तीट कवितेला - कविता क्र.५ - हुरहुर

Submitted by संयोजक on 20 September, 2015 - 05:29

गुलमोहरात पूर्वी काय काय लिहिलंय हे बघत असताना आम्हाला कवितांचा एक खजिनाच सापडला. काही वाचलेल्या, काही न वाचलेल्या, तर काही वाचलेल्या असूनही परत वाचताना वेगळाच अर्थ गवसलेल्या. अशा कित्येक सुंदर कविता, काळाच्या... आपल धाग्यांच्या उदरात गडप झाल्या आहेत. आता हा खजिना शेअर केल्याशिवाय आम्हाला राहवतय थोडच?
पण नुसता त्या त्या कवितेचा दुवा देण्यापेक्षा एक उपक्रम घेतला तर? ह्या कवितेला तुम्ही शेवटच्या कडव्यानंतर एक कडवं जोडायच. थोडक्यात ती कविता समजून घेऊन, त्यातल्या कल्पनांचा विस्तार करून आणि अर्थातच स्वतःचा स्वतंत्र विचार करून आणखी एका कडव्याची रचना करायची, बरोबरच कवितेला एक नवीन नावही सुचवायच. कशी वाटतेय कल्पना?

यात कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेशी बरोबरी करायचा किंवा त्याच्या कलाकृतीला जरासाही धक्का लावायचा हेतू नाही. फक्त कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेला दाद देउन आपल्याला अशीच रचना करायची वेळ आली तर आपण कसा विचार करू याचा एक खेळीमेळीत अंदाज यावा आणि उत्तमोत्तम कविता पुन्हा वाचल्या जाव्यात इतकाच उद्देश आहे.

नियम:
१. या उपक्रमा अंतर्गत आम्ही मायबोलीवर पूर्व प्रकाशित कविता, कवी/ कवयित्रीच्या नावासकट प्रकाशित करू. त्या कवितेच्या शेवटी तुम्हाला एक कडवं रचायच आहे आणि त्या कवितेला एक नवीन नावही सुचवायच आहे.
२. या उपक्रमात रोज एक नवीन कविता देण्यात येईल.
३. कडवं आणि नाव दोन्ही सुचवणे आवश्यक आहे.
४. तुमचं कडवं आणि नाव इथेच प्रतिसादात लिहा.
५. एका प्रतिसादात एकच कडवं लिहिण अपेक्षित आहे.
६. एक आयडी कितीही वेळा या उपक्रमात भाग घेऊ शकतो.

आजची कविता:

मूळ नाव: हुरहुर
कवी: आनंदयात्री
कवितेची लिंक: http://www.maayboli.com/node/2814

वेगळे हे माणसांचे नूर आता
वाटतो सर्वांस मी निष्ठूर आता

मी स्वतःच्या ऐकतो गाणे मनाचे
समजुतींचा कोष झाला दूर आता

शेवटी तुजला हवे ते मिळवले तू
गमवल्याचा नाटकी का सूर आता?

शब्दही माझा जिथे कळलाच नाही
मौन का वाटे तुला मग्रूर आता?

राख झाली त्या अबोली भावनांची
आठवांचा येत आहे धूर आता

दु:ख वाटावे असे काहीच नाही
हीच आहे नेमकी हुरहूर आता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवितेचं नाव : तूर

का असे माझ्या तुझ्यातिल वाद सारे
लांब बाजारात आहे तूर आता

warchya sarva kavita mast

Ek mazeehee :

mooD na yethe kuNacha aikaNyacha
Thambawaawee too tujhee TuraToor aata

Sheerashak : Salla

शीर्षक : तंदूर
"फर्मावली सरकारने ही मांसबंदी
खायचा कोठे, कसा तंदूर आता?"
- शाकाहारी मिर्चीच्या नसत्या उचापती Proud

उल्हास भिडेंची तीट

शीर्षक :

मूड ना येथे कुणाचा ऐकण्याचा
थांबवावी तू तुझी टुरटूर आता

(त्यांच्या फोनवरून प्रतिसाद नीट उमटत नसल्याने माझ्याकरवी हा प्रतिसाद त्यांनी पोचवलाय.)

शीर्षक : कापूर

भेटण्याचे सोहळे तर संपलेले
आठवांचाही जळो कापूर आता

(थँक्स रीया, मी शीर्षकाचं विसरलेच होते. Happy )

भेटण्याचे सोहळे तर संपलेले
आठवांचाही जळो कापूर आता

स्वातीताई, दंडवत! Happy

शीर्षक : सूरसूर

किती सैल झाली ही उकड माझी
हाय! कसे वळू मी मोदक आता

:ड्रेसच्या बाहीला नाक पुसणारी बाहुली: