’माबो’चा स्वत:चा असा खास शब्दकोश आहे का?

Submitted by पल्लवी अकोलकर on 24 July, 2015 - 09:23

नमस्कार मंडळी,
मस्त वाटतंय तुम्हा सगळ्यांना इथे ’माबो’ वर भेटून.
पण मला प्रश्न पडलाय, खास ’माबो’चा असा शब्दकोश आहे का?
म्हणजे कुणीतरी काढला असेलच ह्याही विषयावरचा धागा.
पण, आमच्यासारख्या नवीन आलेल्या पाहुण्यांना काही शब्दांचे अर्थ समजायला जड जातायेत.
उदा.
माबो= मायबोली
इथूनच आमची परीक्षा सुरु होते.
मग कोणीतरी म्हणालं...पु ले शु म्हणजे पुढच्या लेखनाला शुभेच्छा.
भोआकफ= म्हणजे काय तर, भोगा आपापल्या कर्माची फळं.
तर अशा या लेव्हल्स, पुढे पुढे फारच अवघड होत जातायेत.
आता ’बाफ’ किंवा ’गटग’ म्हणजे काय हो?
असे बरेचसे शॉर्ट-कट्स समजायला ’हेवी’आहेत आमच्यासारख्या नवोदितांना.
अजुनही बरेच आहेत असे शब्द.
तर त्यांचा खुलासा करु शकाल का?
किंवा अगोदरच कुणी केला असेल, तर सांगा, तसा धागा कुठल्या ताग्यात आहे.
मला तर तुम्हा सगळ्यांचे ’निक-नेम्स’ पण आवडले बरं का...
बेफिकीर काय, गामा पैलवान काय, आशुडी मंजुडी, लिंबू टिंम्बू, हिम्सकुल, नाठाळ काय...
मला तर नुसती, हि नावं वाचूनही मजा वाटतेय. (कदाचित नव्याचे ९ दिवस असावेत)
मलाही असं मजेशीर नाव धारण करावसं वाटतंय...
शेक्सपिअर, बघ रे बाबा, ’माबो’ वर येवून...
नावात काय (धमाल) असते ची गंमत.
माबोझा, आतुबो
(माझे बोलणे झाले, आता तुम्ही बोला)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिमा= चिन्मय मांडलेकर
राडा, खंडेराव्,कार्याध्यक्ष = साजिरा. हे हल्ली पोक्त झाल्याने शिंगे मोडून वासरात शिरण्याचे टाळतात.
वैनी= पूनम
झिंटीण, चोप्रीण = प्रीती झिंटा, प्रियंका चोप्रा.
शाखा= शाहरुख खाण.
एलदुगो= एका लग्नाची दुसरी गोष्ट
आ.न गा.पै = हापला ण्हम्र घामा फैल्वाण
बोवाजी= जख्खी= झक्की.
आईने अकबरी = हा लैच भन्नाट विषय आहे.
जुमा= ज्युनिअर माता= आशुडी
( सिनियर ) माता = श्रद्धा =यांची जुण्या शिणेमांची चिरफाड लई चविष्ट अस्तीय
राफा= राहुल फाटक = असे लिखाण होणे नाही= हल्ली गायब
हह= हवाहवाई= जुन्यामायबोलीची स्टार हल्ली गायब. यांची कुजबुज शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकांनाही नीट ऐकू जाते Happy
साबा/ साबु = सासू बाई / सासरे बुवा
दुडदुडबोचके= लहान गोड बाळ
बोचके = बाळ

योकु आणि रॉबिनहूड.. मस्त!
एकूणच मा बो चे सर्व शॉर्टकट छानच!!
सगळ्यात जबरदस्त.. रच्याकने आणि हहगलो..! फुलफॉम सांगितल्या शिवाय कळणे कठीण!!
ग्रेट माबोकर!!

आता इथे आवर्तने होत राहतील Wink

माझी भर :(मला या माबोशब्दांचे अर्थ कोणीतरी सांगितल्याशिवाय कळले नव्हते)

काना : कायदेशीर नातेवाईक =in laws सासरची मंडळी
हाटि = half ticket = मुले

तू मा स मै = तू माझी सख्खी मैत्रीण
तु क = तुच्छ कटाक्ष
रोमात असणे = read only mode मध्ये असणे
झक्की Lol

अरेच्या.. इथे पुन्हा लिहिण्या ऐवजी जुन्या धाग्यांच्या लिंक्स द्या नी नवे शब्द तिथेच अ‍ॅड करा कि.
म्हणजे सगळे शॉर्टकट्स एकाच ठिकाणी राहातील.
या विषयावर २-३ तरी धागे आहेतच.

नवीन असल्याचा फायदा घ्या आणि विचारा एकेक प्रश्न. कमी पडले, टोमणे बसले तर आमच्याकडचे शिल्लक मेगाबाईट्स घ्या (संसदेत करतात तसं )

A aani A meas ehat? Ajun eka kuthalyasha dgyavar me hach prashn vicharla hota. Pan uttara nahi milaley ajun...