सागरी महामार्गाने कोकण सफर

Submitted by Mandar Katre on 4 September, 2015 - 13:46

गेली कित्येक वर्षे बाईकने कोकण सफर करायची असा विचार होता . पण भारतात असताना नेमकी पावसाळ्यात सुट्टी मिळत नसल्याने व गेली काही वर्षे आखातात असल्याने तो विचार प्रत्यक्षात मात्र येत नव्हता. सहा महिन्यापूर्वीच Hero Passion Pro खरेदी केली होती त्यामुळे यंदा तसा योग आला . मुख्य अडचण अशी होती की सलग 100 किमी पेक्षा सलग प्रवास एकट्याने मोटरसायकलने केलेला नव्हता . म्हणून सुरूवातीला 250 ते 300 किमी चाच टप्पा घ्यावा असे ठरवले .. मग थोडीफार तयारी करून रत्नागिरी –मालवण सागरी महामार्गाने जायचे निश्चित केले .

दिनांक 02 सप्टेंबर ला घरातून निघालो. रत्नागिरी आमच्या गावापासून 30 किमीवर आहे. रत्नागिरीत खरेदी व इतर काही कामे करून दुपारचे जेवण करून 2.00 वाजता निघालो. पावसला स्वामी स्वरुपानंद समाधीचे दर्शन घेवून पुढे पूर्णगड खाडी व बीचवर थोडे फोटोसेशन केले . कशेळी कनकादित्य मंदिर आणि आडीवरे महाकाली मंदिरात दर्शन घेऊन निघेपर्यंत चार वाजले होते . मग चहा घेवून पुढे नाटे - जैतापूर अणुप्रकल्प मार्गे कात्रादेवी येईपर्यंत पाच वाजले . घोडेपोई पूलावरून साडेपाच वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला . पडेल मार्गे जामसंडे (देवगड) येईपर्यंत सहा वाजले . या रस्त्याला ट्रॅफिक अतिशय तुरळक असल्याने 70-80 च्या वेगाने आरामात जाता आले.

जामसंडे वरून कुणकेश्वर ला पोहोचल्यानंतर तिथे hault घेतला . मंदिर व परिसर अतिशय सुंदर असून आधुनिक सुखसोयी उपलब्ध होत आहेत. MTDC चा सर्व सुखसोईनी युक्त अत्याधुनिक रिसॉर्ट नोव्हेंबर महिन्यात पर्यटकांसाठी उपलब्ध होईल होईल असे कळले . मंदिरापासून जवळच अंतरावर समुद्रकिनारी असलेला हा रिसॉर्ट सुमारे 20 कोटी रुपये खर्चून बांधलेला आहे.

03 सप्टेंबर ला कुणकेश्वर – आचरा मार्गाने प्रवास केला .या मार्गावर मीठबाव येथे श्रीदेव रामेश्वराचे सुंदर मंदिर आहे. कुणकेश्वर -आचरा - मालवण हा मार्गादेखील बहुतांश सरळसोट असून अतिशय तुरळक ट्रॅफिक असते. त्यामुळे 80-90 च्या वेगाने बाइक दौडविता आली . मालवण येथे दुपारी भोजन करून काही स्थळे पाहिली व तिथे काही मित्रांना भेटून रात्री मुक्काम केला .

04 सप्टेंबर ला सकाळी 10.00 वाजता मुंबई-गोवा हायवे गाठला . कणकवली जवळ वागदे येथे श्री आर्यादुर्गा मंदिरात दर्शन घेवून जेवण घेतले आणि हायवेने नांदगाव-तळेरे -खारेपाटण -राजापूर -लांजा मार्गे सहा वाजता
घरी पोहोचलो. वाटेत राजापूर -हसोळ येथे कॉलेजमधील वर्गमित्र तुषार दिक्षित याचीही भेट झाली.

मंडळी... सगळा मिळून 450 किमीचा प्रवास झाला . एवढा मोठा प्रवास मोटरसायकलने व तोही एकट्याने करण्याची पहिलीच वेळ . प्रवासवर्णन लिहिण्याची देखील पहिलीच वेळ आहे. तरी सांभाळून घ्यावे व त्रुटी दाखवून सूचना जरूर कराव्यात . सर्व फोटो Flickr.com वर असून त्याची लिंक दिली आहे. धन्यवाद

https://www.flickr.com/gp/135269012@N08/29026d

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users