मशरूम्स!!!

Submitted by मामी on 11 August, 2015 - 13:57

लॉस एंजेलिसच्या फार्मर्स मार्केटमध्ये चक्कर मारताना एका स्टॉलवर फक्त मशरुम्स विकायला होती. किती विविध प्रकार! इतक्या प्रकारचे मशरुम्स प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तरी पहिल्यांदाच पाहिले.

स्टॉलधारकाची परवानगी घेऊन ते सगळे प्रकार कॅमेराबध्द केले. ते फोटो इथे टाकत आहे :

हे आपले कॉमन - बटण मशरुम्स

किंग ट्रंपेट ऑयस्टर

हे मोठे मोठे - पोर्टबेलो

शँटरेल

मुस्राँ

पोर्चिनी

पिओप्पिनी

नेमको

ब्लू फूट ( यांचे दांडे खरंच निळे जांभळे आहेत)

वुड इयर

मैताके

लॉबस्टर मशरूम

आणि हे मशरूम संमेलन ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव. एकदम तोंपासु.

किंग ट्रंपेट >> क्रिम सॉस पास्ता मधे हे लय भारी लागतात. जपानीत एरिंगी.
माईताके >> हे पण टेस्टी. याचा तेंपुरा भारी.
पिओप्पिनी >> हे पण सुप मधे मस्त लागतात.
पोर्चिनी >> ग्रील करुन मस्त लागतात. ( रॅटॅटुली सिनेमामधे तो छतावर जाऊन मश्रुम ग्रील करतो तेच आठवते. ते बहुतेक पोर्चिनी मश्रुम होते Wink )

मामी, मुंबैत तुमच्याकडे यातले कोणते मश्रुम मिळतात?

मला मशरूम्स आवडत नाहीत. त्यामुळे घरी आणले जात नाहीत. हॉटेलात सांगते चक्क की मश्रूम नको.
पण हे घरातल्या कुंडेतले मश्रूम्स. हे खूप छान दिसत होते......त्यांच्या डिझायनर वेअरमुळे!



Pages