"चित्रचारोळी क्र.१"

Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 14:10

असं म्हणतात की, चारोळी हा कवितेतला सर्वांत सोपा प्रकार आहे. एका लयीत बसणार्‍या चार ओळी जमवा, 'र'ला 'र', 'ट'ला 'ट' करत दोन यमके जुळवा अन् झाली की चारोळी तयार.
स्मित
पण जातिवंत चारोळी अर्थवाही असते. कमीत कमी शब्दांत अचूक आशय पोहोचवायचा म्हणजे खायचं काम नाही.
खरं म्हणजे चारोळी हे नेमक्या शब्दांत केलेलं 'मार्मिक' भाष्य! कुठल्याही ओळी जेव्हा मनात जन्म घेत असतात तेव्हा त्यामागे एक कल्पनाचित्र असतं. त्या चित्राचा अर्थ उमगत जातो तसा तसा एक आशय जन्म घेतो आणि मग त्याला शब्दांची महिरप चढवली जाते.

आता समजा या कल्पनाचित्राच्या ऐवजी एक प्रकाशचित्र दिलं आणि 'रचा' म्हटलं चार ओळी तर? सोप्पं आहे ना?
तुम्हांला फक्त एवढंच करायचंय, एरवी तुमच्याभोवती पिंगा घालत बसणार्‍या, पण गरज असते तेव्हा गाव भटकायला जाणार्‍या शब्दांना हुडकून आणून एकेका ओळीत अचूक बसवायचंय!

तुमच्यासाठी हे अवघड नाहीये... एरवी बिनविषयाच्या विषयावरसुद्धा चारोळ्यांचे रतीब घालतो आपण. डोळा मारा इथेतर विषय तुमच्यासमोर मूर्तिमंत उभा आहे!

तुमच्यासारख्या चारोळीकारांना काही नियम लावणं बरोबर नाही, पण काही किमान अपेक्षा आहेत!

१) चारोळीचा विषय प्रकाशचित्राला धरूनच असावा.
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.
३) एका आयडीला कितीही चारोळ्या लिहिता येतील. फक्त त्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये पोस्ट कराव्यात.
४) दरदिवशी एक नवीन चित्र देण्यात येईल.
५) तुम्हाला तुमच्या आवडत्या चारोळीला लाइक करायची सोय दिलेली आहे.
६) ही स्पर्धा नाही, एक खेळ आहे.

तर होऊन जाऊ द्या.... छायाप्रकाशाच्या चित्रलिपीला लेखणीच्या शब्दलिपीचा इंगा दावा!

आजचे चित्र:
Slide2_0.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रातला समुद्र, चित्रातला

चित्रातला समुद्र, चित्रातला किनारा
चित्रात नाही जरासुद्धा वारा
चित्रातली गलबते चित्रातल्या घरांवर
देतात अगदी खराखुरा पहारा

नको नको. स्पर्धा नको. यानिमित्ताने उगाच माझ्यासारख्यांच्या स्युडो क्रिएटिव्हिटीला बहर बिहर येतो त्याचा 'निर्मल आनंद' घेऊ द्या.

शांत sea, शांत she
शांतशी सकाळ होती
विसावलेल्या नावांनाही
eveningची प्रतिक्षा होती

कैच्याकैच!

नको नको. स्पर्धा नको. यानिमित्ताने उगाच माझ्यासारख्यांच्या स्युडो क्रिएटिव्हिटीला बहर बिहर येतो त्याचा 'निर्मल आनंद' घेऊ द्या. >>> असू द्या हो. एखादं वोट मिळणार, त्यात कसला संकोच! Wink

ही लाल मातीची घरे अन निळ्या रंगाच्या नौका
निळे आकाश ऐकते.. नि़ळ्या सागरच्या हाका
घराघरातूनही येते तिची हाक.. सांगते नाव जपूण हाक
चांदण पडेल आकाशात..हा किनारा पाहीन तुझी वाट!!!

- बी

विसावलेल्या नावांनाही
eveningची प्रतिक्षा होती >

"नावांनाही" वर श्लेष आहे की काय? (माणूस हा त्याच्या नावानेच ओळखला जातो असा काहीतरी.. शेवटी कैच्याकैच Wink )

हे गाव सुने सुने अन हा सागर ओकाबोका
श्रांत जळावर गप्प गप्प.. थांबलेल्या नौका
होता एक रांझा होती एक हीर.. संपली प्रेमकहाणी.
...गावात ना उरला कुणी फकीर!!!!!!!!!!

- बी

पहिलाच प्रयत्न Happy

ओहोटीचा तो समुद्र
नौका किनारी विसावल्या
हुरहुरत्या कातरवेळी
नकळत पापण्या ओलावल्या

इव्हिनिंग भाग डोक्यावरून गेला >>> जाऊ दे फारेण्ड. इव्हिनिंग म्हणजे होड्या संध्याकाळी मासेमारीसाठी निघतात म्हणून होतं.

नौकांनी नांगर टाकला
शांत किनार्‍यावरती
माशांनी टाकला नि:श्वास
वार्‍याने घेतली विश्रांती

वा एकसे बढकर एक चारोळ्या येत आहे. किती दिवसांनी चारोळ्या वाचायला मिळत आहे. मला तर जुन्या माबोचा चारोळी बीबी आठ्वत आहे आणि चारोळी लिहिणारे लेखकही. शमा, बेटी, मैत्रेयी, भ्रमर, डॅफोडिल्स, नीरजा, पीके !!! सगळ्यांची खूप खूप आठ्वण येत आहे.

आता येतील बील्डर; उभारतील इथे रेसॉर्ट
पाडतील इथेली घर; रचतील मजल्यवरती मजले
करतील किनार्‍यावरची जागा रील्केम्ड
विजेवरच्या नौकांमधे फिरायला द्यावी लागेल रोकड!!!!

नको झाले स्टारबक्स; नको झाले मॅकडी
नको झाले रोज बघणारे चेहरे
चल भेटू आज सागर किनारी
आणि रात्र घालवू कुणाच्या घरी!!!!

कुठे गेले सगळे सोडून किनारा?
घरी दिसत नाही बाया-माणसे
कदाचित गेले असतील गणेशोत्सवाला
अहो आपल्या माबोच्या देवदर्शनाला!!!

- बी

इव्हिनिंग म्हणजे होड्या संध्याकाळी मासेमारीसाठी निघतात म्हणून होतं. >>> ओह तो अँगल माहीत नव्हता Happy आता समजली.

वाटत देशात जाव
चार दिवस कोकणात रहाव
समुद्रात फिरायला जाव
तिथेच कुणाच्या घरी वॅकेशन काढाव!!!
-बी

हे माझ अगदी खरं स्वप्न आहे.

गावात मिळत नाहीत नोकर्‍या
म्हणून घरे ओस पडलीत,
घरे झाली रिकामी म्हणून
मग होडीचीही गरज सरली!!!!

नौकांना ह्या ध्यास क्षितिजाचा
परी मना आस किनार्‍याची
डोक्यावरी छत निळाईचे
परी मना ओढ घरकुलाची

अवनी ,कमी शब्दांतलीअर्थपूर्ण चारोळी केलीय तुम्ही .माझेही वोट तुम्हाला.. सगळ्यांच्या चारोळ्या खंग्री आहेत अगदी.>>>> बी,रियली, ...मजा येतेय .एकच चित्र पाहुन प्रत्येकजण किती वेगवेगळया प्रकारचे विचार करतायत ते समजतय..

अशा गावी जाईनच कधीतरी
जिथे स्वप्नातून येईल स्वप्नात जाग ,
या होंडयांच्या मनातले काहीतरी
तू माझ्याही कानात सांग ....

भुई, अभिप्राय वाचून खूप छान वाटल.

अशा गावी जाईनच कधीतरी
जिथे स्वप्नातून येईल स्वप्नास जाग ,
या होंडयांच्या मनातले काहीतरी
तू माझ्याही कानात सांग ....

भुई, वरची ही चारोळी किती छान!!! फार आवडली. अजून अजून लिहि.

ती घराच्या खिडकीतून पाहते
किनार्‍यावर तो आला असेल
तो नौका हाकायच्या आत
ती लक्ष वेधणारी मेणका असेल.
- बी

Pages