कातळावरी विषण्णतेचा ओघळ आहे

Submitted by सुप्रिया जाधव. on 8 August, 2015 - 06:35

सुख-दु:खाची व्याख्या इतकी ढोबळ आहे
दे काही दे, भरली माझी ओंजळ आहे

चन्द्र उगवला, दरवळला अन रात्र गुंगली
दिवसालाही आठवणींची भोवळ आहे

तुला त्रास होतो ज्याचा ते करू नको तू
चूक बरोबर ठरवत बसणे निष्फळ आहे

भरती नंतर ओहोटी येते हे नक्की
त्यानंतर भरती येण्याची अटकळ आहे

काटेरी झाडाला देखिल वेल बिलगते
कळेल नंतर, पोर अजूनी अवखळ आहे !

सांधीमधुनी कोंब नवा फुटलेला पाहुन
कातळावरी विषण्णतेचा ओघळ आहे

-सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला त्रास होतो ज्याचा ते करू नको तू
चूक बरोबर ठरवत बसणे निष्फळ आहे<<< छान

भरती नंतर ओहोटी येते हे नक्की
त्यानंतर भरती येण्याची अटकळ आहे<<< छान

काटेरी झाडाला देखिल वेल बिलगते
कळेल नंतर, पोर अजूनी अवखळ आहे !<<< वा वा

सांधीमधुनी कोंब नवा फुटलेला पाहुन
कातळावरी विषण्णतेचा ओघळ आहे<<< उत्तम

मस्त गझल