Submitted by vilasrao on 9 August, 2015 - 06:07
उजाड बागेत राखलेला कोपरा होता !
इथेच गंधाळला जरासा मोगरा होता !
मनातला आरसा तुझ्या मी पाहला जेव्हा
अनोळखी वाटला कुणाचा चेहरा होता !
न डाव जिंकायचा मला पण चाललो चाली
कशास घायाळ आज माझा मोहरा होता !
पतंग ज्योतीत तो जळाला 'ताज 'ओशाळे
कुणीतरी बांधला दिखावा मकबरा होता !
तुला कशाला अता खुपावे थांबने माझे
प्रवास रेंगाळला तुझ्याशी हा जरा होता !
तुझेच सारी मनात स्वप्ने पाहतो आता
'विलास' झाला असा कसा आधी 'बरा' होता !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मतला मस्त! मोहरा,मकबरा ही
मतला मस्त!
मोहरा,मकबरा ही छानंच!
>कुणीतरी बांधला दिखावा...असं अजून बरं वाटेल का ते?
शुभेच्छा!
धन्यवाद सत्यजित ! आपण
धन्यवाद सत्यजित !
आपण सुचवलेला बदल केला आहे.