उत्तम दिग्दर्शक हा एक 'जॉकी' असतो. कलाकार, कथानक, पटकथा, संगीत, संवाद वगैरे सगळ्या बाबींचा एक घोडा करून तो त्यावर स्वार होतो आणि रेस करतो. तो रेस स्वत:साठी पळतो. त्याला माहित असतं की आपण कितपत मजल मारू शकतो आणि तो हमखास त्याच्यापुढेच जातो. त्यामुळे हरला तरी तोच जिंकतो आणि जिंकला तर तो जिंकलेला असतोच !
बाकी लोक स्टारकास्ट, कथानक किंवा विशिष्ट काळात 'चलती' असलेलं काहीही बकवास (उदा. - हिमेश रेशमिया, यो यो हनी सिंग किंवा रिमेक्स, सीक्वल इत्यादी) पैकी १-२ ला 'जॉकी' म्हणून बसवतात आणि बाकीच्याचा घोडा बनवून दौडवतात ! अर्थातच, त्या घोड्याचा एक पाय ते स्वत:सुद्धा असतात ! अल्लाह मेहरबान हो, तो गधा भी पहलवान होता है, तो घोडा क्यूँ नहीं ? त्यामुळे बऱ्याचदा रेस चांगली होतेही. पण ते प्रत्यक्षात मिथक असतं. एका कोपऱ्यात उभं राहून ज्याने ती रेस लौकिकार्थाने जिंकली असेल, तो हिंमतवान 'जॉकी' ह्या पुचाट जॉकीच्या बेगडी यशाला गालातल्या गालात हसत असावा.
'वेलकम' (पहिला भाग) आला तेव्हा अक्षय कुमारची चलती होती. कतरिना कैफलाही चांगला भाव मिळायला सुरुवात झाली होती आणि 'नाना पाटेकर + अनिल कपूर' ही दुकलीसुद्धा वेगळाच 'फ्लेवर' घेऊन येत होती. जोडीला शिखरावर पोहोचलेला परेश रावलसुद्धा होता ! बस्स ! अनीस बाजमींनी ही तगडी स्टारकास्ट 'जॉकी' बनवून इतर सगळ्याचा घोडा केला आणि 'वेलकम बॅक'ला रेस दौडवली ! घोडा अगदी तगडा नव्हता, तरी लंगडाही नव्हता. त्यामुळे रेस मनासारखी झाली. पण हे असं मिळालेलं यश नशेसारखं असतं. पुन्हा पुन्हा चाखावंसं वाटतं.
आता अनीस बाजमींनी 'नाना + अनिल + परेश रावल' च्या जोडीला जॉन अब्राहम, डिम्पल कापडिया आणि नसिरुद्दीन शाह आणून घोड्यावर बसवले. पण ह्यावेळी घोडा लंगडा निघाला ! बकवास कथानक, पोरकट पटकथा, भिकार अभिनय, चुकार संकलन, बंडल संगीत, सुमार छायाचित्रण वगैरे हाराकिरी एकत्र आली आणि घोडा पिचला !
तर त्याचं होतं काय की -
उदय शेट्टी (नाना पाटेकर) आणि मजनू (अनिल कपूर) हे पूर्वाश्रमीचे 'भाई'लोग आता 'शराफत की जिंदगी' गुजार रहेले होते है. त्यासाठी त्यांनी दुबईत स्वत:चं एक अलिशान हॉटेल सुरु कियेला होता है. पण वाढत्या वयासोबत उदय-मजनू आपापल्या लग्नासाठी अजूनच तरस रहेले होते है. 'नजफगढ'ची महाराणी (डिम्पल कापडिया) मुलगी राजकुमारी नंदिनी (अंकिता श्रीवास्तव) ला घेऊन त्यांच्या हॉटेलात येते आणि उदय-मजनूच्या दिलांमध्ये बोले तो शहनाई बजने लगती है ! पण आपण आपल्या बाईकवर मजेत जात असताना बाजूने जाणाऱ्या एष्टीतून कुणी तरी पचकन थुंकावं, तसा अचानक कुठून तरी उदय शेट्टीचा बाप (म्हातारा नाना) उदयची एक लहान बहिण (श्रुती हासन) सोबत घेऊन उभा ठाकतो आणि तिच्या लग्नाच्या जबाबदारीची माळ उदयच्या गळ्यात घालून उंडारायला निघून जातो !
जशी स्टोरीच्या सोयीसाठी उदयची एक बहिण पैदा केली गेली, तसाच डॉ. घुंगरू (परेश रावल) चा एक मुलगासुद्धा पैदा करणे आवश्यक आहेच. नाही तर अकाऊन्ट टॅली कसं होणार ? मग उपटसुंभ मुलाच्या भूमिकेत साचेबद्ध पॅक्सयुक्त बॉडी घेऊन 'अजय' (जॉन अब्राहम) प्रकट होतो. आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न ! पहिलाच 'वेलकम' नव्या चेहऱ्यांसह पुन्हा सुरु होतो ! हे अजून काही नवे चेहरे म्हणजे वॉण्टेड भाय (नसिरुद्दीन शाह) आणि त्याचा मुलगा हनी (शायनी आहुजा).

चित्रपटात सरळसरळ दोन गट पडलेले आहेत. नाना + अनिल + डिम्पल + नसीर विरुद्ध जॉन + श्रुती + अंकिता + शायनी आहुजा. नाना + अनिलचा गट जे काही करेल, त्यावर बोळा फिरवणे हा एककलमी कार्यक्रम जॉन + श्रुतीचा गट यशस्वीपणे राबवतो. पहिल्या भागात मूर्ख बहिणीची बिनडोक भूमिका जितक्या ठोकळेबाजपणे कतरिना कैफने केली होती होती, तितक्याच किंवा त्याहूनही चांगल्या ठोकळेबाजपणे श्रुती हासन दुसऱ्या भागात करते. ती पडद्यावर आल्यावर प्रत्येक वेळेस आपल्याला कमल हासनबद्दल अतीव सहानुभूती वाटते. जॉन अब्राहमकडून कुठलीही अपेक्षा ठेवण्यापेक्षा मी सलमान, कतरिना वगैरेंकडून ठेवीन. त्यामुळे त्याचा 'ठोकळा' अपेक्षितच होता.
नसिरुद्दीन शाहचा प्रवेश मध्यंतराच्याही नंतर आहे. अश्या किरकोळ आणि तोकड्या लांबीच्या भूमिका हा महान अभिनेता का करतो, हे समजत नाही.
वर उल्लेखलेल्या दोन गटांत 'परेश रावल' येत नाहीत. कारण ते दोन्हीकडून काम करतात !
आता परेश रावल ह्यांनी जरा वेगळं काही तरी करायला हवं, असं वाटायला लागलं आहे. अगदी सुरुवातीच्या काळात ज्याप्रकारे एका पाठोपाठ एक चित्रपटांत त्यांना एकसारख्याच नकारात्मक भूमिका मिळत गेल्या होत्या, तसंच काहीसं आता परत होऊ नये, अशी एक प्रामाणिक इच्छा आहे.
नाना पाटेकर आणि अनिल कपूरची जोडी मात्र धमाल करते. दोघांपैकी एक जरी चित्रपटात नसता, तर कदाचित मध्यंतरापर्यंतसुद्धा सहन झालं नसतं ! ह्या दोघांनंतर 'राज शांडिल्य' ह्यांचे खुसखुशीत संवाद हीच एक चांगली गोष्ट चित्रपटात आहे. त्यांच्या प्रत्येक ओळीला बरोब्बर न्याय नाना आणि अनिलने दिला आहे. दोघे पूर्ण वेळ 'ट्वेंटी२०' मूडमध्ये जबरदस्त फटकेबाजी करतात, एकही चेंडू वाया घालवत नाहीत !
'टाईम लगा रै कायको..' हे 'टपोरी सॉंग' त्यातल्या त्यात बरं जमून आलं आहे. बाकी सगळा गोंधळ डोक्याचा बाजार उठवणारा आहे. (ह्या 'टपोरी सॉंग' मध्ये 'जॉन'चं सोंग बघण्यासारखं आहे. गोविंदाची नक्कल करण्याचा त्याचा प्रयत्न हास्यास्पद झाला आहे. एकूणच त्याला हा 'टपोरी' बाज झेपलाच नाहीय, हेच खरं.)
कथा-पटकथेत इतकी प्रचंड मोठी भगदाडं क्वचितच पाहायला मिळतात. ६० च्या दशकात चित्रपट केवळ गाण्यासांठी असायचे. त्या गाण्यांना पडद्यावर दाखवण्यासाठी कथानक असायचं. तेव्हा असली भगदाडं असत. आज ती बुजवायला कुणी एस डी, ओ पी, मदन मोहन, शंकर-जयकिशन, रवी, नौशाद, सज्जाद वगैरे राहिलेले नाहीत. आता तर लहानश्या छिद्रालाही लपता/ लपवता येत नाही.
भोकं बुजवायला ठिगळसुद्दा न लावण्याचा कामचुकारपणा केल्याबद्दल ह्या चित्रपटाला तिकीट खिडकीवर 'कडी से कडी सजा' मिळावी आणि 'वेलकम बॅक'ला 'गेट लॉस्ट' सुनावलं जावं, अशी मनापासून इच्छा आहे. पण चित्रपटगृहातून बाहेर पडताना, लोकांच्या ज्या गप्पा कानांवर पडल्या, त्यावरून तरी असंच वाटतंय की हा घोडा लंगडा असला, तर रेस 'फिक्स्ड' असावी !
रेटिंग - *
http://www.ranjeetparadkar.com/2015/09/movie-review-welcome-back.html
हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये ०६ सप्टेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-
पण चित्रपटगृहातून बाहेर
पण चित्रपटगृहातून बाहेर पडताना, लोकांच्या ज्या गप्पा कानांवर पडल्या, त्यावरून तरी असंच वाटतंय की हा घोडा लंगडा असला, तर रेस 'फिक्स्ड' असावी !
>>>>>>
म्हणजे पब्लिकला आवडला का?
पब्लिक फिक्स्ड नाही करता येत
पहिला भाग मला तरी आवडलेला फार.
जराही बोर न होणे आणि सतत मनोरंजन होणे ही अपेक्षा पुर्ण करत होता.
जसे ते साजिद खानचे नाही का हाऊसफुल्ल चित्रपट, दोन्ही आवडलेले.
जॉनला मात्र अश्या विनोदी भुमिकेत सहन करणे खरेच अत्याचार असतो. तरीही त्याला त्या का मिळतात हे एक कोडेच आहे. कदाचित मल्टीस्टारर मध्ये लपून जात असेल आणि तेवढेच एखाद्या कॅरेक्टरला बॉडीशॉडीवाला दाखवायचे असेल तर ती गरज भासत असेल म्हणून असावा. पण तो कमी दिसेल तेवढेच बरे असे वाटते.
श्रुती हासल आणि कतरीनाची तुलना नको, भले अभिनयात बोंब दोघींची असली तरी कतरीना कैफ गेल्या २५ वर्षातील सर्वात सुंदर बॉलीवूड अभिनेत्री आहे. जी केवळ तिच्या दिसण्यावर प्रेक्षक खेचण्याची क्षमता राखून आहे.
असो, तरी नाना आणि अनिलकपूरची चांगली बॅटींग असेल तर इतर खच्चर गोष्टींसाठी ती का चुकवावी. माझ्यासाठी तरी वेलकम बॅक बघण्याचे सोल रीजन हेच होते, आणि ते तुम्ही जमलेय बोलत आहात तर बघायला हरकत नाही.
अवांतर - शायनी अहुजा तो रेप केस वालाच ना? तो सुटला का? आणि पुन्हा काम मिळू लागले का?
पाहिला. शिळ्या कढीला ऊत.
पाहिला. शिळ्या कढीला ऊत. पहिला वेल्कम २५-३० वेळा पाहिलाय. सगळ्या फॅमिलीचा आवडता. त्यातले कोणतेही पात्र इरिटेटिंग न्व्हते. म्हणून हा पुन्हा फॅमिलीसकट पाहिला. नाना-अनिल- परेश साठीच पहावा. काही डायलॉग स्फोटक आहेत. अत्यंत इरिटेटिंग : डिम्पल, श्रुती हसन , नसिरुद्दीन, जॉन, शायनी, राजपाल यादव, संगीत. यापैकी कोणीही स्क्रीन वर आल्यास कधी डोळ्यासमोरून नाहीसे होतात असे होते. नाना अनिलसाठी पहावा मात्र. क्लायमॅक्स चांगला आहे. ड्रोन हल्ल्याची थीम वापरली आहे. असरानी, विजयराज, मल्लिका शेरावत, संजय मिश्रा यांची अनुपस्थिती जाणवली. अंकिता श्रीवास्तव भयाण आहे.
शायनी अहुजाला ७ वर्षे
शायनी अहुजाला ७ वर्षे सक्तमजुरी झाली आहे. पण मोलकरणीने कोर्टात उलट सुलट स्टेटमेन्ट केल्याने सध्या हाय कोर्टाने स्टे दिलेला आहे. मोलकरणीला पर्जरीच्या आरोपाखाली ( डॅमेज करणारी खोटी साक्ष दिल्याने )शिक्षा झाली आहे
चांगले कलाकार वाया घालवलेत,
चांगले कलाकार वाया घालवलेत, झालं.. जॉनला काम मिळणे आवश्यक आहे.. नाहीतर तो उत्तम चित्रपटांच्या निर्मितीसाठी पैसा कुठून आणणार ? ( विकी डोनर, मद्रास कॅफे !!! )
कुठे येते म्हणे हे उलट सुलट
कुठे येते म्हणे हे उलट सुलट कोर्ट?
विकी डोनर सुद्धा जॉनची
विकी डोनर सुद्धा जॉनची निर्मिती होती का .. अरे वा, चांगला चित्रपट होता
अवांतर - जॉन त्याच्या साया चित्रपटात आवडलेला. पण नंतर जॉनचा चित्रपट म्हणून असे काही आठवतच नाही.
ण नंतर जॉनचा चित्रपट म्हणून
ण नंतर जॉनचा चित्रपट म्हणून असे काही आठवतच नाही>>> धूम्म्म्म्म!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
वेलकम मध्ये मला फिरोझ खान भारी आवडलेला, त्याचं कॅरेक्टरच अफलातून केलं होतं, आनी त्यानं रंगवलेलं पण भारी.
वेलकम बॅकचे एकंदर रीव्ह्यु बघता टीव्हीवर बघणंच सोयिस्कर.
नंतर जॉनचा चित्रपट म्हणून असे
नंतर जॉनचा चित्रपट म्हणून असे काही आठवतच नाही>>> धूम्म्म्म्म!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
>>>>
हो अॅक्चुअली .. त्यात तो भारी वाटलेला .. त्या भुमिकेसाठी आवश्यक सारे होते त्याच्याकडे
आजच पाहिला. डोके बाजूला ठेवून
आजच पाहिला. डोके बाजूला ठेवून पाहिल्यामुळे मनसोक्त मजा आली. लहान मुलीला घेऊन गेलो होतो तिनेपण एंजॉय केला काही हाणामारी आणि काही डोळे मिटण्यायोग्य दृष्ये होती त्याबद्दल आमचा नाईलाज झाला. हाणामारी दृष्ये जी थोडी होती ती जरा अंगावर आली. आणि जरा ठरवून प्रदर्शन अती वाटलं.पण अनिल कपूर नाना आणि परेश रावल मुळे पिक्चर पाहायला मजा आली.
पहिला वेलकम जेव्हा जेव्हा लागतो(म्हणजे दर आठवड्याला!!) तेव्हा त्याचा एखादा तास पाहिला जातोच.
ना कोई आलू बिका है ना कोइ
ना कोई आलू बिका है ना कोइ काण्दा हा मूळचा नानाचा पण अक्षय कुमार रिपिट करीत असलेला चुकीचा संवाद नाना घाई घाईने दुरुस्त करतो 'आधा... आधा कांदा" ते फारच लाजवाब होते. जुना वेलकम कुठूनही पहायला सुरू करावा आणो एन्जॉय करावा अशी बाब होती.
आलू ले लो कांदे लेलो तर
आलू ले लो कांदे लेलो तर जबरदस्तच आहे. ते, तो घोड्याचा सीन आणि मजनूचं 'बहुत सारा प्यार' वालं पेंटिंग लिलावात विकलं जातं तो सीन कितीही वेळा पाहतो.
स्पॉक दुरुस्त केले आहे
स्पॉक दुरुस्त केले आहे
स्क्रीनशॉट आधिच घेतला
स्क्रीनशॉट आधिच घेतला आहे.
तरी काळजी नसावी!
कळावे!
स्क्रीन्शॉट घेऊन तुम्ही काय
स्क्रीन्शॉट घेऊन तुम्ही काय माझे वाकडे करणार आहात?
दुरुस्त करुन तुम्ही काय सरळ
दुरुस्त करुन तुम्ही काय सरळ केलेत, तेच!
Anu+१ Welcome dokyatun baher
Anu+१
Welcome dokyatun baher kadha ani nava movie pahatay asa wichar karun pahila ja. Dhammal yril.
Mala avadala
Robinhood +1. नाना अनिल साठी
Robinhood +1. नाना अनिल साठी पाहिला. बाकी इग्नोर केले. स्मशानात जेव्हा अनिल अंताक्षरी खेळताना जेव्हा म्हणतो मुझे ए से गाना पता है. त्यावेळेचे त्याच्या चेहर्यावरचे भाव एकदम झकास....
शेट्टी हो या श्रीवास्तव ,
शेट्टी हो या श्रीवास्तव , भूतको कोइ फरक नही पडता 'हा डायलॉक खतराच
जुन्या वेलकम साठी सगळ्यांना
जुन्या वेलकम साठी सगळ्यांना +१ ऑल टाईम फेवरेट मूव्ही. कुठूनही बघायला सुरूवात करावी. फक्त गाणं लागलं की चॅनेल चेंंज.
अनीस बाजमींनी ही तगडी स्टारकास्ट 'जॉकी' बनवून इतर सगळ्याचा घोडा केला आणि 'वेलकम बॅक'ला रेस दौडवली >> इथे 'वेलकम' हवं ना
'वेलकम बॅक' टिव्हीवर आला की बघणार.
रणजित, >>पहिल्या भागात मूर्ख
रणजित,
>>पहिल्या भागात मूर्ख बहिणीची बिनडोक भूमिका जितक्या ठोकळेबाजपणे कतरिना कैफने केली होती होती, तितक्याच किंवा त्याहूनही चांगल्या ठोकळेबाजपणे श्रुती हासन दुसऱ्या भागात करते. ती पडद्यावर आल्यावर प्रत्येक वेळेस आपल्याला कमल हासनबद्दल अतीव सहानुभूती वाटते.<<
हे फार्रच भारी बरं का !!
काल टीव्हीवर वेलकम कितव्यांदा
काल टीव्हीवर वेलकम कितव्यांदा तरी पाहिला. पहिला वेलकम, पहिला हेराफेरी, पहिला हाऊसफुल, पहिला मस्ती- हे असे काही जमून आलेले असतात हेच खरं..
वेलकममधला किंचित कॉमिक शेड असलेला पण तरीही स्टायलिश डॉन फिरोझखाननं काय उभा केलेला. त्याची दोन्ही हातातली पिस्तुलं, त्याचं विमान, त्याच्या एंट्रीचं लैला ओ लैला म्युझिक, चेहेर्यावरच्या स्नायुंची हालचाल.. अहाहाच! आता नसिरुद्दीन स्वतःच कबुल करतील की वाँटेडभाईमें वो मजा नही. जॉन, श्रुती यांची संवादफेक फारच बेकार. खरं तर सारंच बेकार. त्यातल्या त्यात नाना, अनिल आणि रावळमामा हेच काय ते सत्य. बाकी सारं मिथ्या.
सगळी लहान मुलं जाम एंजॉय
सगळी लहान मुलं जाम एंजॉय करतील. आय गॅरंटी इट
नाना-अनिल- परेश साठीच पहावा>>
नाना-अनिल- परेश साठीच पहावा>> यांच्यासाठीच बघणार
यानिमित्ताने जुन्या वेलकम ची
यानिमित्ताने जुन्या वेलकम ची उजळणी:
"अरे लडकी के बाप से क्या गिरते पडते लडकी का हाथ मांगेगा क्या?"
"लेकीन मै क्या करु ये घोडा रुकता ही नही ना!!"
कॅट अक्षय ला आगीतून उचलून आणते तो प्रसंग.
"मै देख सकती हूं की इस पेंटींग को बनानेवाला बहुत प्यारा इन्सान है. अगर घोडा गधे का बोझ उठा सकता है तो एक आदमी दुसरे आदमी का बोझ क्यो नही उठा सकता?"
क्या अँक्टिंग की है आपने!! स्पेशली द वे यु सेड आलू लेलो कांदा लेलो!!
काल टीव्हीवर वेलकम कितव्यांदा
काल टीव्हीवर वेलकम कितव्यांदा तरी पाहिला. पहिला वेलकम, पहिला हेराफेरी, पहिला हाऊसफुल, पहिला मस्ती- हे असे काही जमून आलेले असतात हेच खरं..
वेलकममधला किंचित कॉमिक शेड असलेला पण तरीही स्टायलिश डॉन फिरोझखाननं काय उभा केलेला. त्याची दोन्ही हातातली पिस्तुलं, त्याचं विमान, त्याच्या एंट्रीचं लैला ओ लैला म्युझिक, चेहेर्यावरच्या स्नायुंची हालचाल.. अहाहाच! >>> साजिरा +१
>> नाना-अनिल- परेश साठीच
>> नाना-अनिल- परेश साठीच पहावा. <<
चित्रपट जमून आलेला असता, तरी जॉन-श्रुती-डिम्पल-नसीर-शायनी-अंकिता वगैरेसाठी कोण पाहणार होतं ? चित्रपटाचा 'यूएसपी' हेच तिघं तर आहेत !
पहिल्या इतका नसला तरी छान आहे
पहिल्या इतका नसला तरी छान आहे हा सिनेमा.
वेलकममधला किंचित कॉमिक शेड
वेलकममधला किंचित कॉमिक शेड असलेला पण तरीही स्टायलिश डॉन फिरोझखाननं काय उभा केलेला. त्याची दोन्ही हातातली पिस्तुलं, त्याचं विमान, त्याच्या एंट्रीचं लैला ओ लैला म्युझिक, चेहेर्यावरच्या स्नायुंची हालचाल.. अहाहाच >> अभी हम जिंदा है हा डायलॉग तर एक नंबर..
काश अभीभी वोह जिंदा होता..
चित्रपट का पहावा?
चित्रपट का पहावा? .....
१.Entrainment, Entertainment. , Entertainment
2.नाना व अनिल कपूर साठी व
3. चित्रपटातील अफलातून डायलॉग्ज साठी
"मोबाईल उसका सिम आपुनका तू बिच मै मिस कॉल देने वाला कोन "
लेडीज के नाम पे घर मे छिपकली
लेडीज के नाम पे घर मे छिपकली भी नही है
उनके घर की मक्खीया भी घुंघट लेके उडती होगी
नसिरचाचाला हुसेनलुक दिलाय त्याने मार खाल्लाय. राहून राहून वाटतंय.. फिरोजखानने आणखी मजा आणली असती वाँटेडभाईत.. अनिलचं डावा खांदा वर करुन चालणं .. एकदम चमेली की शादी आठवला!
Pages