ए,.
काय आहे?
ती माझी प्लेट आहे..
हो माहितेय, ती बाटली सरकव आधी ईकडे..
चल हट
काय हट.. मग तू झोपडी
आणि तू खोपडी
युजलेस ..
तू शू लेस
तू माईंडलेस
तू लेस्सर
तू नेग्लिजिबल
.... मग तू वन अपॉन इन्फिनिटी
आणि तू वन्स अपॉन ए टाईम
काय लॉजिक आहे?
आधीच्याना जसे काही होतेच ना..
चल सोड
मी कुठे पकडलेय
आता बस ना..
मी बसलेलेच आहे
हरलोऽऽ, .. खुश !
हो खुश !!
मग तू जॉर्ज बुश
हा हा हा.. तू पण ना
तुझ्याच संगतीचा परीणाम आहे हा, पीजे क्वीन. जे हल्ली असले सिरपैर नसलेले बाळबोध विनोद सुचतात.
पण माझ्या पीजेना लॉजिक असते हा..
कसले डोंबल्याचे लॉजिक.. शट अप म्हटले की पॅंट डाऊन बोलतेस, डब्यातले अंडे कोणाचे आहे विचारले की कोंबडीचे आहे म्हणतेस. कधी मस्करीच्या नादात जोराची चापटी मारत लागले का विचारतेस, आणि मी हो म्हटल्यावर " काही लागलं तर मागून घ्यावे" म्हणत आणखी एक मारतेस.
काही का असेना, तू हसतोस ना..
हो ना. हसतो ना. पण हसतो तिथेच फसतो. एवढे पीजे मारणे तुला कसे जमते यावर हसतो आणि तुला ते कौतुक वाटून तू आणखी करतेस.
कश्यावरही का हसेनास, हसतोस ना..
हो पण तुझ्या जोकवर नाही तर तुझ्यावर हसतो. आणि दुसर्यांच्या पीजेवर सुद्धा किती हसतेस तू. तुझ्याबरोबर ते कॉमेडी शो बघणे म्हणजे छळ असतो. प्रत्येक विनोदाला नाही तर त्यांच्या प्रत्येक वाक्याला हसतेस. बरेचदा तर पुढे काय घसापीटा विनोद होणार आहे हे एवढ्या वर्षांच्या अनुभवावरून तुला ठाऊक असते आणि तरीही तू हसतेस, त्यांनी तो विनोद मारायच्या आधीपासूनच हसायला सुरुवात करतेस. ते देखील अगदी खळखळून हसतेस. तुला तसे हसताना बघून खरे तर मला हसायला येते.
हीहीही
आता हसू नकोस, याता काही विनोद नाहीये. सिरीअसली!, म्हणजे चांगले दर्जेदार विनोद तुला समजत नाही अश्यातला भाग नाही, स्वत:ही अधूनमधून एखादा भारी जोक मारून जातेस.. पण मग सिलेक्टीव्ह बन ना. विनोद करायला विनोदबुद्धी लागते तशी ती समजायलाही लागते. कश्याला उगाचच स्वत:च्या विनोदबुद्धीचा दर्जा घसरवतेस.
म्हणजे?, मी काय करू नक्की? आता येते मला कुठल्याही विनोदावर खुदकन हसायला तर ते तोंडातच रोखून धरू का? आधी त्या विनोदाच्या दर्जा वगैरेची चाचपणी करून मगच हसायचे की नाही हे ठरवू का? की स्वत:ही एखादा विनोद करताना या विनोदाने आपलेच तर हसे होणार नाही ना याचा विचार करून मगच तोंड उघडू का? आणि झालेच माझे हसे तर होऊ दे की, मला तर स्वत:च्या फजितीवर सुद्धा खूप हसायला येते, ही ही ही..
जाऊ दे माझे आई, तुला समजवण्यात काही अर्थ नाही. विनोदबुद्धी उपजतच असते हेच खरे.
हो खरेयं, पण त्याचबरोबर एखाद्या गोष्टीतून आनंद घ्यायची क्षमताही उपजतच असते, तसेच विनोदाकडेही चिकित्सकबुद्धीने बघायची वृत्ती देखील उपजतच असते. मात्र दिवसाच्या शेवटी कोण किती हसतोय आणि किती आनंदी राहतोय हे जास्त महत्वाचे नाही का, आणि माझ्यासोबत असताना तू सुद्धा आनंदात असतोस एवढे पुरेसे आहे माझ्यासाठी.
ह्मम, अॅक्चुअली! हे एक मात्र कबूल. तुझ्या विनोदबुद्धीची रेंज खूप मोठी आहे, तू कश्यावरही हसतेस, कश्यातूनही आनंद उचलतेस, ही खरे तर हास्यास्पद गोष्ट आहे की हेवा वाटण्यासारखी हे माहीत नाही, पण तुला हसताना बघून माझ्या चेहर्यावर हास्य फुलते हे माझ्यासाठी पुरेसे असायला हवे, नव्हे आहेच
- ऋन्मेऽऽष
...........
अवखळ तारुण्य...आमचे जूने दिवस
अवखळ तारुण्य...आमचे जूने दिवस आठवले.
आताही आम्ही एकमेकांवर प्रेम करतोच पण तो निरर्थक बालिशपणा केव्हाच हरवला.
तुझं ते विनोदबुद्धि वरचं विवेचन काही झेपलं नाही...पण हे वाचून नॉस्टॅन्जिक झालो एव्हढं खरं.
मस्त...
मस्त...
टग्या आयडी ठेवणार्यांना तसा
टग्या आयडी ठेवणार्यांना तसा बालिशपणा जपणे जड नाही