देई मातीला आकार - अनन्या (नया है यह ;-) )

Submitted by विनार्च on 26 September, 2015 - 02:55

नमस्कार मंडळी, सांगितल्या प्रमाणे आम्ही अजून काही बाप्पा घडवले आहेत.... बघा कसे वाटताहेत Happy

हा सेल्फीवाला बाप्पा....ह्याला फोटोची एवढी घाई की कारखान्यातच कार्यक्रम आटपून घेतोय.....

IMG_20150926_113250.jpg

हा सेल्फीकॉर्नर मधला Happy

IMG_20150926_112951.jpg

हा टॉप गियरमध्ये गाडी चालवणारा बाप्पा...

IMG_20150926_112720.jpg

उंदीरमामांचा स्पीड इतका भन्नाट आहे की बाप्पाची टोपी उडालीय जी मामांनी आपल्या शेपटीत पकडलीय....
उंदराचे डोळे पिवळे आहेत कारण ते हेडलाइट आहेत Wink

IMG_20150926_112833.jpg

हा आमचा फेव्हरेटवाला बाप्पा.... ज्याची पुस्तकं वाचायचा सपाटा आम्ही सध्या लावलाय ...
" जिरो निमो स्टिलटन"

IMG_20150926_112606.jpg

आणि हा माझ्या फेव्हरेटचा फेव्हरेट.... बाबाचा Happy
सध्या घर सीओसीमय झालय. क्लॅश ऑफ क्लॅन हो.....मस्त गेम आहे.. बाबा खेळतो म्हणून मीपण....
बा अदब...... बा मुलायजा....... होशियार..... क्लॅश ऑफ क्लॅन का राजा आ रहा है.....
"बार्बरियन किंग"

IMG_20150926_112514.jpgIMG_20150926_112317.jpg

मग कसे वाटले माझे बाप्पा नक्की सांगा हं Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम.
केवढे इनोव्हेटीव्ह आणि वेगळ्या संकल्पना घेऊन बाप्पा साकार केलेत! आणि नुसत्या संकल्पनाच नाही तर त्यांचं सादरिकरणही तेवढंच सक्षम आहे. एक मोठी कलाकार घडताना दिसतेय आम्हाला. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.

सावली +१११११

अनन्या... मला सेल्फीवाला बाप्पा खुप आवडला....आपला फोटो काढताना बाप्पा आपल्या पिटुकल्या दोस्ताला विसरला नाहिय ... आणि त्यामुळे च जर्रा कॉलर ताठ करुन उंदीर मामा फोटो साठी ऐटीत उभे आहेत...

केवळ अप्रतिम .... शाब्बास अनन्या...!

भन्नाट ! सगळे बाप्पा एक से एक आहेत. शाब्बास अनन्या.
आमच्याकडेही क्लॅश ऑफ क्लॅनचा छोटा पंखा आहे. त्याला बार्बरियन किंग विशेष आवडला.

अनन्याच्या कौतुकाबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार __/\__ Happy
जितकं बारकाईने निरीक्षण इथे केले जाते तितक इतर कुणीच करत नाही म्हणूनच अनन्याला तिच्या कलाकृती इथे दाखवायला खूप आवडतात. येथे मिळालेल्या सल्ल्यांचावापर ती पुढच्या कलाकृती़मध्ये आवर्जुन करते.

अमा, आम्ही चंद्र लक्षात ठेवून बघायला विसरलो... आता २०३३ चा अलार्म लावलाय Wink ...तसा नंतर खगोल मंडळ व नासाच्या साइट्सचा एक्सटेंसीव्ह रिसर्च केला म्हणा Proud

Pages