किनारा

Submitted by sanika11 on 31 January, 2009 - 00:41

मी उसळते--मावळते--लाटेसारखी,
आवेगाने तुला भेटते नि
क्षणात दूरपण होते..
कधी माझ्या आसवांनी तुझ्या
ओठांना खारट करते तर
कधी माझ्या ओठांनी तुझ्या
ओठांना गोड करते,
माझे प्रेमही तेवढे वेडे
नि रागही तेवढा वेडा,
मी चंचल--कधी खवळते,
कधी नीरव शांत..

पण तू मात्र सदैव
त्याच ठिकाणी
संयमी--संयत..स्थीर,
माझ्यासोबत समुद्राच्या किनार्‍यावर,
लाटेसोबत सदैव साथ देणार्‍या
किनार्‍याच्या वचनापरी गुंतलेला ! !

गुलमोहर: 

छान

हम्म. छान रुपक.
किनार्‍याच्या वचनापरी गुंतलेला ! !
आवडले.

छान आहे कविता Happy

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

छानच !
Happy
---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !