हातोडी

Submitted by जे.डी._भुसारे@y... on 31 January, 2009 - 13:26

(केशवसुतांची क्षमा मागून हे विडंबन लिहीले आहे.)

एक हातोडी द्या मज आणूनि.
प्रहार करीन प्राणपणाने.
घण घण वाजे घुमेल गाने.
मस्त तिच्या त्या फटकार्‍याने.
अशी हातोडी द्या मजलागुनि.

भ्रष्ट यंत्रणा छेदून जाईन.
पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण.
नाठाळाना शोधुन काढीन.
घाव त्यंच्या मस्तकी घालीन.
कोण हातोडी मजला देईल?

खुजे पुढारी सत्तेवर बसले.
राज्य शकट हाकतील कसले.
असे दृष्य जर का दिसले.
फोडून टाकीन सिंहासन तसले.
अशी हातोडी द्या तर मजला.

हातोडीस त्या दणकट दांडा.
छिन्न विछीन्न करील गुंडा.
धजेल का मग कोणी बंडा.
तिच्या किर्तीचा फडकेल झेंडा.
अशी हतोडी हवी एकतरी.

नव्या मनुच्या हाती हातोडा.
मंदिर मस्जिद अवघे पाडा.
त्या जागेवर धर्मही गाडा.
मानवतेचा पळवा गाडा.
नको तुतारी हवा हातोडा.

गुलमोहर: 

जे.बी. क्षमस्व..पण ही रचना तुम्ही कविता या सदरातदेखील टाकली आहे. एकच रचना दोन दोन ठिकाणी कशाला?
चु.भु.दे.घे. Happy

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

होय पण विडंबन विभागात एवढी वर्दळ नसते हे लक्षात आल्या नंतर कविता विभागात वरील कविता टाकली आहे.
जे.डी भुसारे

तुम्हाला गर्दी नको आहे का? माझी एक गर्दी वरील कविता लिहिते एक दोन दिवसात.

अलका,
'गर्दी' वाचली फारच छान.
जे.डी. भुसारे

छान रचना आहे. शरद

यंत्रना....... यंत्रणा हवे का? कविता/विडंबन चांगलेय

पल्ली,
होय 'यंत्रणा' प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद!

जे.डी. भुसारे