Submitted by joshnilu on 28 July, 2015 - 10:44
आज घाई आहे प्रत्येकालाच
घाई पुढे जाण्याची
नव्हे भीती दूसरा पुढे जाइल याची
घाई आनंद अनुभवण्याची
नव्हे भीती आनंदी क्षण निसटुन जाण्याची
घाई समोरच्याला मुद्दे सांगण्याची
नव्हे भीती समोरचा तोच मुद्दा मांडेल याची
घाई सुचलेले विचार मांडण्याची
नव्हे भीती दूसरा अव्वल ठरेल याची
घाई आलेल्या सुखाला लाथाडण्याची
नव्हे भीती पुन्हा दु:ख येइल याची
घाई भरधाव प्रगती करण्याची
नव्हे भीती आयुष्य सरून जाण्याची
ही भीती घालवून घाई कमी करता येइल का??
जाउ दे दूसरा पुढे मी त्याच्या चुकातुन शिकेल
आलेला प्रत्येक क्षण मी आनंदाचा करेन
श्रवण शक्ती वाढवुन मी योग्य विचार मांडेन
व जीवन जगण्यापेक्षा मी ते मनापासून जगेन
--निलेश जोशी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप वेगळा विचार मांडलाय. अगदी
खूप वेगळा विचार मांडलाय. अगदी निराळा perspective. छान आहे. आवडला आणि पटला.
धन्यवाद
धन्यवाद