गप्पागोष्टी शबरी गटग

Submitted by मुग्धटली on 14 July, 2015 - 01:55

मायबोलीवरच्या गप्पागोष्टी या सुप्रसिद्ध धाग्याच होणार होणार म्हणुन एप्रिलपासुन गाजत असलेल गटग अधिक आषाढ कृ.११ शके १९३६, रवीवार दि. १२.०७.२०१५ रोजी सकाळी ११ वाजता (एकदाच) झाल. सुरुवातीला सर्वानुमते मंजुर करण्यात आलेल्या तारखेला ठरलेल गटग केवळ एका सभासदाच्या अनुपस्थितीच्या आगाउ सुचनेने पुढे ढकलल गेल. (कित्ती कित्ती चांगले आहेत नै पंत) गटग संयोजक/आयोजक बाळाजीपंत यांनी सुरुवातीला सर्वानुमते ठरलेली तारीख, नंतर पुढे ढकलेली तारीख आणि गटगच्या तारखेची प्रेमळ आठवण (मराठीत जेंटल रिमाईंडर) पाठवले. या गटगचे आमंत्रण जुन्या, नव्या अशा सर्व सभासदांना गेले होते. काहींनी आपली उपस्थिती निश्चित असल्याचे लग्गेच सांगितले तर ज्यांच्या मनात आपल्या उपस्थितीविषयी शंका होती त्यांनी मौन बाळगणे इष्ट समजले. होता होता गटगचा दिवस उजाडला..

रवीवार, १२ जुलै २०१५

सकाळी ११:०० वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. धाग्यावरील लाडक व्यक्तिमत्त्व रिया एकटीच बरोब्बर ११:०० वाजता हजर राहीली.. जसाजसा वेळ पुढे सरकत गेला तसेतसे एक एक सदस्य येत गेले. अस्मादिकांनी ई.स्टॅ.टा प्रमाणे ११:३० वाजता हजेरी लावली. त्यावेळी गटग संयोजक/आयोजक बाळाजीपंत, सांगलीचे संस्थानिक श्रीमान अतुल पटवर्धन उर्फ अतुलनीय, गगो पंप्र गिरीश खळदकर उर्फ गिरीकंद उपस्थित होते. मी पोचल्यावर अतुलनीय यांनी स्वतःची ओळख करुन दिली. गिरीला आधीच भेटल्याने त्याला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. रियाने मी कोण ओळख अस म्हणुन परिक्षा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु पहिल्याच प्रयत्नात तिला ओळखुन तो प्रयत्न हाणुन पाडला. (है का नै मी हुश्शार!) बराच वेळ बाहेर बोलत उभ राहील्याने कंटाळुन सर्वांनी शेवटी आत जाउन बसण्याचा निर्णय घेतला. हॉटेलच्या मॅनेजरने सर्वांना वेटींग रुममध्ये बसण्याची विनंती केली. तिथे बसुन गप्पांना सुरुवात झाल्यावर पियुची आठवण निघाली आणि त्याच क्षणी पियुची येंट्री झाली.. आल्या आल्या सर्वांना सुहास्यवदनाने अभिवादन करुन "मुग्गु" म्हणुन माझ्या गळ्यात पडली. तिला बसायला खुर्ची वगैरे उपलब्ध करुन देत सर्वांनी पुन्हा गप्पांना सुरुवात केली.

धाग्यावरील आदर्श सुनबाई "_हर्षा_" अजुन का आली नाही हा प्रश्न सर्वांनाच पडला तेव्हा ती घरुन गटगला येण्यासाठी निघाली असल्याचे तिने सांगितले. (वेळ साधारण ११:३०) शबरीमधील मॅनेजरने आतल्या बाजुस जागा उपलब्ध झाल्याचे सांगताच सर्वांनी तिकडे प्रस्थान केले. तिथे टेबल जोडुन, आवश्यक त्या खुर्च्या उपलब्ध करुन सर्व आपापल्या जागा घेउन बसले. पुन्हा गप्पांना सुरुवात झाली. काही वेळाने विश्याचे आगमन झाले. उपस्थित सर्व पुरुषमंडळींनी त्याला प्रामाणिकपणे आपली ओळख करुन दिली. आम्ही बायकांनी मात्र त्याची फिरकी घेण्याचे ठरवले. त्याने मला ओळखुन मला गप्प केले, परंतु रिया आणि पियुने त्याला अनुक्रमे _हर्षा_ आणि डिविनीता अशी नावे सांगुन गुंडाळले. रियाच नाव हर्षा आहे हे समजल्यावर विश्याच्या चेहर्‍यावर "ही होय हर्षा, मी वेगळच इमॅजिन केल होत" Lol हे भाव स्पष्ट दिसत होते. कदाचित हे ओळखुनच शेवटी रियाने त्याची दया येउन आपापली खरी नावे त्याला सांगितली. नंतर गप्पांच्या ओघात अतुलनीय हे मुळचे सांगलीचे असुन नोकरिनिमित्त पुण्यात स्थाईक झाल्याचे समजले.

पुन्हा एकदा हर्षाची आठवण होउन शेवटी मी तिला फोन करायचा ठरवला. फोन केल्यावर समजल की फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर आली आहे आणि शबरीच्या दिशेनेच येत आहे. (वेळ साधारण १२:१५) मी बाहेर येउन पहाते तर तिच्याबरोबर अजुन एक व्यक्ती येताना दिसली. जवळ आल्यावर समजल की खूप दिवसापासुन गायब असलेली मनीमाउ आज प्रत्यक्ष आलेली होती. (It was a big surprise for everyone) तोपर्यंत पियुला अतिशय भुक लागल्याने तिने तीन-चार वेळा मेन्युकार्ड उघडुन आता ऑर्डर देउया अस सुचवुन बघितल. पण कुणी तिच्याकडे लक्षच दिल नाही आणि आपापल्या गप्पांमध्येच गुंतुन राहीले. हर्षा आणि मनीच आगमन झाल्यावर शेवटी एकदाची ऑर्डर द्यायची अस ठरल. प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार मिसळ, उत्तापा, डोसा असे पदार्थ मागवले. माझा उपास असल्याने आणि घरुन सा.वडे हादडुन आल्याने मी केवळ चिकु मिल्कशेक घेतला. ऑर्डर देउन पुन्हा गप्पा. सर्वांचे पदार्थ आल्यावर धाग्यावरील नवसभासद शब्दालीताईचे आगमन झाले. काही कारणांमुळे तिला यायला उशीर झाला.

सर्वांनी पदार्थांचा आस्वाद घेत घेत गप्पांचाही आस्वाद घेतला. दुसर्‍या राउंडला चहा, कॉफी यासारखे उत्तेजक पेय मागवुन सर्वांनी आपापली क्षुधाशांती केली, फक्त पियु तेवढी अर्धपोटी राहीली. बिच्चारी! बराच वेळ झाला तरी आमच्या गप्पा संपेनात आणि जागाही रिकाम्या होईनात हे बघुन हॉटेलवाल्यांनी नम्रपणे हाकलुन लावले. त्यांच्या नम्रतेचा मान राखत सर्वजण उठुन निघाले व बाहेरील फुटपाथवर येउन पुन्हा गप्पांना सुरुवात केली. तिथे आल्यावर गप्पांच्या ओघात असे समजले की अतुलनीय हे सांगलीच्या संस्थानिक पटवर्धनांपैकी एक आहेत. आपल्या संस्थानिक श्रीमंतीचा आब राखत मोठ्या मनाने TTMM घोषित केलेले गटगच बिल त्यांनीच भरले. बराचवेळ गप्पा झाल्यानंतर गटगचे आयोजक्/संयोजक बाळाजीपंत आणि पंतप्रधान उर्फ गिरीकंद यांनी काढता पाय घेतला. त्यांच्या या वागण्याचा उपस्थित सदस्यांनी हवा तसा अर्थ काढला, परंतु बाळाजीपंतांच्या या वागण्याचे खरे कारण कालच्या गप्पांच्या ओघात समजले. पंतप्रधानांनी काढता पाय घेण्याचे कारण अद्यापी समजले नाही.

असो. अशा रितीने गप्पागोष्टी धाग्याचे शबरी गटग पार पडले. सर्वजण या गटगच्या आठवणी घेउन आपापल्या घरी प्रस्थान करते झाले.

डिस्क्लेमर :- मला आठवेल तसा, जमेल तसा वृत्तांत लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. अनवधानाने काही उल्लेख, प्रसंग लिहायचे राहुन गेल्यास राग मानु नये.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येवढच बोलले का मी रिये? लेख संपादन करुन भलतच कैतरी लिहीन हो रिये लक्षात ठेव आणि नीट पूर्ण सांग तिला.

Lol

मुग्धातै, मला नव्हतं माहीत तू पुण्यात आहेस ते आणि गटगचा ईमेल कोणाकोणाला पाठवलेत ते तर मला तिकडे गटगला जाईपर्यंत माहीत नव्हतं Uhoh
आली असतीस तर बरं झालं असतं पण Sad

विश्या अगदी खर सांग, वृत्तांतात मी तुझ्या एक्स्प्रेशनबद्दल बोलले ते खर आहे ना?

वरील वृत्तांत थोडा परंपरेप्रमाणे पूर्ण करते. Wink
नेहमीप्रमाणेच सगळे आपलेच आहेत, सगळ्यांनी दिवे घेऊनच वाचा. हलकेच घ्या. वै वै. Proud

गगो मालकांच्या आयडीइतक्याच तारखा या गटगसाठी ठरल्या होत्या आणि होता होता हे गटग शेवटी (एकदाचे) पार पडले. अनेक सदस्यांनी चालढकल करत गटगला उपस्थिती लावली. (कोण ते तारखा बदलून येणार नव्हतं आणि संयोजकांचे सल्लागारच येणं रहित करणार होते ते मी सांगणार नैये) Wink
तो माबोगटगदंगायोग यावेळी शबरीच्या हॉटेलमालक व कामगारांच्या भाग्यात होता. नेहमीप्रमाणेच संयोजक व पंप्र तसेच आता मोठी झालेली उर्फ मॅच्युअर्ड वाटत असलेली उर्फ गगोचं 'लाडकं व्यक्तिमत्त्व' असलेली (हो का हो मालकं?) Wink सर्वांचीच बोलकी बाहुली मैत्रिण रीया यांच्या प्रथमपदस्पर्शाने पुण्यपावन झाला तो पुण्याचा एफ सी रोड. हळुहळु सगळेच जमले (म्हणे). मला अंमळ उशीरच झाला पोहोचायला पण याचे कारण मी एका (अर्थातच गोड) स्फोटक व्यक्तीला घेऊन जाणार होते ती व्यक्ती जुजा गगोकर असली तरी निमंत्रित नव्हती. मला मी वेळेत पोहोचत नसल्याबद्दल काही व्यक्तींनी फोन केले, नक्की कुठुन, कशी येते आहेस, पुण्यातून की मंगळावरुन येतेय, चालत निघालीये की कै असे त्यांचे भाव मला दूरध्वनीतूनही जाणवत होते गगोवर निषेधाच्या लाल टिकल्यांची सोय होती आता तीच सोय व्हॉटस अ‍ॅप ने उपलब्ध करून दिल्याने तिथेही एकीने मला लाल टिकली दिली Wink
मी आणि ती गोड स्फोटक व्यक्ती कारस्थान (कारपार्किंग) शोधुन एकदाचे गटगला प्रस्थान करत असतानाचा मुग्धाचा फोन आला व ती आम्हाला घ्यायला बाहेर येऊन थांबली व जिथे दंगा चालु झालाच नव्हता अशा त्या ठिकाणी घेऊन गेली. आम्ही गेल्यागेल्याच पियु नामक आयडीने खाण्याच्या ऑर्डर्स देण्यासाठी चाललेला दंगा एक मिनिटासाठी थांबवून "कोण ती आदीमाया मला बघायची होती" असा प्रश्न टाकून अस्मादिकांना घाबरवून टाकले. मनीमाऊ आलेली बघुन सर्वांना आश्चर्याचा धक्का बसल्याने इतका वेळ मला फोन करून विचारणारे सगळेजण मला विसरून गेले. पुढील दोनच मिनिटांत कोण कोण काय काय खाणार आहेत याची ऑर्डर पियुने दिली.... बाकीच्यांचे पदार्थ आधीच ठरले असल्याने, "मनी आली, तिला एक ग्लास दूध द्या" एवढ्या विनोदावरच ऑर्डर नोंदवली गेली व पियुने हुश्श केले. आम्ही येण्यापूर्वी ह्या सगळ्यांनी फक्त विश्या ला थोडा त्रास दिलेला त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवत होता. महेश, मालक व पंप्र खूप गहन चर्चेत एक कोपरासभा घेत असलेले दिसले. बाकी रिया, पियु व मुग्धा यांचा दंगा दुसर्‍या टोकाला चालु होता... एकीकडे गहन चर्चा व दुसरीकडे लेडिजबायकांच्या गप्पा या संभ्रमात बसलेला विश्या हे असं किती वेळ चालणार या विचारात गुंतला होता. नेहमीचे हौशी छायाचित्रकार 'अतुलनीय' उर्फ अतुलदा उर्फ सांगलीचे संस्थानिक यावेळी कॅमेरा न आणल्याने चुळबुळत दोन्ही गप्पांमध्ये समन्वय साधत असल्याचा प्रयत्न करीत होते. दोन वेगवेगळे ग्रुप पडल्याने अतुलदांनी मला उठवून ग्रुप तोडण्याचा एक क्षीण प्रयत्न केला.... मग नंतर अगदी नविन गगोकर व सर्व खाचाखोचांसहित गगोचा अभ्यास असणारी शब्दालीतै चे आगमन झाले. तिलाही रीयाने, ' मला ओळख?' केल्यावर, तुला ओळखायची कै गरज आहे का? असं म्हणत शब्दालीतै ने रीयाचा माबोअनुभव व्यर्थ घालवला... शब्दालीतै ला काही कारणांनी उशीर झाला असला तरी तिनेही लेडीजबायकांच्यातच बसून गप्पा हाणायला सुरवात केली... तिकडच्या गप्पांचे विषय मला कळलेच नाहीत Sad इकडे यावेळी मालकांच्या केशरी रंगावर चर्चा न होता त्यांचे किती आयडी झाले, ते साधारण काय वयापर्यंत टिकले, कुठली हत्या कशाने झाली वै वै. चर्चा झाली व आता विखार संयमनामुळे कसा फायदा होईल हे बघावे असेही त्यांच्या सल्लागारांनी त्यांस सांगितले.
खाण्याचे पदार्थ आल्यावर थोडी क्षुधाशांती झाल्यावर सर्वांनाच क्षणचित्रे काढण्याची सुरसुरी येऊन गेली... ४/२ अयशस्वी क्षणचित्रे बसल्याजागीच टिपण्याचा मालकांचा प्रयत्न फोल गेला. मग अतुलदांनी तिथेच त्याच हॉटेलमध्ये आलेल्या एका मैत्रिणीला गटग चे फोटो काढण्यास पाचारण केले आणि सर्वच गगोकर आता ह्यांनी कुणाला उठवून आणले असे भाव चेहर्‍यावर दर्शवत तिलाच गोंधळुन टाकले ती त्यांची मैत्रिणच आहे व तिला सर्वांचा फोटो यावा म्हणून विनंती करून मी बोलावले आहे असे सांगितल्यावरच तीला क्षणचित्र टिपता आले.
खानपान झाल्यावर चर्चा, क्षणचित्रे यांना आलेले उधाण बघुन हॉटेलातील कामगार घाबरले असावेत परंतू सोजन्य दाखवत त्यांनी नम्रपणे बिलाचा आदेश हळुच टेबलवर सरकावीत "आता निघणार का?" ही विनंतीवजा सूचना केली मात्र, मालकांच्या मते TTMM (आणि अधिकृत) गटग असल्याचा मुद्दा संस्थानिक पटवर्धनांनी उधळुन लावला आणि बिलाची रक्कम स्वतः भरून सर्वांचा 'लाडका अतुलदादा' हा किताब पटवला. मालक व त्यांचे साथीदार महेश यांनी बिल अतुलदांना मागण्याचा व बिलाची रक्कम विभागून देण्याचा एक क्षीण व प्रेमळ प्रयत्न केला.

तिथुन उठून शबरीच्या बाहेरील फुटपाथवरही थोड्यावेळ गप्पा रंगल्याच परंतू तिथे कंपूशाही न होता गोलाकार उभे राहून सर्वांनीच गप्पांचा आस्वाद घेतला, पियुच बिचारी अर्धपोटी राहिल्याने नाराज होती पण अतुलदांनी तिला लग्गेच हॉटेल आर्यनला येण्याचे विचारल्यावर बिचारी ती गप्प बसली. Proud
तिथेच गप्पांच्या ओघात महेश यांनी त्यांच्या उदार अंतःकरणाचे दर्शन घडवल्याने एक वयस्कर स्त्री माबोकर बनण्यास उत्सुक जाहली Wink व आमच्या गप्पा कान देऊन ऐकु लागली मग मात्र सर्वांनाच आता ही काय आयडी घेऊन माबोवर येईल याची उत्सुकता वाटली. मग नेहमीच्या माबोवरील धागे, वाद आणि धाग्यांच्या जाळ्यावरील रसभरीत चर्चेनंतर रविवारच्या कौटुंबिक जबाबदार्‍यांना थोडे बाजुला ठेवून मी कसा वेळेत आलो आणि "मला ऑलरेडीच खुप उशीर झालाय" चा गजर करत मालकांनी त्यांच्या सल्लागाराबरोबर पलायन केले. मग त्यांवर भाष्य करताना कुटंबातील सहचारिणीचा कोप झाल्यास काय करावे या भितीने मालकांची भितीने उडालेली गाळण व त्यांना आधार देऊन योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पंप्रंचेही गमन झाल्याचे मुग्धा यांनी निदर्शनास आणुन दिले.
आता मात्र मालकांवर थोडी चर्चा रंगली आणि गगोवरील सध्याच्या काही सदस्यांची अनुपस्थिती गटगला जाणवते आहे याची सर्वांनीच नोंद घेतली.
तसेच आम्ही जुन्या गगोकरांच्याही अनुपस्थितीबद्दल खेद दर्शवला, (सर्व नावे घेता येणार नाहीत खूप लोकांना मिस केलं परंतू विशेषतः केदार, शा गं, सचिन यांच्या अनुपस्थितीबद्दल खेद व्यक्त करण्यात आला). दरवेळी गटगला असणारे काही लोक इतक्या लांबुन पुण्यात येतात म्हणुन हा उल्लेख केला गेला आहे हे मी न न क इ. Wink
आता मात्र सर्वांनाच रविवारची दुपार असल्याचे जाणवले परंतू गप्पा सोडून कुणीही जाण्यास तयार नव्हते. नवोदित गगोकर विश्याचे निघायच्या वेळी महेश यांच्याशी सूत जुळले व त्याला अगदी शेवटी कंठ फुटला. (नरेश माने हे गृहस्थ येणार असल्याचे पुसटसे ऐकल्याने मी आल्याबरोबर विश्यालाच 'तू नरेश का?' विचारले) आणि सर्वांच्याच चला निघुया, चला निघुया वर मी व मनीने उरलेल्या सर्वांचा 'ए, तुम्हींही निघा ना आता...' या लाडिक धमकीसह निरोप घेतला. त्यापुढील चर्चा माहित नाही....
तसेच कुणाचाही उल्लेख राहिला असल्यास क्षमस्व!
पुन्हा एकदा सर्वांनी दिवे घ्या रे!!!!

विश्याच्या नजरेतुन वृतांत येवु देत डिटेल.>>> मि पु ढि ल ग ट ग चा वृ तां त न क्कि लि ह ना र .
हर्षा
छान ..... अगदि जशे च्या तसे ........
एकाधा डिश चा फोटो डकवला असता तर ...........

हर्षा, मस्त अ‍ॅडिशन.

एक वयस्कर स्त्री माबोकर बनण्यास उत्सुक जाहली डोळा मारा व आमच्या गप्पा कान देऊन ऐकु लागली मग मात्र सर्वांनाच आता ही काय आयडी घेऊन माबोवर येईल याची उत्सुकता वाटली. >>> मी काल त्याबाजुने जाताना ती मागे मागे येते की काय या भीतीने घाबरत घाबरत गेले. Proud

हर्षा, छानच लिहिलंय.

इकडे यावेळी मालकांच्या केशरी रंगावर चर्चा न होता त्यांचे किती आयडी झाले, ते साधारण काय वयापर्यंत टिकले, कुठली हत्या कशाने झाली वै वै. चर्चा झाली>>>>>>> Proud

मुग्धे, असुदे गं, नव्या लोकांनीच लिहायचा असतो वृत्तांत..तुलाही जमलाय की! धन्स गो.
विश्या, शब्दाली, पंत, नरेश धन्यवाद!!!

Pages