बाप्पा इन टॉप गिअर - अस्मी - ३.५ वर्ष

Submitted by सोनू. on 26 September, 2015 - 14:05

वयाच्या अटीत बसत नाही म्हणून ही प्रवेशिका ग्राह्य नाही. नसणारच आहे तर दुसराही नियम मोडला. माझ्या भाचीला चित्रं रंगवायला फार आवडतं, गेल्या ५-६ महिन्यांपासून. वयाच्या मानाने रंगवतेही छान. तिला इथली चित्रे दाखवली आणि तू रंगवणार का विचरले तर हो म्हणाली. ही दोन तिने रंगवली. अजून एक प्रिंटआउट दे ना गं आत्तू असं पण म्हणून झालय पण ते उद्यासाठी ठेवलय.
हे पहीलं. थोडे खडू थोडे स्केचपेन. पण स्केचपेन बराच वेळ घासल्याने कागद फाटला. मधेच अभ्यास आठवला तर त्यात अक्षरं पण आलीत.

आस्मि१

हे दुसरं. हे फक्तं खडूने रंगवलेलं. थोडं स्केचपेनने आउटलाईन करण्याचा प्रयत्नं ही केलाय तिने. त्यात एक डोळा विचित्रं झालाय. मग बास केलं कोरीवकाम.

IMG_20150926_191600_388.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा!! शाबासकी भाचीला. या वयात स्केचपेन म्हणजे मस्तच. Happy

तिच्या वयाचा असताना माझा लेक वाचता येत नाही म्हणून फक्त स्मायली मोजायचा चित्रावर मिळालेले..म्हणून माझ्यातर्फे अस्मीला Happy Happy Happy

सुंदर!!!

छोट्या बालमित्र /मैत्रिणींसाठी हा उपक्रम आहे. बाप्पांचा सर्वांना आशिर्वाद आहे. संयोजकाना सुद्धा ही प्रवेशिका पाहून आनंद होईल.

वयाचुआ मानाने मस्तच रंगवलंय.
आमचं सव्वातीन नुसतंच रंगाच्या रेघोट्या ओढत होतं म्हणून तिचे चित्र नाही टाकले.
माझ्याकडून पण अस्मीला. Happy Happy Happy

शगल्यांना थँक्यू.
अस्मीला सगळे प्रतिसाद वाचून दाखवले आणि स्माईलीज- स्टार्स दाखवले. खूष आहे स्वारी. शगल्यांना थँक्यू म्हण हां असं पण सांगितलय.

कित्ती निरागस ! गणोबांचे चारही हात आणि खरंतर शरीराचा प्रत्येक भाग वेगवेगळ्या रंगांत रंगवला आहे Lol
मस्त. माझ्याकडून पण अस्मीला भरपूर शाब्बासकी आणि स्मायलीज Happy Happy Happy Happy Happy