मला फायद्याचे समजतात घाटे!

Submitted by सत्यजित... on 10 October, 2015 - 08:51

कधी पाश तोडू..मनी जिद्द दाटे...
कधी बंधनातच सुरक्षीत वाटे!

हिशोबात माझ्या बसेनाच दुनिया...
मला फायद्याचे समजतात घाटे!

बदलली दिशा की सरे श्रेय सारे...
इथे दान असते रवीला पहाटे!

दिशा शोधता ही..दशा प्राप्त झाली...
अता टोचणेही विसरलेत काटे!

कुणाला कुणाची कुठे काय चिंता?
अरे काळजाचे करावेत वाटे!

अशी वाट शोधा तरी पावलांनो...
जिला अंत नाही,फुटेनात फाटे!
—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही अतिशय उत्तम गझल आहे. अधिक साफसुथरी शब्दरचना शक्य होती की कसे ह्याचा विचार व्हावा. तसेच, शीर्षक ओळीत (मला फायद्याचे कळेनात घाटे) कळेनात ऐवजी 'समजतात' घेतले असते तर शेर खोल झाला असता. (हे दुरुस्ती सुचवणे नव्हे, कृ गै न).

गझल आवडली.

>>>बदलली दिशा की सरे श्रेय सारे...
इथे दान असते रवीला पहाटे!<<< व्वा

बेफी सर...
काय बोलू?
आपण सुचवलेल्या बदलांसह,शब्दरचनेबद्दलच्या सूचनेस अनुसरुनही काही बदल केले आहेत!
आभारही काय मानू?
कायम ॠणी...
सत्यजित...

Chaan gazal... Are vah apan doghehi Satyajit.. Happy

Tumache maaybolivar swagat..!!!

मनःपूर्वक धन्यवाद सत्यजित!
आनंदाची बाब ती अशी की...आयुष्याचे रंग 'प्रिझम'च्या मदतीने वेगळे उलगडून पाहण्याचा आपला दोघांचाही छंद!