नको वाटते मज...

Submitted by सत्यजित... on 27 July, 2015 - 01:18

नको वाटते मज,मळभ दाटलेले...
बरे ते असावे गगन फाटलेले!

किनाऱ्यावरी मी,कितीदा रडावे!
किनाऱ्यास काही नसे वाटलेले!

तुझे पाय कोणी,उरातून वाही...
(असो पाय त्यांचे जरी काटलेले!)
दुकाने तुझीही कुणी थाटलेले!
(असो पाय त्यांचे तरी काटलेले!)

कुणा आस असते,खरी पावलांची...
कुणी श्रेय असते उगा लाटलेले!

जरी सर्वकाही,तयांना दिले तू...
अजुन मागतातच मने बाटलेले!

मनोमन तुझे मी,सदा नाव घेतो...
जरी भाव माझे-तुझे आटलेले!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली!

विशेषतः हे - -

किनाऱ्यावरी मी,कितीदा रडावे!
किनाऱ्यास काही नसे वाटलेले!

खूपच सुंदर

जरी सर्वकाही,तयांना दिले तू...
अजुन मागतातच मने बाटलेले! >>> विशेष आवडले ..