल्बम रिलीझ होईल. त्या अल्बम मधे त्या आठवड्यातल्या विक्रिच्या वस्तूंचे फोटो, किमती व ते विकणारीचा संपर्क क्र./इमेल आयडी इ. दिलेलं असेल. आधीच्या आठवड्यातल्या वस्तूंही विक्री साठी अवेलेबल असतीलच.

ग्रूप फॉलो करत राहीलात तर नविन आलेले अल्बम पण दिसत रहातील.

सध्या तरी ही कल्पना राबवून कशी वर्क आऊट होतेय ते बघून त्यात पुढे गरज पडतील तसे बदल होत जातील

सगळ्यांना खुप खुप शुभेच्छा. चांगला उपक्रम आहे. लवकरच प्रदर्शन लावा आता दिवाळीच्या आधी लावलेत तर चांगला रिस्पॉन्स मिळेल.

सगळ्यांना शुभेच्छा...

रेडिमेड टी-शर्ट, मेड टू ऑर्डर टी-शर्ट, टोप्या - स्ठळ- पुणे.

वरच्या लिस्ट मध्ये अ‍ॅड करा.. कोणीतरी विपूतून संपर्क करा म्हणजे मी डिटेल्स कळवतो.

कविता तुला मनापासुन भरपूर शुभेच्छा. अग पण मी आणी माझ्या दोन्ही मैत्रिणी फेसबुक वा वॉटस अप वापरतच नाही/ वापरणार पण नाही. मग मायबोलीवर लिन्क दे की जमल्यास. फोन न. वगैरे नको देऊन जोपर्यन्त खात्री पटत नाही.