धर्मगंड

Submitted by संदीप ताम्हनकर on 2 September, 2015 - 02:39

I धर्मगंड I

I धर्माच्या गायीचं काढा दुध I
I वाटणारे आपणच याची असुदे शुद्ध I

I द्या थोडे थोडे काहींना, पळीपळीने I
I बाकी सगळ्याची पंचपात्रातून आचमने I

I घेऊन जा पुन्हा एकदा पुराणात I
I खात बसुदे प्रसादाचा पवित्र वांगीभात I

I करू जानव्याचा इंटरनॅशनल ब्रॅन्ड I
I कुरवाळत बसू धर्माचे बेंड I

I ब्रम्ह गाठीत मोठी शक्ती असते पहा I
I मारू मुठ्ठ्या - ओम फट्ट स्वाहा I

I जाज्वल्य अस्मितेचं वगैरे एक बरं असतं I
I स्वतःचं काही कर्तृत्व नसलं तरी चालतं I

I जातीत जन्माला तर तुझं काय त्यात I
I काढा मग जन्म-जन्मान्तरं, पुण्य आणि पाप I

I वर्तमानशून्य आणि भविष्य अज्ञान्यांना I
I काल्पनिक भूत काळाचाच तर आधार आहे I

I काय करणार बुआ, I
I प्रश्न पिढ्यानपिढ्यांच्या पोटाचा आहे I

संदीप ताम्हनकर, पुणे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

तिकडे तो पगारेंचा विखारी धागा झाला आता इकडे जातीय तेढ वाढवू पाहणार्‍या ओव्या!

दुसरे विषय नाहीत जणू.

एकदाच काय ते ब्राह्मणांना घाऊक प्रमाणात मारून टाका आणि जगा आनंदाने!

अॅड. संदीप ताम्हनकर,

कवितेचा शीर्षकाशी काहीच संबंध दिसंत नाही. धर्मगंड म्हणजे स्वत:च्या श्रेष्ठत्वाची अनाठायी कल्पना का? तसं असल्यास कवितेत तिचं प्रतिबिंब दिसंत नाही.

आ.न.,
-गा.पै.