आठवणींचा शिंपला!!!!

Submitted by सायु on 28 July, 2015 - 05:52

shimpala (2).jpg

मनसागरात मला गवसला, आठवणींचा एक सुंदर शिंपला।
अपेक्षा होती, असावा त्यात एक सुंदर मोती ।
जो नेईल गतकाळात, करेल सुखद क्षणांची पुनरावृत्ती ।

अन बघता बघता, स्मृती फुलांचे तरंग झाले ।
वेडे मन अलवारसे, त्यासंगे झुलु लागले ।
गतकाळातील स्मृती फुलांचा, पाठलाग ते करु लागले ।
सुगंधीत अन प्रफुल्लीत मी, आनंदाने बहरु लागले !

स्मृती फुलांची माळच झाली... ।
अन अलबत मी, भानावर आली ।
जपेन मी हा स्मृती-शिंपला, असाच अलगद, आयुष्यभर ।
जो नेई मज गतकाळात, अन सुगंधीत मी पुन्हा दुरवर,,,,,,, ।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sundar

अबब ! काव्यलेखनसुद्धा..
सायली.. मस्त गं .. खुप आवडल.. प्रचिपन छानच आहे..

मस्त..