ऑनलाईन चांदोबा (इंग्लिशमधे) उपलब्ध! बरेच जुने अंक वाचायला मिळतील!

Submitted by चीकू on 22 July, 2015 - 10:31

ऑनलाईन चांदोबा (इंग्लिशमधे) उपलब्ध!

बरेचसे जुने अंक आहेत अगदी १९५५ पासूनचे.

https://archive.org/details/chandamama_magazine

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचित्र देश, तीन राजकन्या, धूमकेतू, विक्रम वेताळ, देवी भागवत, वीर हनुमान सर्व काही आहे, ओरिजिनल चित्रांसकट Happy
त्याकाळच्या जाहिरातीही आहेत...आता वाचायला खूप मजा वाटते Happy

मन प्रसन्न होऊन गेले अगदी.....१९५५ चा "चंदामामा" पाहिला.....'कॉमेट" ही रंगीत चित्रकथा समोर आल्याआल्या नायकाचे नाव आले "समरसेन". मराठीत "धूमकेतू" नावाने ही कथामाला प्रकाशित होत असे....कथेच्या पूर्वीच अधाशीपणाने प्रथम सारी रंगीत चित्र पाहात बसत असू आम्ही....बाकी सारा अंक कृष्णधवल चित्रांनी भरलेला असायचा. जाहिरातींची तर काय मजा सांगावी..... दोन रुपयांना सात अंक....

१९५५ च्या अंकात शेवटच्या पानावर एक फोटो आहे.....भगभगीत शेतातून, ढेकळांतून आठ दहा स्त्रिया डोक्यावरून पाण्याच्या घागरी घेऊन गावाकडे चालल्या आहेत.....आज २०१५ मध्येही असेच चित्र दिसते.....असो, तो वेगळा विषय आहे.

मराठीतून कथा वाचण्याचा आनंद काही वेगळा आहे हे मात्र प्रकर्षाने जाणवते....

खरं आहे, मराठीची सर नसली तरीही दुधाची तहान ताकावर भागवायची Happy चित्रं तीच आहेत. आत्ता काही अंक परत बघितले, बरीच रंगीत चित्रं आहेत प्रत्येक अंकात आणि सुरेख डिटेलिंग आहे!
दीर्घकथा काही परत वाचल्या.
धूमकेतू (The comet): ही बहुतेक पहिली दीर्घकथा होती, त्यात समरसेन, कुश्भांड, एकाक्ष, चतुराक्ष ही नावे परत वाचायला मिळाली, मस्त वाटलं. चित्रंही सगळी झकास आहेत!
विचित्र देश (Land of crocodile): ही धूमकेतूचीच पुढील आवृत्ती होती. यातही समरसेन आहे.
तिळ्या राजकन्या (The three princesses): यात त्या राजकन्यांची नावं (सुभाषिणी, सुहासिनी, सुकेशिनी) खूप आवडायची!
अजून दोन मालिका शोधत आहे. माया सरोवर (The enchanted pond), मला वाटतं यातच बहुतेक कांचनमाला, सिद्धसाधक, जीववर्मा (का जयवर्मा) ही पात्रं होती. ही माझी सर्वात आवडती दीर्घकथा होती! अजून एक कांशाचा किल्ला म्हणूनही होती, इंग्लिश नाव आठवत नाही.
यात अजून एक दोन उस्ताद (Mother and daughter) अशीही ४-५ भागांची कथा होती, तीही आवडायची.

बाकी देवी भागवत, रामायण, महाभारत, वीर हनुमानही मस्त, आणि चित्रं तर अप्रतीम!

चांदोबा..
त्यातली भूतांची चित्रं, बायकांच्या सोनेरी बुट्ट्या आणि सोनेरी पदर असलेल्या साड्या, भुलभुलैय्या मधल्या नर्तकासारखे दिसणारे सगळे राजपुत्र..
बॅक टु नॉस्टॅल्जिया!!

चांदोबातल्या सर्व दीर्घकथा ऑनलाईन उपलब्ध आहेत PDF फॉर्म मधे. पण त्या तेलगूमधे आहेत Sad त्यातली मायासरोवरची PDF बघितली. तेलगूमधे असल्याने वाचायचा तर प्रश्नच नव्हता. पण मूळ कथा आधी वाचली होती त्यामुळे चित्रं बघताच लिंक लागत गेली Happy चित्रदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर ही घ्या लिंक.
https://archive.org/details/Mayasarovaram

मराठीतून नाही तर इंग्लिशमधल्या शोधायचा प्रयत्न चालू आहे. मिळाल्या की लिंक डकवीन!

भयंकर देश, तीन मांत्रिक (कुणाला पिंगळ, पद्मपाद, भल्लूक केतू आठवतात का?) शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही दिसले. हे साधारण १९८५ च्या जवळपास मराठी चांदोबा मध्ये असायचे. कुणाला दिसले का इथे?

तीन मांत्रिक (कुणाला पिंगळ, पद्मपाद, भल्लूक केतू आठवतात का?) >> आठवतात ना. अजुन तरी ते सापडले नाहीत. १९८५ नंतरचे आर्काईव्ह नाही सापडले. पण इंग्रजी मध्ये जर आधी आले असतील तर माहीती नाही.

तीन मांत्रिक नाहिये बहुतेक तिथे. भयंकर देश म्हणजेच Land of crocodile. त्याचे काही भाग आहेत. तसेच मायावी सरोवरही नाही मिळाले तिथे. बाकी धूमकेतू, तिळ्या राजकन्या आहेत.