सूर्याचे कारकत्व आणि कुंडलीतील त्याचे "स्थान" आणि महत्व!

Submitted by निमिष_सोनार on 1 October, 2015 - 05:29

सूर्य कोणत्या गोष्टींचा कारक असतो? तो उच्चीचा आणि निचीचा तसेच कुंडलीतल्या स्थानानुसार आणि इतर ग्रहांच्या युतीनुसार काय फळ देतो? सूर्यांच्या राशी ज्या स्थानात आहेत त्याचे फल काय?

सूर्य कुंभ राशीत बाराव्या स्थानी असेल तर काय फळ मिळेल?
सूर्य मेष राशीत चौथ्या स्थानी राहू आणि बुधा बरोबर असेल तर काय फळ मिळते?
सूर्य वृषभ राशीत मंगळ बुधासोबत अष्टम स्थानी असेल तर काय फळ मिळते?
सूर्य मकर राशीत बुधासोबत द्वितीय स्थानी असेल तर काय फळ मिळते?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निमिषभाउ, या प्रश्नांची उत्तरे ज्योतिषाशास्त्रावरील पुस्तकातुन मिळतात हो....
जसे की प्रत्येक ग्रहाचे बारा राशीतील फल, बारा स्थानातील फल, प्रत्येक स्थान स्वामीचे बाकी स्थानात फल, बाकी राशित फल, निरनिराळ्या ग्रहजोड्यांची फले इत्यादी इत्यादी...... हजारएक पानी ग्रंथ होतात या माहितीचे....
तुमचे नेमके प्रयोजन काय आहे हे प्रश्न इथे विचारण्याचे?

>>>> प्रायोजनः लाईव्ह नॉलेज शेअरिंग <<<< ओके तसे अन तेव्हडेच असेल तर ठीक आहे.

मायबोलीवरील जाणकार अधिक चांगले भाष्य करतीलच, पण तोवर माझी दोन पाने.
(चूकला तर तो व्यक्तिशः लिम्ब्या चूक असेल अभ्यासात, ज्योतिष शास्त्र नव्हे)

>>>>>> सूर्य कोणत्या गोष्टींचा कारक असतो? <<<<<<
आत्म्याचा, तेजाचा, प्रतिष्ठेचा, कर्तुमकर्तुमशक्तिचा, मानापमानाचा, अस्मितेचा, अहंभावाचा, शिस्तशीरतेचा, हुकुमशाहीचा, स्तुतिप्रिय ( दानी पण तार्किक अंधत्वाचा - हे माझे निदान)

>>>>> तो उच्चीचा आणि निचीचा तसेच कुंडलीतल्या स्थानानुसार आणि इतर ग्रहांच्या युतीनुसार काय फळ देतो? <<<<<
याचे उत्तराकरता आख्खे पुस्तक लिहावे लागेल. पण प्रथम प्रश्नातील तत्व विचारात घेतले असता याचे उत्तर मिळत जाते, जसे की,
उच्चीचा असेल, तर वर उल्लेखिलेल्या बाबी आत्यंतीक प्रखरतेने अनुभवायास येतिल. जातक कुठेही कोणत्याही समाजात जन्मलेला असुदे, त्यास मानापमान, श्रेष्थत्व मिळेलच. नीचेचा (तुळेचा) असेल, तर नेमकी याच बाबतीत कमसरता दिसेल, लायकी असुनही प्रतिष्ठा मिळण्यास अवघड असेल, बिनलायकिच्या लोकांच्या हाताखाली वावरावे लागेल इत्यादी.
ग्रहांच्या युतिबाबत त्या त्या ग्रहाच्या कारकत्वात रवि वरिल गुणांची भर घालेल.

>>>>>> सूर्यांच्या राशी ज्या स्थानात आहेत त्याचे फल काय? <<<<<
अग बाबोऽऽ पुस्तक रेफेर करा हो......
तरी मार्गदर्शक तत्व म्हणुन सांगतो की जे ग्रहांच्या युतिबाबत तेच स्थानाच्या फलाबाबतही, त्या त्या स्थानाचे फलात वरील कारकत्वाची भर घालेल. उदा. प्रथमात असेल, तर हुकुमशाहा (जातकाच्या मर्यादित चौकटित/विश्वात) असेल, व त्याचे पुढे अन्य कोणाचे काही चालणार नाही.
रवि स्वभावतः क्रुर ग्रहच मानला गेला आहे. त्यामुळे ज्या स्थानकांच्या कारकत्वात सौम्यता/नाजुकपणा/प्रेमळपणा आवश्यक आहे, तिथे रविची फळे विचित्र अनुभवास येतात. जसे की चतुर्थ स्थानात असता, एकतर घराबाबत अडचणी असु शकतात किंवा मातेबाबत काही प्रश्न, जसे की माता कठोर असणे इत्यादी.

>>>>>> सूर्य कुंभ राशीत बाराव्या स्थानी असेल तर काय फळ मिळेल? <<<<<<
मूळात बाराव्या स्थानी असलेला ग्रह साधारणतः जातकास जन्मगाव/ठिकाणापासून दूरवर भिरकावतो, आम्ही आपले जातकास म्हणतो की परदेशगमनाचा योग आहे हो नशिबात.... अन लगेच सांगुनही टाकतो की परदेश याचा अर्थ "पंचक्रोशीच्या" बाहेर असा घ्यायचा बर का. Wink
कुंभेचा रवि बाराव्या स्थानकात जातकास निवृत्तीमार्गाकडे वळवील. मूलतः स्वभाव दानी असेल. परोपकारात पुढे असेल, मात्र हे करताना स्वतःच्याच घरादाराकडे/मुलाबायकोकडे दुर्लक्ष होऊ शकेल.

>>>>>> सूर्य मेष राशीत चौथ्या स्थानी राहू आणि बुधा बरोबर असेल तर काय फळ मिळते? <<<<<<
महाशय, असे एकेकटे फल सांगणे ज्योतिषास संमत नाही, कारण तुम्ही कुठेतरी कुणाची तरी कुंडली बघुन काहीएक पूर्वग्रह मनाशी धरुन हे असे प्रश्न विचारित असाल तर अशा प्रश्नांची उत्तरे तुमचेच नुकसान करु शकतात कारण वरील प्रश्नास असलेले उत्तर जर प्रथम्/सप्तम/११/५ या स्थानी इतर ग्रह असता बर्‍याच प्रमाणात बदलेल. म्हणुन निव्वळ एक ग्रह एका ठिकाणी काय फळ देतो हे समजुन घेण्यापेक्षा समग्र कुम्डली, बारा स्थाने, नऊ ग्रह व गोचर यांचा विचार करावा लागेल. वरवर पहाता उत्तर देणे सहज शक्य आहे पण मी ते टाळतो आहे. फक्त एक क्ल्यु देतो की राहू जिथे जिथे असतो, तिथे तिथे त्या त्या स्थानाचे, ग्रहाबरोबर असेल तर ग्रहाचे कारकत्वात विचित्रपणे वाढ करतो, तर नेमके उलट केतु जिथे असेल, तिथे तो ते ते कारकत्व संपुष्टात आणु पहातो. या अर्थाने वरील स्थितीचे उत्तर देणे गंभीर असल्याने देत नाहीये.

>>>>>> सूर्य वृषभ राशीत मंगळ बुधासोबत अष्टम स्थानी असेल तर काय फळ मिळते? <<<<<
यासही वरील सारखेच कारण..... स्थिती विचित्र अस्ल्याने असे एकेरी स्थितीवर आधारित उत्तर देता येत नाही. देता येत नाही म्हणजे "लिहीणे अयोग्य", उत्तर कळलेले असते, लिहून चालत नाही. तरिही एक क्ल्यु देतो की सप्तमेश अष्टमात ही स्थिती जोडीदाराबाबत तितकिशी चांगली मानली जात नाही. मात्र मंगळ आहे, व लाभेश अष्टमात याचा अर्थ जमिनजुमला/स्थावर (कदाचित वारसा हक्काने) नक्कीच असायला हवी.

>>>>> सूर्य मकर राशीत बुधासोबत द्वितीय स्थानी असेल तर काय फळ मिळते? <<<<<
मर्यादित फटकळपणा. अबोलता हा मकरेचा गुण पण रवि ताडकनि बोलायला भाग पाडेल. एरवी अबोल शांत भासणारी व्यक्ति कणखरपणे उलट उत्तर देताना पाहुन इतरांना आश्चर्य वाटेल.
भाग्येश रवि द्वितियात धन भरपुर देईल, पण रवीचे मूळचे दानी गुणांविपरित मकरेमुळे व बुधाचे सानिध्यामुळे अनाकलनीय कंजुषीही देईल.

अर्थातच वरील विवेचन एकतर्फी, पूर्ण कुंडली शिवायचे असल्याने "विदाऊट प्रिज्युडाईज" असे माझे वरील मजकुर असे. हा डिस्क्लेमर दिला असे.

शुभंभवतु.

अरे धागाकर्ते कुठे गेले? त्यांचे समाधान झाले वा नाही? कसे कळणार? (की त्याकर्ताही "प्रश्न कुंडली " काढून बघु??? Wink )

धागाकर्ता कुठेही जावो सूर्याची फले शोधायला, limbutimbu -उत्तर आवडले .
मेषेचा रवि आणि तुळेचा रविवाले ( ५८नंतर) काय करतात?
पहिला आराम करतो आणि दुसरा उट्ट काढतो.

>>>> पहिला आराम करतो आणि दुसरा उट्ट काढतो. <<<<< Lol
मी वेगळ्याच विचारात आहे.... मूळ कुंडलित शनि व केतु मकरेमधे अष्टमात. माझी केतु महादशा लौकरच सुरु होईल... नेमका शनिही अजुन साडेतिन्/चारेक वर्षात मकरेत येईल. तेव्हांच्या ग्रहस्थितीचा आढावा घेऊन अंदाज बांधणे औत्सुक्याचे राहील. अ‍ॅफेमेरिज मिळवतोय पुढील वर्षांच्या, गेला बाजार कुंडली प्याकेज वापरुन पुढील तारखांच्या कुंडल्या काढून केतु महादशा व जोडीने शनिचे भ्रमण यांचा अंदाज घेता येईल. (माझ्या मते तो कालखंड अवघड व तब्येतीची काळजी करावयास लावणारा ठरेल, वा अन्यही बरेच काही). असो. विषयांतर नको. सहज आठवले, कारण तुम्ही म्हणले की उट्ट काढेल, मला प्रश्न पडला की "उट्ट" काढायला तरी वेळ मिळणार की नाही !

भावेशाचा अभ्यास न करता नुसत्या एका ग्रहाचा अभ्यास आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होईल हे सांगणे कठीण आहे.

सुर्य लग्नेश असेल तर तब्येत उत्तम असेल. लग्नेश सुर्य मेष, सिंह किंवा धनु राशीत असता हे फळ आणखी चांगले मिळेल. लग्नेश सुर्य असुन १४ एप्रिल ला जन्म असल्यास हा एक राजयोग असेल. लग्नेश सुर्य ६,८,१२ स्थानी असता आरोग्याच्या द्रुष्टीने उत्तम फळे अनुभवास येणार नाहीत. राहुच्या युतीत असता सुध्दा शुभ फळे मिळण्यास अडचणी येतील.

या पध्दतीने अभ्यास करावा असे वाटते.