Submitted by सत्यजित... on 20 August, 2015 - 19:47
हात हाती घेतले पण,हात आहे मोकळा...
हाय!पुन्हा का कुणाला हाक देतो हा गळा!
तो मला माहीत आहे,गैर तो नाही कुणी...
प्राक्तनाचा जिंदगीला लागलेला डोहळा!
लाभले नाही मला मी,लाभला नाहीच तो...
पाहिजे ते लाभण्याचा,दूर दिसतो सोहळा!
कैफियत का पावसाची,अंगणी रुजते कुठे?
मी मला बिलगून जाते,कोंभ यावाकोवळा!
कालच्या गर्दीत आली,हाक कानावर मला...
शोधणारा हात होता,हात माझा वेगळा!
—सत्यजित
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राक्तनाचा जिंदगीला लागलेला
प्राक्तनाचा जिंदगीला लागलेला डोहळा!
@@@@@
याचा अर्थ समजावुन सांगाल काय ?
>>>लाभले नाही मला मी,लाभला
>>>लाभले नाही मला मी,लाभला नाहीच तो...
पाहिजे ते लाभण्याचा,दूर दिसतो सोहळा!<<< वा वा
प्राक्तनाचा जिंदगीला लागलेला डोहळा<<< स्वतंत्ररीत्या ओळ फार आवडली.
बाकी गझलेत पाटीलकी नसते हा वेगळा भाग आहे.
आ.बेफिकीरजी, आपल्याकडून
आ.बेफिकीरजी,
आपल्याकडून प्रोत्साहन,मार्गदर्शन मिळतं...ते लिहिण्याचा हुरुप देतं!
>>> बाकी गझलेत पाटीलकी नसते
हा वेगळा भाग आहे.<<<हे उमगलं नाही!
काही चुकलंय का? असेल तर कृपया लक्षात आणून द्याल,म्हणजे पुन्हा चूक टाळणे शक्य होईल!
लाभले नाही मला मी,लाभला नाहीच
लाभले नाही मला मी,लाभला नाहीच तो...
पाहिजे ते लाभण्याचा,दूर दिसतो सोहळा!>> व्वा !!क्या बात हे!!
सुरेखच.
पाटीलकी ????? !!!;!!!
पाटीलकी ????? !!!;!!!
क्या बात!
क्या बात!