"तेचबूक! - बिग बँग माझा"

Submitted by हायझेनबर्ग on 24 September, 2015 - 17:11

शेल्डन :- काल पासून पोट फार खराब आहे, आठव्यांदा परसाकडे जावून आलो.. फिलिंग सॅड.. Sad

*******************************************************

लेनर्ड:- अरे बाबा न्यूटनचा पहिला नियमच आहेना 'बॉडी ईन लूज मोशन स्टेज ईन लूज मोशन'....फिलिंग विकेड

------ डिसलाईक्स - (शेल्डन कूपर) - सरकॅझम? रूममेट अ‍ॅग्रीमेंट...पेज १७....क्लॉज नं १४३
------ लाईक्स - (लेनर्ड) - शेल्डन तू ईनसेन आहेस.
------ डिसलाईक्स - (शेल्डन कूपर) - लेनर्ड मी ईनसेन आहे आणि ते मला माहित नाही असे शक्य तरी आहे का.

*******************************************************

शेल्डन :- लेनर्ड! आज माझ्यात नेहमीची एनर्जी ऊरली नाहीये तुझ्या फालतू जोक्स ना डिसलाईक करण्याची

*******************************************************
लेनर्ड :- मी सांगतो तुला परसाकडे जावून तुझी किती एनर्जी कमी झाली E=mc^2

E=तुझी कमी झालेली एनर्जी , m = कालच्या स्ट्युअर्टकडच्या पार्टीत तू अधाश्यासारझा फस्त केलेला दोन किलो चीझ केक, c = तुझा परसाकडे पळण्याचा स्पीड. Rofl

------लाईक्स - (लेस्ली विंकल) - Rofl शेल्डो विअर्डो

*******************************************************

स्ट्युअर्ट- शेल्डन! तो चीझ केक पेनीने माझ्यासाठी आणला होता, मी तिला मागच्या कॉमिकॉनमध्ये ड्रेसिंग रुममध्ये वॉरिअर प्रिंसेस झीनाचा कॉस्चुम घालण्यासाठी मदत केली म्हणून.

------डिसलाईक्स - (लेनर्ड) - Angry हाऊ डेअर यू. पेनीला हाथ लावल्याबद्दल मी तुला आपण 'एज ऑफ एंपायर' खेळतांना कैद करून गिलोटिनवर तुझा शिरच्छेद करीन.
------डिसलाईक्स - (लेनर्डची आई ) - लेनर्ड तू लहान असतांना मी तुझ्यावर 'बालकांमधले हिंसक विचार' ह्या माझ्या थिसिस साठी प्रयोग केले होते. तुझे हे वरचे विचार माझ्या प्रयोगातल्या निष्कर्षांशी तंतोतंत जुळतात.

*******************************************************

पेनी - स्ट्युअर्ट, मी तुझ्याकडे मदत मागायला आले नव्हते, माझा चीझ केक फॅक्टरी वेट्रेस चा कॉस्च्युम अप्रतिम चमकत होता. तुला मात्रं मी सुपरमॅनच्या कॉस्च्युमवर बाहेरून घालायला जी लाल अंडरवर दिली होती ती लेनर्डची वापरातली होती, तू तुझा चीझ केक लेनर्डलाच दे.

------लाईक्स - (राज कुथ्रापल्ली) - ही ही... Uhoh
------लाईक्स - (हावर्ड) - हाय पेनी. यू आर सो विकेड अँड सेस्की टू....ए आई थांब ना दोन मिनिटं मी तेचबूक वर आहे.
-------डिसलाईक - (प्रिया) - ईयूयूयूयू!! चीझ केक फॅक्टरी वेट्रेस चा कॉस्च्युम! ईयूयूयू Proud

*******************************************************

शेल्डन - असू दे गं पेनी, नील्स बोहरच्या हायड्रोजन अॅट्म मधल्यासारखे स्ट्युअर्ट्चे लव ईलेक्ट्रॉन्स तुझ्या प्रेमाने बांधले गेल्याने तू त्याला घालून पाडून बोललीस तरी तो तुझ्या गल्लीतच फेर्‍या मारत राहणार.

------लाईक्स - (पेनी) - डॉ. लेनर्ड हॉफस्टॅडर मला पण आता 'बोहर मॉडेल' कळले बरं का, तेवढी पण स्ट्यूपिड नाहीये मी.
------लाईक्स - (लेनर्ड) - शेल्डन तुला स्टुपिड म्हणतो, मी नाही.
------डिसलाईक्स - (पेनी) - शेल्डन ईज ईनसेन.
------लाईक्स - (शेल्डन) - किती वेळ सांगितले मी ईनसेन नाही ...आई हिला टेस्ट रिपोर्ट दाखव गं.

*******************************************************

स्ट्युअर्ट - शेल्डन गप्प बसतोस का! थांब ''बॅटमॅन - द रायझिंग ऑफ ब्लॅक नाईट' कॉमिक्सचे तुझे सबस्क्रिप्शन बंद करतो, मग बरोबर बोबडी वळून वाचा बसेलच तुझी.

*******************************************************

हावर्ड - पेनी डार्लिंग! स्ट्युअर्ट तुझ्या प्रेमात पडला म्हणून तू बिचार्‍या न्यूटनच्या ग्रॅविटीच्या नियमांच्या नावाने बोटं मोडू नकोस. Proud

------डिसलाईक्स - (अ‍ॅमी फाराफाऊलर) - ग्रॅविटी फक्त वस्तुमान असलेल्या गोष्टींवरच परिणाम करते, अ‍ॅबस्ट्रॅक्ट गोष्टींवर नाही. गेट योर फॅक्ट्स करेक्टेड.
------डिसलाईक्स - (हावर्ड) - ओह माय डिअर.
------डिसलाईक्स - (शेल्डन) - एमी, सायंसच्या बाबतीत तुझा नो नॉनसेन्स अ‍ॅटिट्यूड बघून मला तुझ्याप्रति कायम वाटत असलेले वर्च्युअल शारिरिक आकर्षण अडीच पटींनी वाढले आहे.

*******************************************************
शेल्डन- आणि हावर्ड तू ग्रॅविटीविषयी एक चकार शब्द जरी काढलास तर गाठ माझ्याशी आहे. तुला काय वाटलं तुझी दुर्बीण कायम पेनीच्या घराकडे रोखलेली असते ते आम्हाला माहित नाही.
------टॅग्ड - (बर्नाडेट) - हावर्ड, मी लक्ष्य ठेवून आहे हां तुझ्यावर. डेस्पो कुठचा.

*******************************************************

हावर्ड - अरे बाबा शेल्डन, माझं हे वय आहे का आता दुर्बीणी रोखायचं. तो राजच चोरून बघत असतोय पेनीला कायम, तोच येतो रोज थोडे पेग मारून, पण पेनीच्या दारापर्यंत गेल्याबरोबर त्याची पिलेली ऊतरले. बीकॉज ही हॅड टू पी यु नो.

------लाईक्स - (पेनी) - Awwww!! सो क्यूट.

*******************************************************

शेल्डन - हायला!! ईधर तो सबकी पोल खुल रही है बाप्पू!! देअर्स समथिंग अबाऊट पेनी! आपण पेनीचे स्वयंवर ठेऊ आणि कुस्तीचा फड लावू तुम्हा सगळ्यांमध्ये. म्हणजे डार्विनचे नॅच्युरल सिलेक्षन आणि सर्वावायवल ऑफ फिटेस्ट कसे मस्त प्रुव होईल. (फिलिंग नॉटी)

------लाईक्स - (एमी फाराफाऊलर ) - मी नववीत असतांनाच हा सर्वायवल ऑफ फिटेस्ट सिद्धांत टेस्ट केला होता. वर्गातल्या सगळ्या मुलांना मी कुस्तीसाठी आमंत्रण दिले आणि त्यांनी ते आनंदाने स्वीकारले. प्रत्येकाला एकेकदा लोळवून देखील ते हा सिद्धांत चुकीचा ठरवण्यासाठी पुन्हा पुन्हा माझ्याशी कुस्ती करत राहिले, पण मी मागे हटले नाही.

*******************************************************

हावर्ड - शेल्डन, तुझा सर्वावयवल ऑफ फिटेस्ट ठेव तुझ्या खिश्यात, माझा अल्गोरिदम बरोब्बर हुडकून काढेन कोण जिंकेल ही कुस्ती ते. थांब सांगतो तुला कसे ते..

------टॅग्ड - (लेनर्डची आई ) - हावर्ड्या, तुझे वासमारू केस आत्ताच्या आत्त्ता कापले नाहीस तर तंगडं मोडून हातात देईन.
------लाईक्स - (राज ) - ह्यॅ ह्यॅ ह्यॅ .. हसून हसून भूक लागली राव.

*******************************************************

नील-डिग्रास-टायसन - अरे लेकांनो तुम्ही सगळे ईथे तेचबुकावर टाईमपास करतायेत?
देवा! अरे कुठे नेवून ठेवलाय ह्यांनी बिग बँग माझा.
------लाईक्स - स्टॅन ली, स्टीफन हॉकिंग.

*******************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे भारीये. सगळे कॅरेक्टर्स मराठीतू बोलताना दिसायला लागले. Proud

आमच्या राजला थोडे स्जून डायलॉग द्यायचे की. तेचबूकावर तर दिल खोलून लिहू शकतोय.

भारीये हे!!

शेल्डन) - एमी, सायंसच्या बाबतीत तुझा नो नॉनसेन्स अ‍ॅटिट्यूड बघून मला तुझ्याप्रति कायम वाटत असलेले वर्च्युअल शारिरिक आकर्षण अडीच पटींनी वाढले आहे.>> हे बेस्ट Happy

आमच्या राजला थोडे अजून डायलॉग द्यायचे की. तेचबूकावर तर दिल खोलून लिहू शकतोय.>> + १००