जुना शालू पुन्हा नवीन करण्या बाबत

Submitted by माझी मी on 12 August, 2015 - 03:09

माझ्या आईचा तिच्या लग्नातला शालू काल सहजच पाहताना लक्षात आले तो आता जुना तर झालाच आहे पण, फाटला आहे, रंगही उडाला आहे.मला त्याला परत घालत येईल अस करायच आहे. या साठी नवी मुंबईत कुठे दुकान माहिती असल्यास सांगा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घालता येईल असा म्हणजे साडी म्हणून नेसायचाय की ड्रेस करायचाय?

जर सिल्क खूप जुने झालेले असेल तर त्यातून काही शिवण्याच्या भानगडीत पडू नका. शिलाईचा खर्च अव्वाच्यासव्वा आणि चार वेळाही वापरले जाणार नाही.

जनरली जुन्या सिल्कच्या साड्यांचे अंग जरी विरले असेल तरी काठ मजबूत असतात. ते तसे असतील पुरेसे तर काठ पदर काढून साडीच्या मूळ रंगाचे सिल्क कापड घेऊन त्याला लावून घ्या. हे नेसायला एकदम दणकट होईल.

साडीच्या उरलेल्या सिल्कमधून आठवणींचा खजिना तयार करता येईल. कसे ते तपशिलात जरा नंतर सांगेन हवे असल्यास. आज थोडी घाई आहे.

झोला पण शिवता येईल.काठ काढून त्याच्या तुकड्याने टि कोस्टर्स करुन लॅमिनेट करता येतील. छान दिसतात.
थोडा अजून उत्साह असल्यास सारी होल्डर आत दणकट अस्तर आणि वर प्लॅस्टिक लावून

साडीच्या उरलेल्या सिल्कमधून आठवणींचा खजिना तयार करता येईल

कसे ते प्लिज सांगशील का? माझ्याकडे नेमकी काठ गेलेली आणि अंग शिल्लक राहिलेली साडी आहे. तिला टेलरकडे घेऊन ड्रेस बनवायला गेले तर त्याने उगीच शिवण्यात पैसे वाया घालवु नको, चार दिवसही टिकणार नाही म्हणुन परत केली. हाताला कापड ब-यापैकी दणकट लागते पण टेलर टिकणार नाही म्हणाला म्हणजे ते खरेच असणार. ती साडी तशीच पडुन आहे. तिचे काय करता येईल?

सिल्क साडी जुनी झाली कि विरतेच. त्यमुळे त्यातून काही शिवाणे हे कितीही कापड छान वाटले तरी करू नये.
ती साडी तशीच नेसणे हे सुद्धा रिस्की होवू शकते . नेसताना वाटत नाही पण नेसल्यावर साडी निट करायला गेल्यावर निरयात किंवा साडीला जिथे कुठे पिन लावली असेल तिथून फाटू शकते . लैच डेंजर
तुझा शालू तर फाटला आहे आणि रंग पण गेला आहे म्हणतेस तर
१. काठ चांगले असतील तर कॉटन किंवा सिल्क कापड घेवून हे काठ लावून नवीन साडी करणे. ( synthetic कापड नो नो .. असे कापड काठचे वजन नाही पेलू शकत )
२. पूर्ण काठ हातात येत नसतील तर ओढणी नाहीतर स्टोल
३. बुट्ट्या असतील तर patch work करून ओढणी नाहीतर स्टोल
४. मी नुकतेच अशा काही पिसेस चे patch work करून फ्रेम केल्या
५. एक box आहे त्याला काही सिल्क चे उरलेले कापड लावून ज्वेलरी किंवा आठवणी ठेवायची सन्दुक करणार आहे.
६ जर जास्त साड्या असतील तर एकमेकांना जोडून कोलाज करून पडदा किंवा मोठी फ्रेम.

आई चा शालू म्हणशील तर मी तसाच ठेवला आहे अगदी न धुता

धन्यवाद.....
मी पण तो शालू आहे तसाच ठेवून देणार आहे.
पण तो पुन्हा नेसतात येइल या प्रयत्नात राहणार आहे.

कापण्या फाडण्या अगोदर एकदा नेसून फोटो पाठवा एबिपि माझाला.आता त्यांनी असे फोटो मागवले आहेत..( बहुतेक घे भरारी कार्यक्रमात) बाकीचं माहित नाही.