टेंपल सिटी - चिंग माय

Submitted by वर्षू. on 6 October, 2015 - 23:01

थायलँड मधे कोणत्याही शहरात फिरा, जिकडे तिकडे लहान , मोठी मंदिरे विखुरलेली
दिसतात. आत अर्थातच बुद्ध प्रतिमा स्थापित असते. थाय लोकं भलतेच भाविक!! त्यांच्या घरासमोर, सर्व सरकारी कार्यालयांसमोर, रस्त्यांच्या किनार्‍यावर, इतकचं नव्हे तर अगदी हॉटेल्स, नाईट बार इ, समोरही उदबत्त्या , मोगर्‍या चे कलात्मक गजरे लावून सुशोभित केलेले लहानसे लाकडी मंदीर असतेच . समोर ठेवलेल्या लहान लहान वाडग्यांतून भात, पाणी , सामिष, निरामिष भोजन ही नैवेद्य म्हणून ठेवलेले असते.
चिंगमाय ला टेंपल सिटी म्हणण्याचे कारण म्हणजे या जेमतेम दोन लाख लोकवस्ती असलेल्या शहरात जवळपास
तीनेकशे देवळे आहेत. लहान, मोठी,भव्य, नवीन, जुनी, अँटीक .. शरातून फेरफटका मारताना कोणत्याही गल्ली बोळात डोकावल्यास मंदिर दिसतेच.
त्यापैकी काही महत्वाची मंदिरे

१ चेडी लुवांग -

१४०१ मधे विटांनी बांधलेल्या या विशाल मंदीराची , १५४५ मधे आलेल्या भूकंपामुळे बरीच पडझड झाली होती. बांधकाम थोडं कमजोर असल्याने इथे वर चढायला मनाई आहे.
आज ही विविध धार्मिक उत्सव , या मंदिरा च्या पटागणांत साजरे केले जातात.

२- फ्रा सिंग टेंपल

१३४५ मधे मंगराय डायनेस्टी च्या फा यू राजाने, आपल्या पित्याच्या अस्थी जतन करून ठेवण्याकरता हे मंदीर बांधले

३- फान ताओ टेम्पल

४- राजा मोंतेआनटीस्रीबूम टेंपल - हे मॉडर्न काळातलं

५- १०० वर्षं जुनं फुंग थाओ अ‍ॅनसेस्ट्रल चायनीज टेंपल..
चीनी व्यापारी इथे आल्यावर त्यांनी ही आपली धार्मिक सोय करून घेतली

६- बर्मीज टेंपल
रस्त्यावरून चालताना अचानक हे देऊळ दिसलं. उत्सुकतेने आत शिरल्यावर एक कम्युनिटी हॉल लागला. त्यात काही चिल्लीपिल्ली अभ्यास करताना दिसली.रविवार असल्याने शाळेला सुट्टी होती. त्यांना थाय भाषा शिकवण्याकरता क्लास घेतला जात होता.
पुढे देऊळ.. देवळाची, हॉल ची , पटांगणाची अवस्था यथातथाच दिसली, जणू काही म्यांमार चं प्रतिनिधित्वच करत असलेली.. काही लोकं ही दिसले. त्यांच्याशी मोडक्या थाय भाषेत बोलताना कळले कि या लोकांचे वंशज शंभरेक वर्षांपूर्वी बर्मातून पळून येऊन इथे स्थायिक झालेले आहेत. अजून ही रेफ्यूजीज येतच असतात. त्यांना थाय सरकार आश्रय देत असते.

तिथे भेटलेली गोडुली बर्मीज चिल्लीपिल्ली

अजूनही काही आवडलेली मंदिरे.. येथील थाय मंदिरांतून आपला गणपती बाप्पा जातीने हजर दिसला. पण त्याचे स्थान देवळा बाहेर, प्रवेश द्वारा पाशी..

लास्ट बट नॉट द लीस्ट.. Happy

कोंबडे महाराजांचं देऊळ

रस्त्याच्या किनार्‍यावर , रूंद फुटपाथ च्या मागे व्यवस्थित चबुतरा वगैरे बांधून एक चिटुकल लाकडी देऊळ आहे हे !! देवळाबाहेर रक्षणकर्ते दोन कोंबडे तर आत कोंबड्याच्या लहान मोठ्या लाकडी फिगर्स.. काही लोकं ही
भक्तीभावाने देवळाबाहेर नैवेद्य ठेवत होते तर काही डोळे मिटून , उदबत्त्या हातात घेऊन मनोभावे काहीबाही म्हणत होते.. इथे इच्छा पुरी होण्याकरता नवस बोलला जातो , मग नवस फेडायला इथे कोंबडे अर्पण केले जातात. म्हंजे कोंबड्याला , कोंबड्याचाच नैवेद्य.. गम्मत्तै कि नै!!

सकाळच्या वेळी गजबजलेल्या भाजी बाजारांसमोर हे दृष्य नियमीत रुपाने दिसत असते. आसपास च्या देवळांतून लहान्,थोर्,वृद्ध माँक्स हातात पितळी भांडी घेऊन भिक्षा मागायला इथे येऊन उभे राहतात. प्रत्येक दुकानदार, ग्राहक त्यांच्या झोळीत काही ना काही धान्य,फुलं, फळं, मांस मच्छी,सॉफ्ट ड्रिंक्स अर्पण करत असतात. मग त्यांच्या समोर गुडघे टेकून बसतात मग माँक्स त्यांच्या करता मंत्रोच्चार करत आशिर्वाद देतात.
सगळं वातावरण एक प्रकारे पवित्र ,निर्मळ होऊन जातं..

अजून काही गम्मत जम्मत पुढील भागात...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! खुप सुंदर आहे.
प्रत्येक दुकानदार, ग्राहक त्यांच्या झोळीत काही ना काही धान्य,फुलं, फळं, मांस मच्छी,सॉफ्ट ड्रिंक्स अर्पण करत असतात.
किती छान!

१७ नंबरच्या फोटोत माकड की कुत्रे काहीतरी आहे. ते खरे आहे की खोटे ?

पुढचे दार राखायला गणपती आणि मागचे राखायला हनुमान का ?

वर्षुताई, सगळी देवळं मस्त आहेत. किती कलाकुसर!

मंत्रांच्या बदल्यात सॉफ्ट्ड्रिंक ... Lol

तो 'फिट' गणपतीबाप्पा मस्त.

कोंबडे महाराज ... Biggrin

हनुमान नाही दिसला..
हाँ तो प्राणी कुत्रा आहे.. म्हंजे कुत्र्याचा पुतळा आहे.. एका देवळा च्या सराउंडिग मधे गाई,बैल्,माकड्,कुत्रे,ड्रॅगन, साप असे नुसते सर्वच प्राण्यांचे पुतळे होते. अ‍ॅड करते इथे नंतर..कलेक्शन मधे शोधावे लागतील

वर्षू नील, सर्वप्रथम, तुमच्या या जगप्रवासातील विविध दृष्य अनुभव फोटोंद्वारे इथे दिसतील असे शेअर करीत असल्याबद्दल आभार. Happy
हा भाग तर मंदिरांमुळे फारच आवडला.
मॉक्स जे करतात, ते बरेचसे आपल्या इकडच्या "माधुकरी" सारखेच आहे, फक्त कालौघात आपल्याइकडे ति प्रथा लुप्त होत चाललीये/झालीये व कुठे कुठे थोडेफार अवशेषच शिल्लक दिसतात. तिकडे अजुन इकडच्या सारखे बुप्रा/कम्युनिस्ट पोहोचलेले दिसत नाहीत Wink नैतर या मॉक्सचा हा "बामणी कावा" असे बोंबलायला कमी करणार नाहीत Proud

मस्त आहेत देवळं Happy
कोंबडे महाराज >> असंच एक कोल्ह्याचं (! म्हणजे तो बहुतेक कोल्हाच होता Wink नक्की कळायला मार्ग नाही ) देऊळ आणि एक मांजरींच देऊळ मी पाहीलं होतं एकदा!

@ गिरीश, बाप्पा इकडे द्विभुजीच दिसतो, क्वचित चार हात वाला ही दिसतो. गणेशाचं थाय नाव आहे,' फ्रा फिकानेसुवान' .. इथेही बुद्धी,समृद्धी चे प्रतीक आणी विघ्नहर्ता म्हणूनच पुजला जातो. थाय ललित कलेचे मानचिन्ह म्हणून ही. बुद्धिस्ट आणी हिंदू कॉस्मोलॉजी च्या झालेल्या ओवर लॅपिंग मुळे बाप्पा ला इथे मान मिळाला असावा,,

खुप सुंदर.. थाई कलाकुसर म्हणजे अप्रतिमच असते.. मग ते बांधकाम असो कि फुड कार्व्हींग असो.

वर्षू,
फारच सुंदर देवळं आहेत ही. फोटोही ही अगदी छान घेतलेयस.
लहानपणी माझ्याकडे एक पुस्तक होत 'आजचे जपान' नावाचं. त्यात असे फोटो होते देवळांचे. त्यातली ती देवळं आणि हिरवागार निसर्ग मला फार आवडायचा. अगदी जीवापाड जपलं होतं ते पुस्तक. त्याची आठवण झाली.
धन्यवाद Happy

वाह, फारच सुंदर. वेगळ्याच ठिकाणाची माहिती आणि फोटो. खूप आवडले.
पुढील भागाची खूप उत्सुकता आहे.

छानच भाग वर्षू..
कसली बारीक कलाकुसर आहे सर्वच मंदीरांवर.. फ्रू हॅण्ड एकदम..
परिसर सुद्धा खुप खुप स्वच्छ आहेत..
बाप्पा छानच..पण त्याला असं बाहेर ठेवतात..एवढ गोडूला तो तरी..

Pages