एकामागून एक

Submitted by अलका_काटदरे on 30 January, 2009 - 09:03

एकामागून एक पाऊले चालती
पुढे काय वाढून ठेवले, त्यांना नसे माहिती

एक बोलला म्हणुन दुसरे प्रत्यूत्तर देती
एक करून बसला म्हणून, दुसरेही धावती

एक झाडावर चढला तर ती फांदी कापाया घेती
एक विहिरीत बुडाला तर ते, विहीर दुसरी खोदती

एक स्वर्गात गेला त्याच्या मागे न ते जाती
त्याच्या पुण्याईवर मात्र, आपण जिवंत राहती

बकरीची वाट अशी, आमची पाऊले चालती
घेती थाट करुनिया, बळी जाण्याआधी...

गुलमोहर: 

हे कोणत्या गाण्याचं / कवितेचं विडंबन आहे ते ही कळू द्या... Happy
-योगेश

पाऊले चालली पंढरीची वाट ह्या चालीवर आधारीत.