तेचबूक : एशान मिरचंदानी

Submitted by नंदिनी on 23 September, 2015 - 06:16

एशान: गणपतीबाप्पा मोरया .... गोईंग टू बायकोचे माहेर!
लाईक्स: रेहान, जय, अर्णव, जय, अरमान, प्रिया, मिसेस एशान, आणि अजून बरेच जण.

रेहान: कधीपर्यंत आहेस? २४ ला जमलं तर घरी ये.
अर्णव: २४ ला काय आहे?
रेहान: तू येणार आहेस का?
एशान: तो व्हेजीटेरीयन आहे. त्याला बोलावून काय उपयोग?
रेहान: खरंच? व्हेजीटीरीयन असेल असं वाटलं नव्हत. पारच वाया गेली की रे ही केस. आपण त्याच्यासाठी सोयाचंक्स घालून बिर्याणी पकवू.
अर्णव: बिर्याणी कशाला?
एशान: तू लेका थक्कालीसादमच खा त्या तमिळनाडूमध्ये.
रेहान: अरे ते कथकली नाचायचं असतं ना. खायचं कसं?
अर्णव : Angry
आफताब: सावकाश या. ट्राफिक जाम खूप आहे.
अर्णव: मी यांना ओळखलं नाही. हे कोण?
रेहान: ते “आगामी” आहेत. अजून येतायत.
अरमान: हॅपी जर्नी. येताना मोदक आण रे.
एशान: उरले सुरले तर घेऊन येतो.
रेहान: अरमान, त्याच्याकडचं उरलंसुरलं खाण्यापेक्षा तूपण इकडेच ये. (मागच्या वर्षीच्या मोदकांची लिंक)
अर्णव: ऑस्सम. मिसेस रेहाननी केले का?
एशान: Lol
रेहान: Angry माझी बायको असल्या फालतू कामांत वेळ घालवत नाही. मी केलेत.
एशान: आमच्या कुणाच्याच बायका असल्या कामांत वेळ घालवत नाही.

प्रिया: जावईबापू, वेलकम टू कोकण.
एशान: धन्यवाद!
अरमान: आम्हाला पण वेलकम करा. आम्हीपण आलोय.
रेहान: तुमच्या कोकणरिश्त्यांबद्दल आम्ही संभ्रमित आहोत. तुम्ही इथलेच की कोकणचे जावई ते अद्याप समजलेलं नाही.
अर्णव: म्हणजे?
रेहान: म्हणजे त्यांची बेटरहाफ नक्की कोण ते कळलेलं नाही. कुणी म्हणतं डबल रोल आहे. कुणी म्हणतं पॅरलल युनिव्हर्स. अजून कुणी काय... त्यांचं काय ते इश्कविश्क क्लीअर झालं की मग आपण त्यांना वेलकम देऊ. तिथं युनोहूंनी फार गुंता केलाय.
एशान: मी ऐकलंय की तो गुंता सोडवताना युनोहू स्वत:च गडबडल्या.
जय: वेलकमपेक्षा वेलकम बॅक मस्त आहे. शिवाय त्यात डिंपल आहे.
एशान: याचं कायम भलतंच स्टेशन लागलेलं का असतं?
रेहान: आधी हा कोण आहे ते समजूदेत. इशावाला जय, अर्णवचा साला जय की माझ्या बायकोचा बेस्ट फ्रेंड जय?
अर्णव : हायला, इथं तर ट्रीपल रोल दिसतोय.
एशान: हे अतिच कन्फ़्युजिंग आहे.
रेहान: युनोहूंना ते टायपायला सोपं पडतंय म्हणून सोपी बारशी करतात. इक्ष्वाकू नावाचं कुणी आहे का बघा आपल्या फ्रेंडलिस्टमध्ये.
जय: मी इशाचा बॉयफ्रेंड.
अरमान: अजून फ्रेण्डच का? लग्नं करा की.
एशान: कशाला? आपण खड्ड्यात पडलो की दुसर्याकला पाडायला मजा येते म्हणून? अजिबात लग्न करू नकोस. डोक्याला फार वैताग होतो.
मिसेस एशान: :पिंगाघालणाराइमोटीकॉन:
रेहान: आज हा बायकोच्या माहेरी जाण्याऐवजी खाडीच्या पुलावर पोचणार बहुतेक.
अरमान: त्याची बायकोपण कधीतरी चिडून माहेरी जातेतरी.
रेहान: काय उपयोग? हा लगेच तिच्या पाठून जातो. बायकोला माहेरी जाऊद्यावं. आपण चार दिस स्वातंत्र्याचा उपभोग घ्यावा वगैरे नाहीच.
प्रिया: ?????
रेहान: आता हिचा अर्णव झाला का?
प्रिया: :हातातकोयताअसलेलाइमोटीकॉन:
रेहान: मुलगी शिकली प्रगती झाली. बायको शिकली तेचबुकावर आली. आणि आमची वाट लागली.
प्रिया: मेल्या, इथं दिवसभर तडमडतोयस होय रे? फोनवरून नजर काढून वर बघ!
रेहान: भाईलोग, यमराज प्रत्यक्ष समोर आहे. माझ्याकडे डोळे वटारून बघतोय. मी लॉग आऊट. जगलो वाचलो तर उद्याभेटू.
प्रिया: Lol
अरमान: भाई, हौसला बुलंद रखो! सब ठिक हो जायेगा.
अर्णव: कोण यमराज?
एशान: तुला इतके प्रश्न का पडतात?
अरमान: त्याला दुसरं काहीच काम नाही म्हणून. युनोहूने त्याला दिवसभर तेचबूकावर टाईमपास करायचंच तर काम दिलंय.
वीर कपूर: गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लव्कर या
एशान: आधी गणपती येऊ तर देत, आधीच काय पुढच्या वर्षी.
वीर कपूर: युनोहू लिहितायत ना? मग लिहून होइपर्यंत अनंत चतुर्दशी होऊन गेलेली असेल.
अरमान: तोपर्यंत आपणच क्रमश:च्या पाट्या लावून ठेवाव्या.

(क्रमश: )
Lol

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखिकेला यू नो हू का म्हणतात? आमच्यासाठी जरा संत्रे सोलावे. Happy

बाकी चांगलंच लिहिले असणार. संदर्भ माहीत नसल्याने इतकेच लिहू शकतो.

mastay he Lol

युनोहु Lol

भारीच... खुप कन्फ्युझ झाले पण मी.. प्रत्येकाची स्टोरी आठवायची म्ह्णजे मोदक खायचं काम वाटलं काय... Wink

आफताब ची वाट बघायला हवी आता

यु नो हू ... मै हू ना सारखे वाटतेय काहीतरी Happy

ये नी वेज, संदर्भ न लागल्याने मी या लेखातली गंमत मिस केली