आवडणार्‍या मालीका आणि प्रेक्षक

Submitted by नितीनचंद्र on 20 July, 2015 - 08:52

रेडिओवरील श्रुतीका हा दुरदर्शन वरील मालिका याच्या सुरवातीचा प्रकार असावा. यात रेडिओवरील श्रुतीका क्रमाने येणार्‍या फारश्या नसायच्या. यात प्रसिध्द लेखकाने लिहलेल्या लेखनावर किंवा रेडिओसाठी खास लिहीलेल्या श्रुतीका असायच्या.

रेडिओमधले काही कलाकार आधी हिंदी मधे गेले आणि तिथे याच प्रकारची नाट्ये सुरु झाली ज्यात याकुब सईद यांचे नाव अग्रक्रमाने लिहीता येईल. जसे दुरदर्शन मराठी झाले श्वेतांबरा ही पहिली आणि गाजलेली मालीका अद्याप आठवते आहे. कारण अश्या मालिकांचा भडिमार तेव्हा नव्हता. हिंदीवर मग वेगाने मालिका गाजु लागल्या जशी हमलोग आनि त्यानंतर रामायण आणि महाभारत याच्या लोकप्रियतेचा कळस झाला.

रेडिओवरील श्रुतीका लोकांना आपल्या दैनदिन जीवनातील साम्य सांगुन जात आणि त्यामुळे लोकप्रिय होत्या. दुरदर्शनवरच्या अनेक मालीकांचे दैनदिन जीवनाशी अजीबात साम्य नव्हते तरी सुध्दा या मालिका लोकप्रिय होत्या.

काय कारण असावे ? घरच्या घरी मिळणारी दे- मार चित्रपटातुन मिळणार्‍या करमणुकीशिवाय घरची कामे करता करता पहाता येणारी करमणुक की आणखी काही ?

मला ट्रेंड कळेनासा झालाय. माझी मुलगी जेव्हा २२ वर्षांपुर्वी २ -३ वर्षांची होती, तिला मालीकांपेक्षा जाहिराती जास्त आवडत. अनेक वेळा पाहुन सुध्दा ती जाहीरातीच एन्जॉय करत असे.

आजचा मराठी मुलांचा ट्रेंड मी पहातो आहे. दीड वर्षाच्या मुलीपासुन दहा वर्षाच्या मुलापर्यत सर्वच दिल दोस्ती दुनियादारीचे फॅन आहेत. मुल न कंटाळता ११ वाजेपर्यंत जागुन ती सिरीयल पहातात.

विषेश म्हणजे माझ्या शेजारचा मुलगा " मी लेष्मा आहे, मी सालखा ललतो ना " असे म्हणत स्वतःला रिलेट करतो हा प्रकार एक अजबच वाटला.

कॉलेजमधल्या मुलांनी , नोकरी करायला लागेलेल पण लग्न न झालेले तरुण - तरुणी रिलेट करु लागले तर नवल नाही पण हा प्रकार म्हणजे लहान मुलांनी स्वतः या सिरीयल शी रिलेट करावे हे नक्कीच अजब.

मला तरी लोकप्रियतेचा एकही फॉर्म्युला सापडला नाही. कोणती सिरीयल गाजेल आणि कोणती पडेल काही सांगता येत नाही. कोणत्या वयाच्या लोकांना आवडेल आणि कोणते कॅरेक्टर आवडेल याचाही काही फॉर्म्युला नाही. जसे एका लग्नाची दुसरी गोष्ट मधे सतीश तारे ने रंगवलेले बहुदा " माऊली " कॅरेक्टर भाव खाऊन जाते तर पडद्यावर जास्त काळ दिसलेले स्प्रुहा जोशीच्या बॉयफ्रेंड चे कॅरेक्टर लक्षात सुध्दा रहात नाही.

उमेश कामतचा भाव एका लग्नाची च्या दोन्ही भागात चांगला राहीला. खास म्हणजे पहिल्या भागात त्याला लीड रोल नव्हता.

आजकाल च्या सिलीयल्स आधी लिहील्या जातात की जश्या घटना घडतात तश्या पिक्चराइज्ड केल्या जातात हे समजत नाही. उदा. जुळुन येती रेशीमगाठी मधे अर्चनाच्या पायाचे प्लॅस्टर आधी खाजगी जीवनात अ‍ॅक्सीडेंट झाला म्हणुन आले की असे लेखन आधी झाले म्हणुन आले ?

माईंचे मोतीबींदुचे ऑपरेशन सुध्दा असेच वाटते.

दिवाळी, दसरा, होळी गुढीपाडवाच काय पण वटपोर्णीमा सुध्दा त्या त्या वेळेला मालिकांमध्ये आणली जाते. कमला नावाची मालिका माझ्या कल्पनेप्रमाणे महाराष्ट्राच्या पुरोगामी नाटककार विजय तेंडुलकर यांच्या नाटकावर आधारलेली आहे ज्यात वटपोर्णिमा घुसडलेली होती. विजय तेंडुलकर हयात असते तर त्यांनी नक्कीच आक्षेप घेतला असता. प्रेक्षकांनी रिलेट कराव म्हणुन कुठल्या कथानकात काय घुसडावे याचा काही ताळतंत्र राहीला अस मधे मधे जाणवत रहाते.

अत्यंत खाजगी बाब जी पुढे लोकांच्या चर्चेत आली ती श्री आणि जान्हवी यांच्या खाजगी जीवनातील घटस्फोटाची. मालिका खाजगी जीवनात घुसडुन पुढे चालु ठेवल्या जातात की काय पण लोक आवडीने पहातात हे मात्र खरे.

शक्य आहे की जान्हवी आणि श्री चे खाजगी आयुष्यात सेपरेशन प्रोसेस झाले. त्यांना समोरासमोर येऊन सीन देणे सुरवातीला अशक्य झाले असेल. संगम सारखा सिनेमा म्हणे अश्या दुराव्याने लांबला होता. म्हणुन सिरीयलमधे तोच धागा धरुन सिरीयल सुरु ठेवायची ? कलाकारांनाही त्याचे काही वाटत नाही आणि प्रेक्षक तर असले खाजगी जीवनातील प्रसंग आवडीने पहात होते/ आहेत.

काय म्हणाव याला ? सिरीयल्स जास्त सृजनशील झाल्याआहेत आणि कुठल्याही संकटावर मात करुन चालु ठेवण्याची क्षमता लेखक/ दिग्दर्शक आणि निर्मात्याकडे आली आहे की त्या सुरु आहेत कारण प्रेक्षकांच्या जीवनाशी जवळीक साधुन आहेत ?

मला वाटते ही पात्रे आपल्या जीवनात आपण आपल्या कुटुंबातले लोक, व्यवसायातले लोक जसे समाऊन घेतो तसे समाऊन घ्यायची सवय लाऊन घेतली आहे. म्हणुन मालिका संपणार याची हुरहुर काही मालिकांच्या बाबतीत लागते. खास करुन एका लग्नाची दुसरी / तिसरी मधे हा प्रकार जास्त झाला असे मला वाटते.

काही असो मालीका बदलल्या तरी आमच्या जीवनाचा भाग बनुन राहिल्या आहेत हे नक्की.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users