नवीन स्टिकर्स पाहिजेत.

Submitted by संदीप ताम्हनकर on 1 August, 2015 - 02:43

नवीन स्टिकर्स पाहिजेत.
Whatsapp ने सर्वाना काबीज केलंय. गम्मत अशी की या मध्ये एकही शब्द न वापरता केवळ स्टीकर वापरून संवाद करता येतो. थोडा वेळ लागतो पण परंपरागत लिखाणापेक्षा मजेशीर प्रकार आहे. त्यामध्ये खास भारतीयांसाठी काही नवीन स्टिकर्स Whats app कंपनीने बनवून द्यावेत अशी मागणी आहे. काही विशेष भावना जोरकसपणे समोरच्यापर्यंत पोचवण्या साठी असे स्टिकर्स अत्यंत गरजेचे आहेत. भारंभार शब्द टायपिंग करण्याचा त्रास आणि वेळ वाचवून अस्सल देशी पर्याय हवा आहे. नवीन स्टिकर्स ची मागणी यादी पुढीलप्रमाणे: -
१. पाया पडणे
२. वाकून नमस्कार
३. साष्टांग नमस्कार
४. स्वतःच्या गालफडात मारून घेणे
५. कपाळावर हात मारणे
६. सॅल्युट
७. कानात बोटे घालणे
८. खळळं खट्यक
९. मिशीवर ताव भरणे
१०. जांभई
११. जोड्याने मारणे
१२. जोडीने पाया पडणे
१३. स्क्रू ढिल्ला असणे
१४. पदर खोचणे
१५. पोट तुडुंब भरणे
वानगी दाखल दिलेत, तुम्ही अजून सुचवा!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users