तक्रार

Submitted by vilasrao on 17 July, 2015 - 03:06

उद्दाम झाली ही श्रिमंती ,आमची तक्रार नाही !
जोही दिसे तो एकटा , कोणी कुणाचा यार नाही !

काळीज माझे रोज ती चोरून नेते हे खरे पण
सांगू कशाला? ठेवला मीही पहारेदार नाही !

घेतो न शपथा मी कधी ! कोणी तुला तक्रार केली ?
खोटे असावे बोलतो जे, यासहीआधार नाही !

ओसाड झाली माळराने अन फुले सारी गळाली
ही वादळे सांगून गेली का मला 'ती येणार नाही' ?

आभार कोणाचे कवी हा एवढे मानून गेला ...
की एवढा सन्मान कवितेलाच दारोदार नाही !

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users