IIT आणि USA

Submitted by Mandar Katre on 15 July, 2015 - 11:18

आजकाल आयआयटी / आय आय एम मधील अनेक विद्यार्थ्यांना campus इंटर्व्यू मध्ये किंवा त्यानंतर लगेच सुमारे १ कोटी प्रतिवर्ष पगार देणार्‍या अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या मिळतात . इतरांना देखील गेलाबाजार 10 ते 20 लाख प्रतिवर्ष पगाराचे जॉब अमेरिकेत / परदेशात ऑफर होतात . किंबहुना आयआयटी करणारांचे उद्दीष्ट अमेरिकेत / परदेशात सेटल होणे हेच असते , मग अशा परदेशगमनोच्छुक व परदेश-रहिवासोच्छुक मंडळींच्या शिक्षणाचा खर्च भारतीय करदात्यांच्या पैशातून कशाला?

मला वाटते आयआयटी मध्ये प्रवेश देतानाच पदवीनन्तर ३ ते ५ वर्षे कम्पल्सरी भारतात जॉब करणे बन्धनकारक करावे अथवा अमेरिकेत / परदेशात जॉब करायचा असेल तर नोकरी लागल्यानंतर 3 ते 5 वर्षात त्या विद्यार्थ्यावर आयआयटी / भारत सरकारने केलेला सर्व खर्च भारतीय चलनात परत करण्याचे बंधपत्र करून घ्यावे व ते वसूल करून घ्यावेत ...
दुसरा एक पर्याय म्हणजे फक्त परदेशगमनोच्छुक व परदेश-रहिवासोच्छुक मंडळींच्या सोयीसाठी अलग व पूर्णपणे विना-अनुदानित पण सरकारी आयआयटी / आय आय एम स्थापन करावेत.

आपले काय म्हणणे ? मंडळी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिलीटरी इंजिनियरिंग/ डिफेन्सच्या जोडीला ३-५ वर्षे काम करावे असा काही प्रोग्रॅम केला असता तर देशाला त्याचा उपयोग झाला असता.
<<
नाऊ दॅट, इज अ व्हेरी कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन!

मागच्या बोगस सरकारने हे असे काही मनातही आणले नाही. सध्याच्या प्रोग्रेसिव्ह सरकारने अशी काही पाउले उचलावीत ही आशा. Happy

आपल्या देशातील टॉपमोस्ट व उत्तुंग बुद्धीमत्तेच्या आयायटीयन्सनी देशाच्या संरक्षणाखातर ३ वर्षे सोडा, प्रत्येकी ३ महिने दिलेत तरी कुण्या फिरंग्याची वा म्लेंच्छाची हिंमत होणार नाही पुनः या भारतभूकडे वक्रदृष्टीने पहायची!!

वंदे मातरम!

इब्लिस, दोन दोनदा आयडी मरून झालाय, आतातरी सरळ बोला की! कशाला उगीच वाकड्यात शिरता परत.. तुम्ही जसे परतोनी आलात तसे दुसरी बाजूही आलीच असेल ना डु आयडी घेऊन Happy

फुन्सुक वांगडू साहेबांना याबद्दलची मते सांगण्यासाठी माझ्यातरफे हार्दिक आमंत्रण. Happy यांची आयायटी नक्की कोणती होती?

>>मला वाटते आयआयटी मध्ये प्रवेश देतानाच पदवीनन्तर ३ ते ५ वर्षे कम्पल्सरी भारतात जॉब करणे बन्धनकारक करावे<<

का बुवा? भारतात आयआयटी इंजिनीयर्सचा तुटवडा आहे का? कि जसं युद्धकाळात तरुणांना सक्तीने सैन्यात भरती करतात तसं काहितरी अंमलात आणण्याचा प्रस्ताव आहे?

बाकि सरकार खर्च करते म्हणुन परतावा मिळायलाच हवा, या मुद्दात काहि दम नाहि. उद्या अमेरिकेने स्कॉलरशिप/एड घेणार्या, भारतातुन येणार्या विद्यार्थ्यांना हा नियम लावला तर चालेल का?

वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे हे सगळं मागणी-पुरवठ्याचं गणित आहे. अमेरिकेत ७०-८० च्या दशकात डॉक्टर्सना ग्रीनकार्ड ऑन अरायवल अशी परिस्थिती होती, असं ऐकिवात आहे. तेंव्हा असा आवाज कोणी उठवला होता का?

पराग,

पहिल्यांदा आयडि मेला तो माझ्या बिनडोकपणे लोकांना रिअ‍ॅक्ट होण्यामुळे. दुसर्यांदा चेतन गुगळे यांनी खाजवून काढलेली खरून माबो अ‍ॅडमिन यांनी ४८ तासांवर चिघळत राहू दिल्यानंतर मी स्वत: दिलेल्या उत्तरां मुळे. त्यात माझ्या सोबतीने बेफिकीर यांचाही डूआयडि मेला हे लक्षात घ्या.

सध्या मी कुणाशी वाकड्यात शिरलोय? कुठे आक्षेपार्ह भाषा वापरली आहे?

आयडि मारून टाकणे हा मायबोली मालकांचा हक्क आहे.

माझी मते मांडणे हा माझा.

मी कोणते वाकडे लिहिले इथे???

या इथे लिहिलेल्या मतांना जर वाकड्यात शिरणे म्हणायचे असेल, तर धन्य आहात तुम्ही!

आधीच बोगस सरकार, वैट्टं काँग्रेस सरकार, आत्ताचं सरकार ह्या सगळ्या शद्बांमध्ये विषयाला हवे तसे फाटे फोडायचे सामर्ध्य आहे! शिवाय तुम्ही ते तुमच्या नेहमीच्या म्हणजे सारकास्टीक 'शैलीत' लिहिलं आहे हे कळायला वेगळा भाषाभ्यास करायची गरज नाही. Happy असो..

राज,
सत्तर ऐंशीच्या दशकातही बाँड होताच. माझ्या वर्गातली ३०-४०% मुले परदेशात आहेत. या सर्वांच्या पालकांची बाँड मनी भरण्याची ऐपत होती.
मला स्वतःला एक्सवायझेड पीएचसीत नोकरीचे अपॉइंटमेंट लेटर आले होते, ते मला पीजीला अ‍ॅडमिशन मिळाल्यामुळे सस्पेंड झाले. पीजीनंतर दहा वर्षे शासकीय वैद्यकीय सेवेत बाँडेड कँडिडेट म्हणून सेवा दिल्यानंतर मी स्वत: खासगी वैद्यकीय व्यवसायात आलो आहे. माझा सुरुवातीचा पगार ४८०० (रुपये चार हजार आठशे मात्र) प्रति महिना होता. एफ.वाय.आय.

पराग,
आधीचे सरकार चांगले आहे असे मी म्हणत होतो तेव्हा वैट्ट, दु दु दुत्त होतो.
आता ते सरकार वैट्ट आहे असे म्हणतो आहे तरी तेच???
नेटभगवे आहात का हो तुम्ही?

>>सत्तर ऐंशीच्या दशकातही बाँड होताच<<

तेंवहा आणि आतासुद्धा डाॅक्टर्सचा तुटवडा हेता/आहे, म्हणुन बाॅंड हे लक्शात घ्या. तशी परिस्थिती इंजिनीयर्सची आहे/होती का? हा फरक महत्वाचा आहे...

बॉन्ड त्या आधीही होता. मेडीकल फिल्ड कडे बघताना आरोग्यसेवा या नजरेने बघितले गेले तसे इंजिनियरिंगच्या बाबतीत सेवा करावी या दृष्टीने बघितले गेले नाही. पण योग्य इन्फ्रास्ट्र्क्चर नसेल तर त्या खेड्यात डॉक्टर लोक वीज, पाणी, दळणवळणाची साधने याची वानवा असताना सेवा कशी पुरवणार हा विचारच केला नाही.

कुणावरही कशाचीही सक्ती करू नये. उच्चशिक्षण कुठेही सरकारने सबसिडाईज्ड करू नये, शिष्यवृत्ती द्यायची तर द्यावी. ज्यांना परवडत नाही त्यांना सहज लोन उपलब्ध असावे, ज्याची शिक्षण पूर्ण झाल्यावर व्याज चालू करून परतफेड करावी. मग ती परतफेड, बापाच्या पैशाने करा की स्वतः कमावून. नंतर देशात रहा, विदेशात की चंद्रावर. त्या पैशातून सरकार लोकोपयोगी कामे करेल जसे खेडोपाडी दवाखाने उघडून डॉक्टर पुरवणे इ.
याने, ज्या शिक्षणाने नंतर व्यवस्थित पैसे मिळतील याची खात्री असेल असेच शिक्षण ज्यांची खरंच योग्यता आहे असेच विद्यार्थी घेतील, भारंभार बेकार इंजिनिअर होणारच नाहीत. अर्थात सगळ्या सेवांचा खर्च कदचीत वाढेल, पण ट्याक्स पेअरचा पैसा अधिक मूलभूत गोष्टीत ज्यांना गरज आहे तिकडे वापरला जाईल.

डॉक्टरकडून टॅक्सेस गोळा करतान, कर्जाचे हप्ते वसूल करताना, फायर ऑडिट करताना, त्याला शॉप अ‍ॅक्ट, कंझुमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट लावताना, अशा अनेक बाबी करताना, तो सेवा देतो, हा विचार कुणीच केला नाही. त्यावेळी तो धंदा करतो हेच गृहितक.

सेवा करतो. लोकांना नोकर्‍या देतो. अनेक टॅक्सेस भरतो. याचा विचार कुणी करावा?

असो. अवांतर होते आहे. मी माझेच डॉक्टरी अन्यायांचे तुणतुणे घेऊन बसलोय. त्याबद्दल माफ करा.

तुम्ही लोक आयायटीला बाँड लावावा काय याबद्दल चर्चा करा बुवा. जगात काय मतप्रवाह आहेत ते मलाही समजेल जरा.

>>ओ एम जी! हे वेठबिगारीचे जस्टिफिकेशन?? <<

आता डाॅक्टरकि वेठबिगार का नोबल प्रोफेशन हे तुमच्या द्रुष्टीकोनावर अवलंबुन... Happy

हे वर लिहिलेलं अप्लाईड शाखांना करावे, मूलभूत संशोधनासाठी सुरुवातीला सरकारी/ मग जास्तीत जास्त प्रायव्हेट फंडिंग असावे. संशोधन होऊन पेटंट झाली तर संस्थेच्या नावावर. त्यातही विद्यार्थी देश सोडून गेला तर त्याची मर्जी. नाही मिळाले शिक्षक / विद्यार्थी तर दारं बंद करावी. जबरदस्ती कधीच नको.

<<भारताने मनुष्यबळाकडे प्रॉडक्ट म्हणून पाहिलेले नाही.>>

------ काही आठवड्यान्पुर्वी पन्तप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यान्चे टोरोन्टो येथे सार्वजनिक भाषण झाले. त्या मधे त्यान्नी ह्या विषयावर भाष्य केले. हे भाषण नेट वर मिळेल पण आशय पुढिल प्रमाणे.

भविष्य काळात, जगाच्या कानाकोपर्‍यात कोणात्या प्रकारच्या मनुष्यबळाची गरज लागणार आहे याचा आम्ही अभ्यास करत आहोत (केलेला आहे). आमच्या कडे skill labour मॅपिन्ग (हाच शब्द त्यान्नी वापरला आहे) झाले आहे... जगात सर्वात जास्त तरुणान्ची (< ३५ वर्षे) सन्ख्या भारतात असणार आहे आणि भारत हा सम्पुर्ण जगाला skill labour पुरवण्याचे सामर्थ्य ठेवतो, त्या दृष्टीने आम्ही तयारी केली आहे...

डॉ, इन्जिनियर यान्च्या पेक्षा जास्त सन्खेने कॅब टॅक्सी चालक, टिम हॉरटन (चहाची टपरी), पिझ्झा च्या ठिकाणी काम करायला कामगार वर्गातुन कमी शिकलेली लोक पण येतात.

भारताची लोकसन्ख्या जास्त आहे... पैकी काही लोकान्नी देश सोडला तर फार मोठा फरक पडत नाही. तेवढाच नैसर्गिक साधन सम्पत्तीवरचा (पाणी, सार्वजनिक सोई सुविधा, जागा) भार हलका होतो...

इब्लिस, ebliss - स्वागत Happy

मायबोलीकर तुमच्या अनमोल मताला काही दिवस मुकलेत... असो. पुनश्च स्वागत.

इंजिनियर शिक्षकांनी अशा परतफेडीसाठी काय करावे हे सुचविण्यासाठी मी इंजिनियर असणे गरजेचे आहे. अन्यथा, त्या सुचवण्याला प्रॅक्टिकल अर्थ काहीच नाही. तुम्ही इंजिनियर आहात/असलात, तर तुम्हीच सुचवा की?>>>>> आयला घातल्या का माझ्या तंगड्या माझ्याच गळ्यात. एसा नय करनेका दि मा! Lol

मी सतत सपलाय डिमांड ह्या अँगल्नी बघत असल्यामुळे मला पडलेला तो प्रामाणिक प्रश्न होता. विकुंनी लिहिलय त्या अँगलनी मी कधी विचार नाही केला. इट मेक्स सेन्स, म्हणजे सरकार नी बळच मेडिकल स्टुडंट्सच्या बोकांडी बसवलेली रिक्वायरमेंट वाटते मला आता ती. सक्ती कोणालाच नको खरंतर.

https://www.youtube.com/watch?v=TBk4Z4q1fEg

ह्या व्हिडीयोमध्ये बरेच मुद्दे मांडले आहेत. IIT - GDP - Indian Economy सगळं काही कव्हर केलय.

थोडं गुगल बाबाला विचारलं की माहिती मिळेते Happy

आयायटी इंजिनीयर्सना डिमांड नाही हे नवीन कळले. मग आणखी आयायट्या कशाला उघडताहेत? जगाला दर्जेदार मानवी संसाधनांचा पुरवठा करायला?

MT: ६० वर्षांत IIT, IISचे संशोधन काय?: नारायण मूर्ती
http://maharashtratimes.indiatimes.com//nation/No-invention-earth-shakin... via @maharashtratimes IIT वाले बुध्दिमान असतात असा एक समज आहे.नारायण मुर्ति ह्याच्याशि सहमत नाहि आहेत असे वाटतेय.

नारायण मुर्ती नी IIT, IISचे संशोधन काय असे विचारले आहे. IIT, IIS मध्ये ६० वर्षात काही झाले नाही . IIT ची समीर नावाची संशोधन करणारी संस्था आहे पण त्यानी काही योगदान दिले नाही.

पण याचा अर्थ असा नाही की IIT मध्ये शिकणारी मुले बुध्दिमान नाहीत. IIT, IIS ह्या संस्थानी ह्या मुलाचा संशोधन साठी वापर केला नाही.

>>IIT, IIS ह्या संस्थानी ह्या मुलाचा संशोधन साठी वापर केला नाही.<<

किती मुलं फंडामेंटल/अ‍ॅड्वांस रिसर्च मधे इंट्रेस्टेड आहेत्/होती, हा देखील संशोधनाचा विषय होउ शकतो. सगळ्यांनाच गुगल, फेस्बुक मध्ये नोकरी हवी असते... Happy

मात्र त्या देशात स्वस्तातले लेबर म्हणुनच त्यांची गणना केली जाते.एक मात्र खरे आपल्या देवभूमिला डोलर भूमि भारी पडलिय.
तुम्ही स्वतः किती वर्षे इंग्लंड अमेरिका किंवा इतर देशात राहून हे मत बनवले?
स्वस्त का महाग याला जास्त मह्त्व का कामाची गुणवत्ता महत्वाची? जर दोन अमेरिकन सारख्याच गुणवत्तेचे असून एकाने कमी पगारात नोकरी करण्याचे कबूल केले म्हणून त्याला नोकरी दिली तर लगेच तो स्वस्तातला लेबर होतो का?
आणि लेबर म्हणजे काही कमी महत्वाचा माणूस अशी समजूत फक्त भारतात आहे.
भारतीय लोकसुद्धा जास्त पैसे मागू शकतात नि त्यांची लायकी असेल तर देतातहि. तुम्हाला काय वाटते इथले भारतीय गरीब आहेत? तुम्हाला तुमचे आय टी वाले इतर भारतीयांपेक्षा जास्त श्रीमंत वाटत असतील. इथल्या काही भारतीयांकडे किती पैसा माहित आहे का? इथे किती भारतीय स्वतंत्र उद्योगधंद्यात आहेत हे माहित आहे का? नि इथल्या किती भारतीयांनी भारतात मदत म्हणून किती पैसे दिले हे माहित आहे का?

भारतातल्या किती राजकारण्यांनी, नि इतर लोकांनी भारतातच राहून, "देशाची सेवा" करून स्वित्झर्लंड च्या बँकेत काळा पैसा जमा केला आहे? तशी सेवा करावी अशी अपेक्षा आहे का?

मी अमेरिकेत राहून नोकरी केली आहे, माझ्या अनुभवाप्रमाणे मला तुमचे मत चुकीचे वाटते एव्हढेच.

इंजिनियर शिक्षकांनी अशा परतफेडीसाठी काय करावे हे सुचविण्यासाठी मी इंजिनियर असणे गरजेचे आहे.>>> असं काही नाही दिमा.
इंजिनियर्स पण भरीव मदत करु शकतात , कित्येक खेड्यात , जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगले शिक्षक मिळत नाहीत.
हे इंजिनियर्स इंग्रजी , सायन्स , गणित सारखे विषय शिकवु शकतात.

बुद्धिमान माणसे आपलि बुध्दि आपल्या देशाच्या विकासाकरता न् वापरता विकसित देशान्च्या विकासाकरता वापरतात.

असे ज्या पराजित, निराशावादी भारतीय लोकांना वाटते त्यांच्या अज्ञानाची नि असल्या विचारांची मला कीव येते.

समजा परदेशात गेलेले नि जाणारे खरेच बुद्धिमान असतात असे गृहित धरले (परदेशात येऊन पहाल तर तुम्हाला असे गृहित धरणे फार कठीण वाटेल). तरी अहो, नुसती लोकसंख्या बघीतलीत तर परदेशात आलेल्या भारतीयांच्या कित्येक लाखपट जास्त लोक भारतात आहेत. ते कमी बुद्धिवान असावेत असे का समजता? एका बाजूने परदेशी भारतीयांना तुम्ही स्वस्त लेबर म्हणता नि बुद्धिमानहि म्हणता? अहो स्वस्त लेबर असून जर त्यांना इथे इतके सुखी रहायला जमत असेल तर तुम्ही महाग लेबर बनून भारतातच सुखात राहू शकता! तुम्हाला काय काळजी काही थोडे लोक इकडे तिकडे गेले तर?

असे लोकांना का वाटावे की परदेशात गेले म्हणजे बुद्धिमान असतील? या देशात असे समज मला कधीच आढळले नाहीत.

कदाचित आय आय टी मधून पास झाले म्हणजेच हुषार अशी समजूत आहे का? किती यशस्वी लोक (इतर अनेक क्षेत्रात धरून) आय आय टी मधून पास झाले? देशाची अभूतपूर्व सेवा करणारे किती लोक आय आय टी ऐवजी इतर ठिकाणी शिकले?

उगीचच आपले कुणाला तरी धरून नावे ठेवायची. कधी परदेशातले भारतीय, कधी आय आय टी चे लोक तर कधी आय टी मधे काम करणारे लोक नाहीतर आपले नेहेमीचे भा़जप वाले नि काँग्रेसवाले आहेतच.

करणारे लोक करत रहातात, नाकर्ते, नालायक लोक नुसते बोलत रहातात!

<< IIT ची समीर नावाची संशोधन करणारी संस्था आहे पण त्यानी काही योगदान दिले नाही. >>
---- पवईच्या कॅम्पसमधे समिर आहे... समीर IIT ची सन्स्था आहे ?

http://www.sameer.gov.in/aboutsameer.asp

Pages