त्वं आनंदमय: त्वं ब्रह्ममय:

Submitted by जिप्सी on 24 September, 2015 - 11:48

गजवदना तव रूप मनोहर.....

श्री सार्वजनिक संस्था
मुंबईतील पहिला गणेशोत्सव (केशवजी नाईक चाळ, गिरगाव)
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५
देऊळ तूची, तूच मूर्ती, तूच आरती, पूजा भक्ती
तूच असता माझी पूर्ती, मागायाचे काय, अनंता
तूच कर्ता आणि करविता, मी शरण तुला भगवंता......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या ते त्वम् आनंदमया आता तुझ्यासाठी वापरावेसे वाटतेय. घरबसल्या गजाननदर्शनाचा आनंद देणारा तूच रे आमच्यासाठी!

खूप सुंदर. नावं लिही की मंडळांची. मुगभाट आणि निकदवारी लेन (गिरगावचा राजा) कुठला ह्यातला?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! Happy

नावं लिही की मंडळांची. मुगभाट आणि निकदवारी लेन (गिरगावचा राजा) कुठला ह्यातला?>>>अश्विनी, यात ते फोटोज नाहीत :-). पुढच्या भागात येतीलच Wink

वाह!!! आहाहा!!! किती किती सुंदर, आनंद दायक गणपती .. जिप्सी.. तुला खूप धन्यवाद!!!
तेरा नं ची अगदी वेगळीच दिसतेय मूर्ती..

हो मंडळांची नावं हवी होती. फोटो सुंदरच आहेत. घरबसल्या नुंबईच्या गणपतींचे दर्शन घडले जिप्सी तुझ्या मुळे.
केश्वीला मुगभाटच्या गणपतीचे दर्शन घेऊ दे रे बाबा
अकरा नं कोणता आहे रे ?

ह्या अश्या जुन्या पद्धतीच्या मुर्ती बघितल्या की मला लहानपणी पाहिलेल्या गणपतीची आठवण येते.

बाळकृष्णाच्या रूपातला मस्तय!

आहाहा!!!! क्या बात है जिप्स्या!!!!!
फारच सुरेख!!!
प्रत्येक फोटो बघताना 'आहाहा' असे उद्गार निघत होते.
धन्यवाद!!! Happy

सुंदरसुबकमनमोहकअप्रतिमगोंडसलडिवाळ.. अशी सगळी विशेषणे थिटी पडावीत असे बाप्पाचे देखणे रुप...
आणि ते अचूक टिपणारा जिप्स्याचा कॅमेरा....
सगळंच मस्त!!!

चला घरबसल्या दर्शन झाले. गणपतीचे आणि वारीचे वार्षिक सदर चालवून तू इतके आशिर्वाद / सदिच्छा मिळवतोस त्यामुळेच जेंव्हा बिनबोभाट उंडारतोस त्यावेळी होणार्‍या आमच्या जळजळीमुळेसुद्धा तुझे पोट दुखत नसावे Happy

नवव्या फोटोतल्या गणपतीचे डोळे किती पाणीदार आहेत! वॉव!

खरच कुठे जायची गरजच नाही. त्या गर्दीत न जाता इतक्या जवळून इतके सुंदर बापाचे दर्शन तू घडवितोस.

तुझ्यामुळे घरबसल्या दर्शन झाले आम्हाला मुंबईतल्या गणपतींचे.
सुंदर आलेत सगळेच फोटो.
शेवटचा खूपच आवडला.