" अजाण "

Submitted by अज्ञात on 1 October, 2015 - 03:32

अवलोकन संपादन
अज्ञात | 16 September, 2015 - 17:24
नभी शुक्र तारा नदीचा किनारा
उरी दाट छंदी उधाणून वारा
दशा अंतरंगी विजेचा फुलोरा
इशारा कशाचा कुठे ना सहारा

सरे रात्र कोरी कहाणी अधूरी
उषा पाठमोरी दिशा मूढ चारी
सरंजाम सारे परी वांझ वारी
क्षितीजास वेढे कळा वेधणारी

किती काय सांगू असा हा पसारा
फुले वेचली राबला देह भारा
अजाणे अजूनी हले नाही पारा
कळे ना अनंती कुठेसा उतारा

........अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users