येशील आजही तू...

Submitted by सत्यजित... on 5 September, 2015 - 01:44

येशील आजही तू...
^^^^^^^^^^^^^^^^^^^

येशील आजही तू भेटायला पुन्हा...
दररोजचा गुन्हा तो गिरवायला पुन्हा!

ओलावल्या धरेला,कळते तुझे हसू...
बी लागते रुजाया उगवायला पुन्हा!

सुकत्या सदाफुलीची ओलावती व्यथा...
सरणावरी निजावे निपजायला पुन्हा!

केसांत चांदण्याचा,गुंता नकोच तो...
उसणा सुगंध घेते माळायला पुन्हा!

गर्भार वेदनेच्या पोटात आकळा...
मी प्रसवते नव्याने जन्मायला पुन्हा!

अस्तित्व काजव्याचे सांभाळ तू तुझे...
लागेल सूर्य जेंव्हा उगवायला पुन्हा!

केली तुझ्याच नावे मी लेखणी जशी...
सुचले तिला न काही सुचवायला पुन्हा!
—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतला मस्त !
अस्तित्व काजव्याचे सांभाळ तू तुझे...
लागेल सूर्य जेंव्हा उगवायला पुन्हा!>>व्वा!!
गजल आवडली .

शब्दनिवड फार आवडली. काही ठिकाणी 'पुन्हा' हा काफिया समर्पक आहे की नाही असे वाटले. मतला आणि शेवटचा शेर अधिक आवडले.

धन्यवाद बेफिकीरजी!

आपली 'काफिया'बद्दलची सूचना,त्याच्या समर्पकतेकडे अधिक सखोलपणे पाहण्याची दृष्टी देणारी आहे!
लिखाणातील शब्द-शब्द कसदार चपखल ठेवणं अपेक्षित असताना,काफियाचे 'काफिया' म्हणून असलेले विशेष अस्तित्व व त्याचे महत्व,आपण नव्याने लक्षांत आणून दिलेत!
आपली सूचना कायम ध्यानी राहिल!
त्याबद्दल विशेष आभार...