देशद्रोही तितुके कुत्ते। मारोनी घालावे परते। - समर्थांच्या या ओळी आज सार्थ ठरल्या

Submitted by गणेश पावले on 30 July, 2015 - 00:48

देशद्रोही तितुके कुत्ते । मारोनी घालावे परते ।

याकुबला फाशी काल जाहीर झाली, आणि अचानक मनात आसुरी आनंदाने थैमान घातले.
फाशी मुबारक….!! हो अश्या शुभेच्छा हि मित्रांना देवून टाकल्या.

आज पहाटे पहाटे माणूस संपला आन वैर संपले अस आजिबात वाटत नाही.
ज्यांनी ज्यांनी याकुबची बाजू घेतली त्यांची खूपच कीव आली.
काही आमदार, खासदार याकुब्च्या बाजूने उभे राहिले.
खुद्द न्यायदेवतेवर अविश्वास दाखवला या लोकांनी…
हे लोक तितकेच गुन्हेगार आहेत….
चोराचे साथीदार चोरच… हे सूत्र याठिकाणी लागू होते.

सलमान खान, नरसूउद्दीन शाह, शत्रुघ्न सिन्हा सारखी माणस आज माणसं म्हणण्याच्या लायकीची वाटत नाहीत.
शत्रुघ्न सिन्हा तर याकुब जावई असल्यासारख्या बाता करतो.
अबू आझमी तर याकुब स्वताचा मुलगा आसल्यासारख्या बात करतो.
आणि असुउद्दिन ओवेसी महाशय तर गाढवात गिणती करण्यासारखं व्यक्तिमत्व….

का यांना इतका पुळका आला या देशद्रोही यकुबचा…?

आज कितीतरी राजकारणी, सिनेस्टार दाउद च्या पार्टीत सहभागी झालेत.
काहींनी तर दाउद्शी सोयरिक केलीय.
अशांवर देशद्रोही खटले टाकून तुरुंगात भारती केल पाहिजे.

त्यांना माहित नाही का? कि मार्च 1993 मुंबई बॉम्बस्फोमध्ये किती निरापराध लोकांचा बळी गेला.

☼एक आढावा.

पहिला स्फोट : 12 मार्चच्या दुपारी मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीबाहेर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी देशाला हादरवणारा पहिला बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाचा आवाज काही किलोमीटरपर्यंत पोहोचला. स्टॉक एक्सेंजच्या 29 व्या मजल्यावरील माणूसही जागच्या जागी पडला, एवढा मोठा हा स्फोट होता. स्फोटाच्या आजूबाजूला रक्ताचा सडा वाहू लागला. स्फोटाठिकाणी जवळपास 2 हजार लोकांची गर्दी होती. बेसमेंटच्या पार्किंगमध्ये आरडीएक्सनी भरलेल्या एका कारमध्ये हा स्फोटा झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजबाहेरील या स्फोटात 84 लोकांचा मृत्यू आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले.
दुसरा स्फोट : दुपारी 2.15 वाजता, नरसी नाथ स्ट्रीट
तिसरा स्फोट : दुपारी 2.30 वाजता, शिवसेना भवन
चौथा स्फोट : दुपारी 2.33 वाजता, एयर इंडिया बिल्डिंग
पाचवा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, सेंच्युरी बाजार
सहावा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, माहिम
सातवा स्फोट : दुपारी 3.05 वाजता, झवेरी बाजार
आठ स्फोट : दुपारी 3.10 वाजता, सी रॉक हॉटेल
नववा स्फोट : दुपारी 3.13 वाजता, प्लाझा सिनेमा
दहावा स्फोट : दुपारी 3.20 वाजता, जुहू सेंटॉर हॉटेल
अकरावा स्फोट : दुपारी 3.30 वाजता, सहार विमानतळ
बारावा स्फोट : दुपारी 3.40 वाजता, विमानतळ सेंटॉर हॉटेल

  • एका सच्चा देशभक्ताच्या तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे होती.
  • त्या निष्पाप हजारो जीवांच्या वेदनेची जान असायला पाहिजे होती.
  • याकुबला फाशी नको तर त्या पेक्षा कठोर शिक्षा द्यायला पाहिजे अशी मागणी करायला पाहिजे होती.
  • याकुबला जनतेच्या हवाली करा अशी मागणी व्हायला पाहिजे होती.
  • २२ वर्ष खूप झाली त्याला याआधीच शिक्षा व्हायला पाहिजे होती

अशा विधानांची राजकारणी, आणि इतर सामाजिक वर्गापासून अपेक्षा होती, पण इथे चित्र उलटेच दिसले.
याकुबची बाजू घेवून विधाने करणाऱ्या समाजकंटकांच्या तोंडात सेण घालयाची वेळ आता आलीय.

आपला
गणेश पावले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समाधान वाटले एकतरी चढला फासावर , न्यायालयाचे अभिनंदन . बाकी भूकणारे भूंकत राहतील त्याला कोण आवरणार

समाधान वाटले एकतरी चढला फासावर , न्यायालयाचे अभिनंदन , मन आत्ता थोडे शांत झाले , माझ्या मित्रा च्या आत्म्याला शांती मिळाली असेल २२ वर्ष्या नंतर

kharach 1993 chya bomb blast madhe bali gelelya mansanchya gharachyana nyay milala.. yakoob la phashi aadhich dile pahije hoti.... aani tyachi baju mandnyarya lokana suddha jail madhe takale pahije...