Submitted by सत्यजित... on 9 August, 2015 - 13:39
वाल्याच वाल्मिकीचा होणे थरार नाही...
जगतात माणसांच्या,कसला सुमार नाही..!
साधून डाव कोणी साधू बनून फिरतो...
डोळ्यां समोर लुटतो,फसवा प्रकार नाही!
तू ही तसाच हो ना माणूस जीवघेणा...
जर तीच रीत आहे,माझा नकार नाही...!
माणूस जीवघेणा असतो कुठे तसा..पण...
माणूसकी जपाया,कोणी तयार नाही!
माझ्या मनांत आले माणूस मी बनावे...
फसवू अता कुणाला? कोणीच यार नाही...!
माझ्या समान आहे,थोडा सुजाण आहे...
मेला फुकाच त्याला,दुसरा अजार नाही!
भिजवून पावसाळा,जातोय रान सगळे...
माझ्याच वळचणीला,कसला खुमार नाही!
तारीख सांगण्याचे झाले पुरे बहाणे...
माझीच वेळ काही इतकी बिमार नाही!
कपटीच जिंदगी जर,जगणे तुझी हुशारी...
मी बावळा बरा जो,तितका हुशार नाही!
'सत्या'स कोण जाणे कोणी कसे लपवते?
खोटे कुणी ठरावे,तो ही करार नाही...!
—सत्यजित
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा