नागपुरातील २ दिवस ... भाग १

Submitted by bvijaykumar on 9 September, 2015 - 08:45

नागपूरातील २ दिव स .......... भाग १

नागपूरात दीक्षाभूमी, टेकडी गणपती, गांधी सरोवर, महाराजा झू, रामन सायन्स सेंटर, रेल्वे संग्रहालय बर्डी परिसर पाहिला त्यांचाच हा लेखा-जोखा..............

नागपूर ला निघालेलो आम्ही तिघे ...

tighe.JPG

दि. ५ सप्टेंबर २०१५ ला नागपूर ला जाण्यासाठी निघालो.. पण व्हाया मुंबई असे जायचे असल्याने "कोयंबतुर एक्सप्रेस ने जाण्याचे ठरले ..
koymtur express_0.JPG

'मुंबई'त 'चैत्यभूमी' व नूतनीकरण झालेले मत्यालय पाहीले . पण अर्थातच अगोदर चैत्यभूमी ला गेलो. खालील दोन्ही चित्रमालिका तेथील च ! ...
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर मुंबई, दादर येथे समुद्र किनार्‍यावर अग्नी संस्कार करण्यात आले. बौध्द संस्कृतीनुसार या स्थळावर एक चैत्य उभारण्यात आला. त्यामुळे या परिसराला ‘चैत्यभूमी’ असे म्हणतात. भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर नेते, पत्रकार, विचारवंत असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मानवी समतेसाठी आणि हक्कांसाठी लढणारे एक झुंजार नेते होते. एकीकडे अथांग पसरलेला अरबी समुद्र तर दुसरी कडे दादरची चैत्यभूमी दिसते. दादर चैत्यभूमी ही राष्ट्रपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ बनवलेली आहे. दर वर्षी 6 डिसेंबर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाला आणि 14 एप्रिल या त्यांच्या जन्मदिनी चैत्यभूमी कडे लाखोंच्या संख्येने भारताच्या काना-कोपर्‍यातून अनुयायी येत असतात.
चैत्यभूमीच्या परिसरातील भव्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर अतिशय सुंदर असा अशोकस्तंभ आपले लक्ष वेधून घेतो. त्यामागे असलेला अथांग समुद्र आणि त्यावरील मानवाने केलेल्या अफाट प्रगतीची साक्ष देणारा सी-लिंक ही सूर्यप्रकाशाने उजळून निघत असतो. तेथे अनुयायांच्या सोयीसाठी पोलिसांची कडक सुरक्षा व महापालिकेची यंत्रणा ही चांगलीच सज्ज आहे.

chaitybhumi1.JPG

.
.

हा फोटो सी-लिकं जवळचा
sagar clink.JPG
एकीकडे अथांग पसरलेला अरबी समुद्र तर दुसरी कडे चैत्यभूमी , सागरा त उभा सी-लिकं !.. हा दुर्मिळ योगायोग पहावा असाच आहे.
..

..

..

..

समुद्रातील अजून एक देखणं शिल्प ............ " हाजी अली "
haziAli_0.JPG

छत्रपती शिवाजी टर्मिनस व रु न ८.२० सायंकाळी दोरांतो नागपूर एक्सस ने नागपूर कडे निघालो
.दोरांतो चा एक फोटो तो ब न ता है ...

dorato.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो छान.
५ सप्टेंबरला मी नागपूरहून मुंबईकडे निघाले होते. Happy
४ तारखेच्या संध्याकाळपासून ५ तारखेची दुपार एवढाच वेळ असल्याने काही मैत्रिणींच्या गाठीभेटी सोडून काहीही केले नाही नागपुरात.

वातानाकूलित डब्याचा असा रंग प्रथमच पाहिला. चित्रे मस्त! दोनच भाग करा असे सुचवतो. सर्वसाधारणपणे तिसर्‍या भागापासून वाद सुरू होतात असा स्वानुभव आहे. Light 1

तुमची सुचना योग्य वाटतेय ... धन्यवाद .. बेफ़िकीर , नीधप, सकुरा
--------------------------------------------------------------------------------------

ही दोरांतो ट्रेन आहे .... म्ह्णुन च ह्या वातानाकूलित डब्याचा रंग वे ग ळा आहे..

छान फोटोज, वॉव!नागपूर बरंच बदललेलं दिसतंय.. मागची भेट केंव्हातरी ९०ज मधे घडली होती..

दोरांतो ट्रेन.. अशी दिसते?, छानै कलरफुल!!!