शनी महादशा- दशा की दुर्दशा? महाशंका आणि कुशंका!

Submitted by निमिष_सोनार on 1 October, 2015 - 05:03

या ग्रुप मधील तमाम ज्योतिष जाणकार आणि प्रवीण मंडळींना मी काही प्रश्न, शंका आणि कुशंका विचारू इच्छितो. ते सगळे प्रश्न शनीच्या महादशेसंदर्भात आहेत.

१. शनीची महादशा नेहेमी दुर्दशाच करते का?

२. राशीनुसार आणि जन्मलग्नानुसार शनीच्या महादशेचे फळ कमी जास्त तीव्र किंवा कमी जास्त चांगले आणि वाईट असते का? करिअर आणि कुटुंबावर वर काय परिणाम होतो?

३. मित्र ग्रहांच्या राशींना शनी हा त्याच्या महादशेत त्रास देत नाही असे आहे का?

४. शनी महादशेत शनीची साडेसाती आली तर दुप्पट त्रास होतो का? शनी महादशेच्या दरम्यान शनीची अंतर्दशा आली तर काय होते? आणि त्यात शनीची साडेसाती सुरु असेल तर काय होते?

५. शनीच्या राशी कुंडलीच्या ज्या घरात असतील आणि शनी ज्या घरात असेल त्या घरांचे फळ शनी महादशेच्या काळात मिळते का? ते फळ शनी उच्चीचा असेल तर चांगले आणि निचीचा असेल तर वाईट मिळते का? किंवा शनी महादशेत त्या घरांचे नेहेमी वाईटच फळ मिळते?

६. महादाशेचे पूर्ण १९ वर्षे फक्त आणि फक्त त्रासच होतो काय?

७. एखाद्या लहान बाळाच्या जन्माच्या वेळेपासून त्याला शनी महादशा सुरु होत असली तर त्यालाही त्रास होतो का?

८. महादशेत त्रास असलेल्या काळात तीव्रता कमी करण्यासाठी कशाची उपासना करावी? काही उपाय तोडगे? वागण्या बोलण्यात काही बदल करावेत का?

९. एका कुंडलीत मीन लग्न आहे. रास वृषभ असून चंद्र तृतीय स्थानी आहे. अकराव्या आणि बाराव्या स्थानात शनीच्या राशी आहेत आणि शनी कर्केत पाचव्या स्थानात आहे. आणि शनीची महादशा ३०/१०/२०१६ पासून सुरु होत आहे तर त्याचे फळ काय?

(इतर ग्रह स्थिती -
प्रथम स्थान - मीन रास - शुक्र (उच्चीचा)
द्वितीय स्थान - मेष रास - केतू / अष्टम स्थान - तूळ रास - राहू, हर्शल
तृतीय स्थान - वृषभ रास - चंद्र , गुरु
चतुर्थ स्थान - मिथुन रास
पंचम स्थान - कर्क रास - शनी (कर्केचा शनी उच्च कि नीच ?)
षष्ठ स्थान - सिंह रास
सप्तम स्थान - कन्या रास - प्लुटो)
नवम स्थान - वृश्चिक रास - नेपच्यून
दशम स्थान - धनु रास
एकादश स्थान - मकर रास - मंगळ (उच्चीचा)
द्वादश स्थान - कुंभ रास - सूर्य आणि बुध )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पन्चमात शनी कर्केचा - ओके, पण शनीची उच्च रास तुळ आहे, कर्क शत्रु रास आहे. कर्क, मेष, वृश्चिक, सिन्व्ह शनीच्या शत्रु राशी मानतात.

शनी महादशा वाईट नसते, फक्त तो निचीचा ( मेष राशीत निचीचा असतो- निचीचा म्हणजे शनीचे जे ओरिजीनल गुण आहेत- व्यवहारीपणा, दूरदृष्टी, काटकसर ह्याचा अभाव असतो. ) असल्यास त्रास होतो.

धन्यवाद रश्मी पण मग "कर्केचा शनी" काय आहे? निचीचा कि आणखी काही?
"कर्केचा शनी" असल्यावर पण त्रास होईल का?

जाणकार अधिक चांगले उत्तर देतिलच, मी माझ्यापरीने प्रयत्न करतो.
(उत्तर चूकले/चूकीचे असले तर माझा दोष्/माझ्या अक्कलेचा दोष, त्यावरुन शास्त्र खोटे हे सिद्ध होत नाही)

>>>> १. शनीची महादशा नेहेमी दुर्दशाच करते का? <<<<<<
नाही. पण मुळात शनि ग्रह जीवनाची अंध:कारमय बाजु जातकास दाखवतो. अर्थातच तो काळ कठीण भासतो.

>>>>>>> २. राशीनुसार आणि जन्मलग्नानुसार शनीच्या महादशेचे फळ कमी जास्त तीव्र किंवा कमी जास्त चांगले आणि वाईट असते का? <<<<<<<<

होय जन्म लग्नरास/चंद्रराशीनुसार शनिच्याच नव्हे तर कोणत्याही ग्रहाच्या महादशेचे फळ कमीजास्त तीव्र मिळेल, शिवाय मूळ कुंडलीत त्या त्या महादशेच्या ग्रहाला कोणत्या ग्रहाचा जाब आहे वा नाही यानेही फरक पडेल.

>>>>> करिअर आणि कुटुंबावर वर काय परिणाम होतो? <<<<<<
दोन प्रकारे परिणाम मोजावा लागेल. एक चंद्राकडून "मनःस्थिती बिघडल्याने घडणार्या घटना" दुसरे म्हणजे प्राक्तन/प्रारब्धाचे भोग सामोरे आल्यामुळे घडणार्‍या भौतिक घटना. अर्थातच हे परिणाम वाईटच होतात असे गृहित धरणे चूकीचे आहे. कुटुंब व करिअर.... चौथे व दहावे स्थान, येथिल राशी/ग्रह बघुन व या स्थानांचे मालक कुठे बसलेत ते पाहुन ठरवावे लागेल की परिणाम काय असतील. ज्या प्रमाणे सप्तम जायास्थानासच शत्रुस्थान असेही संबोधतात तोच नियम लावु पाहिले तर चतुर्थाच्या सप्तमातिल दहावे स्थान, ही एकमेकांच्या विरोधात असू शकतात. जुळली तर सुत, नैतर भूत... व या करता महादशा यायचीच वाट बघावि लागते असे नाही.

>>>>>>> ३. मित्र ग्रहांच्या राशींना शनी हा त्याच्या महादशेत त्रास देत नाही असे आहे का? <<<<<<
काही प्रमाणात हे खरे आहे. किम्वा दुसर्‍या शब्दात सांगायचे झाले, तर जर तुम्हाला थंडी आवडत असेल, अन समजा कोकणातल्या खेडेगावात बिनापन्ख्याचे ऐन उन्हाळ्यात रहावे लागले तर तुमचे जे काय होईल, व त्याचे उलट, कोकणातच राहूनही पंखा न मिळूदे, पण दुपारच्याला डुंबायला छानसा झरा मिळाला तर तुमचे जे काय अहोईल... यातिल थंडी आवडत असताना उन्हाळ्यात कोकणात जाऊन रहावे लागणे ही परिस्थिती आककली, तर तुम्हालाच तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल.

>>>>>> ४. शनी महादशेत शनीची साडेसाती आली तर दुप्पट त्रास होतो का? शनी महादशेच्या दरम्यान शनीची अंतर्दशा आली तर काय होते? आणि त्यात शनीची साडेसाती सुरु असेल तर काय होते? <<<<<<<
पहिल्या प्रश्नाचे उत्तर नाही. असे दुप्पट, निमपट, पावपट असे काही नसते. जे असते ते जातकाच्या चंद्रराशीप्रमाणे तो "मनास किती लावुन घेणार" ते असते.
दुसर्‍या व तिसर्‍या प्रश्नाच मिळून उत्तर, शनिच्या महादशेत शनीचीच अंतर्दशा आली व साडेसातीही असेल, तर चंद्र व मूळच्या शनिसंदर्भातुन त्या त्या स्थानकालपरत्वे मिलणारी शनीची फळे खात्रीने मिळतात, इतकाच.

>>>>> ५. शनीच्या राशी कुंडलीच्या ज्या घरात असतील आणि शनी ज्या घरात असेल त्या घरांचे फळ शनी महादशेच्या काळात मिळते का? <<<<<< होय.
>>>>>> ते फळ शनी उच्चीचा असेल तर चांगले आणि निचीचा असेल तर वाईट मिळते का? किंवा शनी महादशेत त्या घरांचे नेहेमी वाईटच फळ मिळते? <<<<< या दोनही प्रश्नांचे उत्तर देताना, सांगु इच्छितो की, फळ "वाईट वा चांगले" असे नसुन , त्वरित वा विलंबाने मिळतय किंवा जे मिळतय ते जातकास किती भावतय/नाही भावत यावर अवलंबुन असते. लक्षात घ्या की रात्रीच्या वेळी सूर्य दिसत नाही, अंधार पसरलेला असतो, पण म्हणजे सूर्य नसतोच का? तर सूर्य असतो, पण त्या त्या काळात काही कारणाने तो त्याचे "उजेडाचे/प्रकाशाचे" फल देण्यास असमर्थ असतो, वा दुसर्‍या शब्दात तुम्ही जातक सुर्यापासुन ते फळ स्विकारण्यास अक्षम असता. ही अक्षमता शनि दाखवुन देतो, त्या त्या भावेशाबाबत, स्थानगत फलाबाबत.

>>>>> ६. महादाशेचे पूर्ण १९ वर्षे फक्त आणि फक्त त्रासच होतो काय? <<<<<
नाही.

>>>>>> ७. एखाद्या लहान बाळाच्या जन्माच्या वेळेपासून त्याला शनी महादशा सुरु होत असली तर त्यालाही त्रास होतो का? <<<<<<<<
होय, जन्मकालिन गंडातर वा बालकाच्या अन्य स्वरुपातील हाल अपेष्टा दिसतात ज्या कित्येकदा व्यावहारिक जगातही "झाकलेल्या" राहिलेल्या असतात.

>>>>>> ८. महादशेत त्रास असलेल्या काळात तीव्रता कमी करण्यासाठी कशाची उपासना करावी? काही उपाय तोडगे? वागण्या बोलण्यात काही बदल करावेत का? <<<<<<<
शनिबाबत मारुतीची /रुद्राची उपासना फलदायी ठरते असा अनुभव आहे.
अन्निसच्या धाक/भिती/दहशतीमुळे "उपाय/तोडगे" सांगू शकत नाही, उगाच माकडांच्या हाती कोलित मिळायला नको.... Proud
वागण्याबोलण्यात बदल या ऐवजी विचारात बदल घडवुन आणता आले तर अधिक चाम्गले. विचारातील बदल आपोआप वागण्याबोलण्यात उतरतात. अहंभाव/स्वार्थांधता असेल, तर अशांना शनी पिचकावुन सोडतो असाही जनसामान्यांचा अनुभव आहे. दुसर्याप्रति आदर/स्नेह/परोपकार व त्याग हे गुण शनिला भावतात. ज्यांच्याकडे असे गुण आहेत त्यांना शनिच्या भ्रमणात कमी त्रास होतो असेही जनसामान्यांस अनुभवास आहे.

>>>>>> ९. एका कुंडलीत मीन लग्न आहे. रास वृषभ असून चंद्र तृतीय स्थानी आहे. अकराव्या आणि बाराव्या स्थानात शनीच्या राशी आहेत आणि शनी कर्केत पाचव्या स्थानात आहे. आणि शनीची महादशा ३०/१०/२०१६ पासून सुरु होत आहे तर त्याचे फळ काय? <<<<<<

या बाबत परत कधीतरी....... जाहिर फोरमवर मी सहसा कुंडलीची चर्चा टाळतो.

शनीची महादशा सरसकट अशी वाईट नसते. मात्र शनिच्या महदशेत आपल्याला अपेक्षित अशा घटना, गोष्टी जरा उशिराने मिळतात किंवा अडचणी येऊ शकतात आणि मनस्ताप होऊ शकतो .
पण शनीची किंवा कुठल्याच ग्रहाची भीती वाटावी असे काहीही नाही. ही महादशा किवा अगदी साडेसाती सुद्धा आपल्याला संयम, humility शिकवते.
तोडगा हाच की नेहमी आपल्या कामात शंभर टक्के प्रयत्न करत असाल तर या महादशेत, साडेसाती मधे दोनशे टक्के प्रयत्न करण्याची तयारी असावी. मनस्तापाचा त्रास टाळण्यासाठी मनाची सहानशक्ति वाढविणे त्यासाठी जे उपाय करू शकतो जसे इष्ट-देवतेचे स्मरण, योगा, प्राणायाम इत्यादी.

काहींना साडेसातीमधे कालसर्पयोग असतो. हा योग म्हणजे नक्की काय? आणि असेल तर काय करायला हवे?

मी सध्या साडेसातीतून जात आहे आणि खरच मला हा काळ अवघड आहे.

एकूण सर्वच उत्तरे आवडली.limbutimbu संयमित प्रतिक्रिया छानच. धागाकरते आता मंगळाची पुजा करायला उज्जैनीस क्षिप्रेकाठी बसले आहेत.आल्यावर मंगळाचे प्रश्न विचारतील उत्तरे तयार ठेवावीत.

ज्योतिष शिकत असल्याने उत्तरे देण्याचा प्रयत्न करत आहे. सूचना किंवा करेक्शन्स स्वागतार्ह

१.शनीची महादशा नेहेमी दुर्दशाच करते का?
- महादशा किंवा साडेसाती हा काळ ख-या अर्थाने तुमची लायकी दाखवून देणारा काळ असतो. साडेसाती ही २.५ वर्षांची एक अश्या तीन वर्षांची असते. यात चढउतार असतात. महादशेबाबतही तसेच आहे. भ्रमाचे भोपळे फोडणारा हा काळ असतो.

२. राशीनुसार आणि जन्मलग्नानुसार शनीच्या महादशेचे फळ कमी जास्त तीव्र किंवा कमी जास्त चांगले आणि वाईट असते का? करिअर आणि कुटुंबावर वर काय परिणाम होतो?
- शनीच्या दोन राशी आहेत. मकर व कुंभ. पण कुंभेच्या तुलनेने मकर रास ही अत्यंत कष्ट सोसणारी रास आहे. संघर्ष आणि विलंब हे स्थायीभाव आहेत. कुंभेला तुलनेने शनिची चांगली दृष्टी लाभलेली आहे असा अनुभव आहे. त्यामुळे मकर राशीला जरा त्रास जास होतो. शनि महादशा काळात पंचम स्थानात राहू असेल किंवा गुरु नीचेचा असेल तर करियरवर / शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. शनि महादश ही एकाच बाबतीत तुमची वाट लावेल असे नाही. पण तुम्हाला अनुभवातून परिपक्व करणारा हा काल असतो.

३. मित्र ग्रहांच्या राशींना शनी हा त्याच्या महादशेत त्रास देत नाही असे आहे का?
- हो हे काही प्रमाणात खरे आहे. समग्र कुंडली बघून रिझल्ट ठरवता येतील. एकट्या महादशेमुळे काही होत नाही

४. शनी महादशेत शनीची साडेसाती आली तर दुप्पट त्रास होतो का? शनी महादशेच्या दरम्यान शनीची अंतर्दशा आली तर काय होते? आणि त्यात शनीची साडेसाती सुरु असेल तर काय होते?
- या बाबतीत लिंबूटिंबू यांच्याशी सहमत

५. शनीच्या राशी कुंडलीच्या ज्या घरात असतील आणि शनी ज्या घरात असेल त्या घरांचे फळ शनी महादशेच्या काळात मिळते का? ते फळ शनी उच्चीचा असेल तर चांगले आणि निचीचा असेल तर वाईट मिळते का? किंवा शनी महादशेत त्या घरांचे नेहेमी वाईटच फळ मिळते?
- नाही. कुंडली हि आयुष्यभराचे परिणाम साधणारी असते. पंचमात मकर रास आणि त्याचा मालक शनि अष्टमात असेल तर तो माणूस काय १९ वर्ष शिक्षण घेत बसणार का ?? अशा काळात प्रेमप्रकरण असेल आणि शुक्र दुषित असेल तर समस्या येतात.

६. महादाशेचे पूर्ण १९ वर्षे फक्त आणि फक्त त्रासच होतो काय?
- नाही. अनेकदा ब-यापैकी चमत्कारही घडतात. शनि उपासना सर्वोत्तम. या काळात दान करणे हा सर्वोत्तम उपाय. एखाद्याला साधी पोळी भाजी जरी दिलीत तरी चालेल. शनि महात्म्याप्रमाणे "गर्व धरील त्या पुरुषासी ऐसेच मी गांजेन" असे म्हटले आहे. तुमचा माज धाडकन जमिनीवर आपटवून तुमची लायकी दाखवणारा हा काळ असतो. त्यामुळे विनम्रता हा सर्वोत्तम उपाय आहे.

७. एखाद्या लहान बाळाच्या जन्माच्या वेळेपासून त्याला शनी महादशा सुरु होत असली तर त्यालाही त्रास होतो का?
- होऊ शकतो. अनेकदा लोकांचा विशीनंतर भाग्योदय होतो / करियरची गाडी रुळाला लागते. विलंब हा शनीचा स्थायीभाव असल्याने हा परिणाम होऊ शकतो.

८. महादशेत त्रास असलेल्या काळात तीव्रता कमी करण्यासाठी कशाची उपासना करावी? काही उपाय तोडगे? वागण्या बोलण्यात काही बदल करावेत का?
- शनि उपासना सर्वोत्तम. दर शनिवारी मारुती / शनि मंदिरात जाणे आणि "नीलांजन समाभासं" हा जप करावा. शनिमहात्म्याचे वाचन प्रभावी आहे.

९. एका कुंडलीत मीन लग्न आहे. रास वृषभ असून चंद्र तृतीय स्थानी आहे. अकराव्या आणि बाराव्या स्थानात शनीच्या राशी आहेत आणि शनी कर्केत पाचव्या स्थानात आहे. आणि शनीची महादशा ३०/१०/२०१६ पासून सुरु होत आहे तर त्याचे फळ काय?
- कुंडलीचा फोटो दिलात तर बरं होईल. असं सांगणे कठीण आहे.

सह्याद्रीमित्र.. छान लिहिलय.
>>>> महादशा किंवा साडेसाती हा काळ ख-या अर्थाने तुमची लायकी दाखवून देणारा काळ असतो. <<<
यावर सहज सुचलेला अधिकचा विचार म्हणजे,
साडेसाती असे जे काही मोजले जाते ते निव्वळ चंद्राच्या मागिल पुढिल स्थानासहित चंद्रावरुनचे भ्रमण इतक्याच म्हणजे १२,१,२ या स्थानातिल गोचर शनि भ्रमणाचे वेळेस मोजले जाते. प्रत्यक्षात, शनि बाराही स्थानातुन जाणारच असतो, व त्या त्या वेळेस त्या त्या स्थानासंबंधित फळास "साडेसाती" देतोच. मात्र चंद्राबाबतची साडेसाती मानसिक/भावनिक द्रुष्ट्या सर्वाधिक जास्त जाणवते, बाकी स्थानांची/ठिकाणची अनिष्ट फळे माणुस बरेचदा दुर्लक्षित करु शकतो/करतो / बुप्रावादाने तिकडे लक्ष जात नाहि.
याउलट त्या त्या ग्रहाची, (येथे शनीची) महादशा ही आयुष्यातील त्या कालखंडाकरता (बहुधा एकदाच) येत असते व ती आयुष्यावर दूरगामी परीणाम करुन जाते.
महादशा व साडेसाती मधे वरीलप्रमाणे फरक आहेच आहे. अन त्यामुळेच, जातकास साडेसाती असो वा नसो, कुंडली बघताना, गोचर गुरुचे व शनिचे भ्रमण विचारात घ्यावे लागतेच लागते.
गोचर शनि/ साडेसातीचे त्या त्या स्थानगत परिणाम सूक्ष्मपणे अभ्यासावे लागतात व जातकावर सखोल परिणाम करुन जातात, तर महादशा ही जातकाच्या आयुष्यावर अनेक सूक्ष्म घटनांद्वारेच पण बराचसा "ढोबळ" परिणाम करुन जाते, इतका की कित्येकदा जातकासही तो कळत नाही की परिणाम झालाय, आयुष्याची दिशा बदलली आहे, बहुतेक वेळा तो अहंपणाच्या/व्यावहारिक-भौतिक विचारांच्या भरात त्या त्या घटना गृहित धरतो, वा यशस्वी घटनांचे बाबत स्वतःस शाबासकी देतो, तर अयशस्वी घटनांचे बाबतीत परिस्थिती/दुसर्‍या व्यक्तिस दोष देतो.
साडेसातीमधे असे होईल असे नसते. हा सूर्य हा जयद्रथ या न्यायाने, शनि चंद्रावरुन जाताना ( वा अन्य स्थानांवरुन जाताना त्यांचे कारकत्वाचेबाबतीत) नीरक्षीरविवेकाने जातकास शब्दशः उघडा पाडतो व त्याने व्यावहारिकदृष्ट्या ल्यालेले सर्व मुखवटे त्यास काढायला लावतो.

शनी आणि हनुमान यांचा काही आपसात संबंध आहे का?

आमच्या ऑफिसमध्ये त्या दिवशी चर्चा चालू होती. कोणीतरी म्हटले की हनुमानाची पूजा केली तर शनिची पूजा आपोआप होते. यात तथ्य आहे का? जाणकार माहिती देतील तर ऑफिसग्रूपमध्ये शेअर करता येईल. धन्यवाद Happy

लिंबूटिंबू… परफेक्ट !!!

साडेसाती किंवा महादशा या काळात तुमच्या पत्रिकेतील चंद्र कसा आहे यावर तुमची त्या काळातील मानसिक स्थिरता दिसून येते. मेष लग्न आणि वृश्चिकेचा चंद्र किंवा कर्क राशीत गुरु आणि सिंहेचा चंद्र असेल तर असा माणूस हा काळ पॉझीटीव्हली घेऊन स्व - विकासाचा काळ असा मानून घेईल. पण तुमची रास फक्त मकर / कुंभ आहे किंवा शनि तुळेचा आहे म्हणून तुम्ही अत्यंत घमेंडीत राहत असाल तर तुम्ही कामातून गेलात म्हणून समजा. महादशा किंवा साडेसाती मधेच नाही पण शनि इतर वेळेतही तुमची लायकी दाखवून देतो. भले ती जगासमोर येणार नाही पण आपण किती पाण्यात आहोत हे मात्र आयुष्यभरासाठी पटेल.

एक उत्तम उदाहरण देतो (विषयाशी डायरेक्टली संबंधित नसलं तरी अर्थ लक्षात घ्या)

इतकी वर्ष भारतावर राज्य गाजवत असलेलं काँग्रेस सरकार सरतेशेवटी लोकांनीच रसातळाला नेलं. आपल्या प्रचंड प्रसिद्धीच्या गुर्मीत असलेल्या आणि आपल्या सडेतोड भाषणासाठी प्रसिद्ध असलेल्या एका पक्षाची सध्या नामोनिशाणीही दिसत नाही (त्या पक्षाच्या अध्यक्षांची रास सुद्धा मकरच !!!). त्यामुळे बदल अनिवार्य आहे. लताबाईंनी एक काळ जगाच्या पाठीवर कल्पनेपलीकडे गाजवला पण आत्ता गायला सांगितलं तर त्या तितक्याच Fluently गाऊ शकतील का ??
त्यामुळे आत्ता चांगला काळ आहे म्हणून कायमच चांगलं होईल किंवा आत्ता तुम्ही खड्ड्यात आहात म्हणून आयुष्य संपलं असं होत नाही. सचिनसुद्धा कधीतरी शून्यावर आउट झालेला आहे आणि एखाद्या फडतूस बॉलरनेही शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जिंकवून दिलेला आहे. त्यामुळे अर्थ लक्षात घ्या.

त्यामुळे एखादी गोष्ट तुमच्यामुळे साध्य झाली असेल आणि तुम्ही स्वकर्तुत्वाच्या किंवा आयुष्यात होत असलेल्या भरभराटीच्या वायफळ गुर्मीत असाल तर एक काळ असा येतो की यू आर नोव्हेअर !!! त्यामुळे कायम विनम्र राहणे आणि आपल्याकडून होत असलेलं काम किंवा आपले यश ही त्या परमेश्वराची कृपा / देणगी समजून तो काळ टेम्पररी आहे हे लक्षात घेऊन वागावे.

#सह्याद्रीमित्र आगे बढो कुंडलीच्या नाड्या सापडताहेत तुम्हाला.
#limbutimbu नेहमीप्रमाणेच टकाटक.
#ऋन्मेssष, कथा: शनिच्या साडेसातीबद्दल शंका घेतली देवांनी त्यांना शनि म्हणाला येतो मी तुमच्या राशीला. एक लपून बसला." बघा बघा नुसतं येतो ऐकूनच हा लपला आणि हरला." मारूती म्हणाला "खुशाल बस माझ्या डोसक्यावर।" नंतर त्याने इतरांना सांगितले " हाणा धोंडे मला."( हे नाटक कुठल्या स्वर्गात/गावात झाले ते माहित नाही पण )लोकांनी धोंधे भिरकावल्यावर लक्ष्य चुढून मारूती डोसक्यावरच्या शनिवरच बसत होते.मारूती होता वज्रदेही पण शनिला उतरावे लागले. तात्पय शनिची साडेसाती त्रास सोसवण्यासाठी मारूतीला त्याचे आवडतो तेल ,उडिद ( अडिचशे रु किलोचे ) वहावेत.

सुपिरियारिटी कॉम्प्लेक्स ने पछाडलेले काही लोक मॅनियाक बनतात. नंतर नंतर ते ट्रोल्स बनतात. या लोकांना साडेसाती झटका देउन जमीनीवर आणते. त्यामुळे सामाजिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

ऋन्मेष हो. मारुती हा एकमेव असा देव आहे, जो शनीच्या फेर्‍यात आला नाही. मारुतीने त्याला स्पष्ट सान्गीतले होते की तू माझे काहीच वाकडे करु शकणार नाही. आता हे देव- अध्यात्म् प्रकरण सोडा, आणी दुसरी बाजू बघा.

मारुती हा ( एकवचनी लिहीतेय, पण आपण कधीतरी त्याला तो म्हणतोच की) श्रीरामाचा एकनिष्ठ देवक होता. षडरिपुन्पासुन दूर होता. ( काम, क्रोध, मोह, मद, मत्सर आणी एक आठवत नाहीये) मनाने स्वच्छ होता. अहन्कारावर मात केलेला होता. शनी ला हेच आवडत नाही. शनी षडरिपु पासुन दूर आहे. उद्या लिहीन.

एसआरडी, आंणि रश्मी धन्यवाद.

मी आमच्या येथील चर्चेत यामागची दोन कारणे / कथा ऐकलेल्या.
१ वरील प्रमाणेच की शनि मारूतीचे काही वाकडे करू शकला नाही.
तर एकाने असे सांगितले की हनुमानाचे शनिने गर्वहरण केले.
दोघांनी तात्पर्य मात्र हेच सांगितले की नंतर शनिने प्रसन्न होत हनुमानाला वर दिला की तुझी पूजा केली तरी ती माझ्यापर्यंत पोहोचेल.

अवांतर - रश्मी आपल्याकडे देवांना एकेरी सर्रास बोलले जातेच. Happy

अवांतर - रश्मी आपल्याकडे देवांना एकेरी सर्रास बोलले जातेच.
>>

कॉज वी आर गॉड लव्हिंग पीपल.

मी कुठेशिक वाचले होते की जेव्हा मारुती सूर्याकडे शिकायला होते तेव्हा शनि आणि मारुती ह्यांच्यात काही बेबनाव होऊन नंतर दिलजमाई झाली होती. म्हणून शनीच्या कडक सरळ करण्याच्या प्रकारातून सुटका म्हणून मारुतीची पूजा सुरु झाली होती.

पण आपले नाणे खोटे असेल तर ती उपासना फायद्यात ठरत नाही Happy

चर्चा आवडते आहे. कोणे एके काळी ह्याचा अभ्यास करायचे ठरवले होते. गुरुजी खूप वयस्कर आणि जाणते होते.
परंतु नेमके बाबांना बदलून दुसरीकडे जावे लागले आणि सगळेच सुटून गेले Happy