दुष्काळ

Submitted by vilasrao on 25 July, 2015 - 02:30

इच्छा जगायची मरते कधी कधी
काळीज एवढे जळते कधी कधी

आभाळ कोरडे नशिबास हे असे
आयुष्य पावसाळी रडते कधी कधी

सांगून ठेवले कोणी जरी कधी
बीजे जशी तसे फळ फळते कधी कधी

शेती कसायची होती जगायला
आहे मरायला सलते कधी कधी

मातीत स्वप्न माझे रोज भंगते
आशा तरी कशी उगते कधी कधी

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users