सावळा..

Submitted by माउ on 22 September, 2015 - 08:50

राधे..

सांजहळव्या धुंद वेळी
तू बासुरीचा सूर हो..
मी सावळ्याची साद होतो,
राधे, तू जरा मजबूर हो..

पदर ढळूदे खांद्यावरी
विखरू दे मोती अंगणी
वा-याचे गीत होऊन ये तू
नाद भरल्या पैंजणी..

सांज बिलगते जशी नभाला
तशी येऊदे आर्तता दाटूनी
मिठीत सरतील अंतरे अन
उरेल एक मोरपीस मनी..

मी झुळूक होऊन करावा
लडिवाळ बटांशी चाळा
मग श्वास तुझे नेसावे
तू माळून घे सावळा...

-रसिका
२२/०९/२०१५

Group content visibility: 
Public - accessible to all site users