आंबोलीत कारवी चा बहर ...(बदलुन)

Submitted by गिरिश सावंत on 28 September, 2015 - 01:14

गर्द निळ्या ‘कारवी’ने सजली आंबोली!
गर्द निळ्या आकाशाचे प्रतिबिंब धरतीवर पडावे तशी सध्या आंबोली नटली आहे कारवीच्या फुलांनी! सात वर्षातून एकदा फुलणारी कारवी सध्या आंबोलीत ठिकठिकाणी दिसत असून कारवीच्या या अनोख्या सौंदर्याचा नजारा पाहण्यासाठी पर्यटकांचीही पावले आंबोलीकडे वळू लागली आहेत. येत्या आठवड्यात कारवीची ही झुडपे पुर्णपणे फुलांनी झाकली जातील आणि आंबोलीच्या सौंदर्याला नवीन झळाळी मिळेल.

प्रची १

IMG_4590 copy

नैसर्गिक वैविध्यतेने नटलेल्या पश्‍चिम घाटात फुलांच्या शेकडो प्रजाती पहायला मिळतात. काही प्रजाती तर प्रामुख्याने पश्‍चिम घाटातच पहायला मिळतात. अशा वैविध्यपूर्ण फुलांपैकी कारवी एक प्रजाती आहे. साधारणत: कारवी प्रवर्गाचे चार ते पाच भाग पहायला मिळतात. यापैकी आंबोलीत टोपली कारवी किंवा माळ कारवी या प्रकारातील फुले दिसू लागली आहेत. ड्वार्ट कारवी असेही त्या झाडांना संबोधले जाते. या प्रवर्गातील कारवीचे आयुष्यमान आठ वर्षाचे असते. त्यापैकी पहिली सहा वर्षे कारवीचे केवळ झुडपेच असतात. सातव्या वर्षी सप्टेंबरच्या सुमारास कारवीची फुले फुलतात. काही दिवसातच या फुलांमागे फळे येतात. आठव्या वर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला फळे फुटतात आणि कारवीच्या जीवनाचे एक चक्र पूर्ण होते. पडलेल्या फळांमधील बिया पुन्हा रुजतात आणि दुसरे जीवनचक्र सुरू होते.

प्रची २

karvi, amboli

आंबोलीत बहर
आंबोलीत ठिकठिकाणी दिसणार्‍या कारवीच्या झुडपांना यावर्षी फुले आली आहेत. कावळेसादला जाणार्‍या रस्त्यांवर तसेच कावळेसाद पॉईंटपासून साधारण एक-दीड किमी.वर डोंगर उतारावर कारवीची झुडपे फुलांनी बहरली आहेत. येत्या आठवड्यात जवळपास सर्व झुडपांना फुले येणार आहेत. फुलांमधून मधही मिळत असल्याने मध गोळा करणारे किटकही अशा फुलांकडे आकर्षिले जात आहेत. स्थानिकांनीही या बहराकडे पर्यटनाच्यादृष्टीने लक्ष द्यायला सुरूवात केली आहे.
ठराविक वर्षातून एकदाच
कारवी या प्रवर्गात वनस्पतीचे महत्वाचे चार-पार प्रकार असून प्रत्येक कारवीच्या फुलण्याची वर्षे वेगवेगळी असतात. व्हायटी हा प्रकार दर सात वर्षानी फुलतो, आकरा याला दर चार वर्षानी तर खरवर हा प्रकार तब्बल 16 वर्षांनी फुलतो. अ‍ॅकॅन्थेसीया कुटुंबातील स्टॉबीलॅन्झर या प्रजातीत मोडणारी ही वनस्पती आहे. खरवर जातीची कारवी पाचगणी परिसरात तसेच फोंडाघाट परिसरात मोठ्या प्रमाणावर आहेत. लांब वाढणार्‍या कारवीच्या काट्या विविध कामांसाठी वापरतात. तर फुलांमधील मध विशेष प्रसिध्द आहे. खरवर जातीच्या फुलांमध्ये कमी-अधिक प्रमाणात मध मिळतो. त्यामुळे मध गोळा करणार्‍या किटकांसाठी कारवीचे फुलने मेजवाणी सारखेच असते. कारवीच्या फुलांपासून मिळणार्‍या मधाला त्या फुलाचे नाव देवूनच ओळखले जाते.
- आंबोली : गिरीश सावंत

प्रची ३

kaarvee , karvi

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुले मस्त आहेत. पण गिरीश फोटोन्ची साईज जरा कमी करा ना. अर्धा स्क्रीन व्यापुन टाकतायत.

सध्या पुण्याहून मुळशी धरणाच्या पुढे जाताना ताम्हिणी घाटाच्या जरा अलिकडे (क्विक बाईटच्या आसपास) भरपूर कारवी फुलली आहे - जरुर जाऊन पहाणे... Happy

- अप्रतिम नजारा आहे - जांभळी आणि पांढरीही (ही बारा वर्षांनी एकदा फुलते म्हणे... )

Pages