झावळयांमागचा भावतो चांदवा

Submitted by सुप्रिया जाधव. on 19 September, 2015 - 10:32

व्यक्त होण्यातही आडपडदा हवा
झावळ्यांमागचा भावतो चांदवा

धुंद लयबद्ध पडता सरींवर सरी
ताल धरण्यास सरसावतो गारवा

स्निग्ध लोण्यापरी एक त्याची नजर
पूर्ण आयुष्य हे.... तापलेला तवा !

कोण जाणे दिवसभर भटकतो कुठे ?
सांजवेळी परततो स्मृतींचा थवा

ऐकवूनी म्हणालास इर्शाद तू
काय सूर्यापुढे चमकतो काजवा ?

अजुनही आठवे भेटणे आपले
वळचणीला कुण्या घुमतसे पारवा

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाह.