अशी ही बदलाबदली पाकृ ३ "मद्रासी सांबार कांद्यांची कलेजी' बदलून 'सुलेजी'

Submitted by मंजूताई on 27 September, 2015 - 04:56

लागणारा वेळः अर्धा तास
लागणारे जिन्नसः मूळ पाककृती प्रमाणे
बदललेले जिन्नसः बटाट्याच्या ऐवजी सुरण व टोमॅटो ऐवजी अंबाडी पावडर
क्रमवार पाककृती: सुरण सोलून फोडी करुन धुवून घ्या. एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात सुरणाच्या फोडी व थोडे मीठ घालून एक वाफ आली की त्यात अंबाडीची पावडर पाव चमचा टाकून सुरण शिजवून घ्या. एका कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाले की त्यात मसाले कोथिंबीर परतली की कांदे घालून दोन मि. कांदे शिजू द्या. पाण्यासहित सुरण टाका. पाव चमचा अंबाडी पावडर, चवीप्रमाणे मीठ (सुरण उकडताना घातलेय लक्षात असू द्या) साखर घालून दोन मि. झाकण ठेवून शिजू द्या. फेटलेली साय घाला एक मिनीटाने गॅस बंद करा. पोळी, पराठ्या बरोबर खा.
टीपा:
१) सुरण विशेष आमच्याकडे खाल्ल्या जात नाही. काप करत असते. साईमुळे भाजी माईल्ड झाली. सायविरहित भाजी जास्त चमचमीत व मांसाहाराला पर्याय होऊ शकतो.
२) मूळ पाककृतीत हळद नाहीये ती हवी होती रंग जास्त खुलेल.
३) अंबाडी बद्दल दोन शब्दः विदर्भात ह्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. नारळाच्या झाडाप्रमाणे ह्या झुडूपाचा पंचांग, प्रत्येक भाग उपयोगी आहे. हे कफ, पित्तशामक व उष्णता शामक आहे. विदर्भातल्या उन्हाळ्यात तर ह्याचा वापर जरूर करावा. पानांची भाजी व पान घालूनच भाकरीही करतात. फुलांची चटणी करतात. बियांच बेसन करतात व उन्हाळ्यात हे बेसन लावून झुणका करतात. फुले वाळवून त्याची पावडर आंबटपणासाठी वापरतात. काही लोकांना चिंच चालत नाही त्यांनी ही पावडर वापरावी. मी पाणीपुरीच्या पाण्यात ही पावडर वापरते. ह्याच सरबत हे बाजारु थंड पेयांना हेल्दी पर्याय आहे. बीटा कॅरोटीनचा हा एक उत्तम सोर्स आहे. ह्यात भरपूर प्रमाणात 'सी' व आर्यन हे जीवनसत्वं आहेत, हे कोलोस्ट्रॉल कमी करतं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud
Bharich urak tula tai.
Sagalyach rcpy zalya badalun Happy
Br zaal.
Mast watatey suleji

टीपा:
१) सुरण विशेष आमच्याकडे खाल्ल्या जात नाही. काप करत असते. साईमुळे भाजी माईल्ड झाली. सायविरहित भाजी जास्त चमचमीत व मांसाहाराला पर्याय होऊ शकतो.
२) मूळ पाककृतीत हळद नाहीये ती हवी होती रंग जास्त खुलेल.
३) अंबाडी बद्दल दोन शब्दः विदर्भात ह्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. नारळाच्या झाडाप्रमाणे ह्या झुडूपाचा पंचांग, प्रत्येक भाग उपयोगी आहे. हे कफ, पित्तशामक व उष्णता शामक आहे. विदर्भातल्या उन्हाळ्यात तर ह्याचा वापर जरूर करावा. पानांची भाजी व पान घालूनच भाकरीही करतात. फुलांची चटणी करतात. बियांच बेसन करतात व उन्हाळ्यात हे बेसन लावून झुणका करतात. फुले वाळवून त्याची पावडर आंबटपणासाठी वापरतात. काही लोकांना चिंच चालत नाही त्यांनी ही पावडर वापरावी. मी पाणीपुरीच्या पाण्यात ही पावडर वापरते. ह्याच सरबत हे बाजारु थंड पेयांना हेल्दी पर्याय आहे. बीटा कॅरोटीनचा हा एक उत्तम सोर्स आहे. ह्यात भरपूर प्रमाणात 'सी' व आर्यन हे जीवनसत्वं आहेत, हे कोलोस्ट्रॉल कमी करतं.
ह्या टीपा पाककृतीत मला दिसत नाहीयेत... संपादनात दिसताहेत...

टिपा पाकृ मध्ये नाही दिसत. आत्ता पोस्ट टाकलीस त्यात दिसतायेत.

अंबाडीची माहिती मस्त. आम्ही सुरणाची भाजी बरेचदा उपासाची करतो, कोकम घालून, किंवा मी कधी कधी मिक्स भाजीत थोडा सुरण ढकलते.

मस्त पर्याय शोधलेत.. एकच शंका.. आंबाडींच्या फुलांची नाही तर फळांच्या बोंडाची पावडर असणार ती. फुले जास्वंदीसारखीच पण आकाराने लहान आणि पिवळी असतात तर बोंडे मोदकाच्या आकाराची आणि रंगाने लाल असतात.
या बोंडाच्या पाकळ्यांचे सरबत करतात. पित्तशामक असते. भारतातच नाही तर गल्फमधे व आफ्रिकेतही आवडीने पितात. अरेबिक भाषेत करकाते म्हणतात तर नायजेरियन ( हौसा ) भाषेत याग्वा म्हणतात.

पुण्या मुंबईत मात्र बाजारात दिसत नाहीत.

सुरण आणि बाळकांदे!! मस्त आहे कॉंबिनेशन.. एकदा करायला पाहिजे. फक्त घरच्यांना सुरण उपासाला खायचे हेच ठाऊक असल्याने सुरणात कांदा झेपणार नाही बहुतेक Wink