सोबतीचे

Submitted by रोहिणी निला on 8 September, 2015 - 06:56

जाऊ नकोस आता इतक्यात दूर दूर
झाले असे कितीसे क्षण साथ सोबतीचे

बहुतेक काल आले लोटून माप दारी
चालून सप्तपदीने शतजन्म सोबतीचे

गोतावळा सग्यांचा होता हवाहवासा
पण वेड लागलेले त्या एक सोबतीचे

भांडून हासलो अन रडलो पुन्हा नव्याने
गजरेच जाहले मग संदेश सोबतीचे

जुळवून पावलांना एकेक पावलाशी
चालू, दिसेल आता ते गाव सोबतीचे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काफिया,अलामत,वृत्त नियम गजलेचा आकृतिबंध या करिता ,गजलतंत्रावरील लेख आपण
अभ्यासावा .कृ.गै.न (http://www.maayboli.com/node/21889)
स्वतंत्ररित्या शेर म्हणून काही ओळी आवडल्या .

धन्यवाद विलासराव,

कुठलाही गैरसमज नाही.
मा बो वरचे लेखक / कवी खूप प्रतिभावान आहेत आणि रसिक खूप चोखंदळ आहेत.
त्यामुळे तुमचा सल्ला माझ्या साठी खूप उपयोगाचा आहे.