वादसंवाद १ - अ‍ॅम्बिशन अमेरीका

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 July, 2015 - 03:18

वेळ असल्यास सांग, जरा बोलायचंय तुझ्याशी..

बस्स एक मिनिट हां, एवढा मेसेज टाईप करतो..

माझ्यापेक्षा जास्त ईम्पॉर्टंट आहे का तो?

(चाईला).. एक मिनिट
बस्स एक्कच मिनिट..
हं चल झाला.. बोल आता.. ऐकतोय

तो मोबाईल ठेव आधी बाजूला..

च्च.. ठिकाय, चल बोल आता

आपले फ्युचर प्लान्स काय आहेत?

ओह प्लान.. प्लान काय, फिरायला जाऊया कुठेतरी या विकेंडला. सीफेस. नाहीतर पाऊस असेल तर लॉंग ड्राईव्ह.. लोणावळा? वॉट से..

मी विकेंड प्लान नाही विचारत आहे.. तू आपल्या फ्युचर बद्दल काय विचार केला आहेस?

मी येत्या विकेंडच्या पुढच्या फ्युचरचा विचार कधी करत नाही. Happy

तुला सिरीअसली नाहीच बोलायचे आहे का यावर?

यावर? .. कश्यावर?

लग्नानंतर आपण कुठे सेटल होणार आहोत?

कुठे म्हणजे?

मला अ‍ॅब्रोड जायचे आहे. माझे लहानपणापासूनचे ड्रीम आहे ते..

मग जा..

म्हणजे तू नाही येणार..

मी कश्याला, माझे नाही तसले काही ड्रीम..

पण तुला प्रॉब्लेम काय आहे? तुझ्या फिल्डला तिथे खूप स्कोपही आहे. रश्मी सांगत होती मला..

कोण रश्मी? तिचा काय संबंध? आणि कुठेय स्कोप?

युएस.. किंवा युके.

अरे व्वाह म्हणजे डिसाईड सुद्धा केले.

येस्स

पण मला नाही ईंटरेस्ट, ईंडिया सोडून जाण्यात.. आणि मला माझ्या आईवडीलांना सोडूनही जायचे नाहीये.

मग त्यांनाही बरोबर घेऊन जाऊया.

काय संबंध? तुझे स्वप्न आहे अ‍ॅब्रोड सेटल व्हायचे.. त्यासाठी तू मला नेणार.. आणि सोबत माझ्या आईवडिलांनाही. क्या बात है! वाह..

मुलगी लग्नानंतर सोडतेच ना आपल्या आईवडिलांना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे.

कुठचा विषय कुठे नेतेस. तुला लग्नानंतर तुझ्या आईवडिलांपासून वेगळे राहावे लागणार म्हणून मी सुद्धा राहायचे.. आणि एका शहरात वेगळे राहणे आणि वेगळ्याच देशात राहणे यात फरक आहे. नुसते आईवडिलच नाही तर बहिणभाऊ, मित्र मैत्रीणी, नातेवाईक, सारेच ओळखीच्या लोकांपासून दूर जाणे. जिकडे आपल्या कोणीही ओळखीचा नाही तिकडे जाणे. कोणी सांगितलेय.

तुझ्याकडे काही अ‍ॅम्बिशन वगैरे नाही का?

काय अ‍ॅम्बिशन? अ‍ॅब्रोड सेटल होणे हे अ‍ॅम्बिशन असू शकते? अ‍ॅम्बिशन करीअरमध्ये असते. जर तुझ्या फिल्डमध्ये तुला आपल्या देशात स्कोप नसेल आणि त्यासाठी अ‍ॅब्रोडला जावे लागले तर ते ठिक आहे. त्याला अ‍ॅम्बिशन बोलू शकतो. पण अ‍ॅब्रोडलाच जायचे हे कसे अ‍ॅम्बिशन असू शकते..

माझे आहे

ओके, मग जा..

म्हणजे तू नाही येणार माझ्याबरोबर..

नाही.

...."

ओके हे बघ, तुला जर खरेच असे वाटत असेल की बाहेर जाणे हेच तुझ्या आयुष्याचे ध्येय आहे, आणि नाही गेलीस तर आयुष्यभर तुझी ईथे घुसमट होत राहील, तर या कारणास्तव तू माझ्याशी लग्न नाही केलेस तरी चालेल. आपण आताच वेगळे होऊया. ईटस ओके. आय कॅन अंडरस्टॅंड.

ईटस नॉट ओके..
तू मला एक कारण सांग की तुला का नाही जायचेय, काय प्रॉब्लेम आहे?

प्रॉब्लेम काय त्यात, मी नाहीये कम्फर्टेबल असा दुसर्‍या देशात, अनोळखी लोकांत जाऊन राहायला. आणि ईथे सारे सुखात चालू असताना मला त्याची गरजही भासत नाही तर का जाऊ?

का उगाच इमोशनल होत आहेस?

इमोशनल नाही, उलट प्रॅक्टीकल बोलतोय. मला तू अशी अट ठेवलीस की तुझ्याशी लग्न करायचे असेल तर बाहेर जावेच लागेल तर सिरीअसली मला पुन्हा विचार करावा लागेल. आणि म्हणून तुलाही सांगतोय तुझ्यासाठीही हा एवढा महत्वाचा इश्यू असेल तर तु सुद्धा पुन्हा विचार कर. लग्नानंतर पुढेमागे माझे विचार बदलतील वा तू माझे मन वळवशील या आशेवर राहू नकोस.

मला माझ्या मुलांना या देशात नाही वाढवायचेय. बाहेर त्यांना चांगल्या फॅसिलिटी मिळतील.

हे तू आता उगाच वादाला वाद घालतेस. आपण ईथेच राहून वाढलो ना. काय वाईट झाले आपले. आणि मुलांचीच काळजी असेल तर त्यांना चॉईस दे ना. लेट देम डिसाईड कुठे राहायचेय. उलट जन्माला यायच्या आधीच तू मुलांपासून त्यांचा देश तोडायला बघतेस.

असा काही देश तुटत नाही. आपण सुट्ट्यांमध्ये इथे येत जात राहणारच.

हो, फक्त पाहुण्यासारखे. मुलांना आपला देश तोच वाटणार जिथे ते राहणार.
अर्थात यात काही चुकीचे नाहीये, पण होणार हे असेच.

असे गरजेचे नाही. आपण त्यांच्यावर तसे संस्कार करायचे.

कसले संस्कार? आपला खरा देश भारत आहे आणि भारतावर पहिले प्रेम करा हे बिंबवणार त्यांच्या मनावर? मग त्यांनी तुला विचारले की तुम्ही तो देश सोडून का इथे आलात तर काय ऊत्तर देणार? माझे अ‍ॅम्बिशन होते यूएस युकेमध्ये राहणे.

थोडक्यात तुला माझे ऐकायचे नाहीयेच..

ऐकतोय की, पण पटत नाहीये. आपले विचार या बाबतीत टोटली डिफरन्ट आहेत. सिरीअसली... पुन्हा विचार कर.

......"

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>म्हणजे संवाद समतोल (बॅलन्स्ड) आहे असं वाटलं नाही. मुलगी तिची ईच्छा मुलावर लादते आहे असाच सूर सुरुवाती पासुन लागला. तुला तसेच लिहायचं असल्यास लेख जमलाय! पण तिचीही बाजु मांडायची असल्यास ते जमलं नाही असं वाटलं.

प्रेमात पडताना जोडीदाराचे त्याच्या आयुष्यात काय ध्येय आहे ह्या बाबतीत बोलणं झालच नाही हे मला पचल नाही. सर्वसाधारणपणे एकमेकांशी विचार जुळण्याच्या प्रक्रियेत तो एक फॅक्टर येणारच. हे मा वै म.<<<

माफ करा चौकट राजा व तुमच्याप्रमाणेच विचार असलेले इतर प्रतिसाददातेही:

ऋन्मेषना तसेच लिहायचे होते हे तर स्पष्टच आहे. पण फक्त मुलाचीच बाजू मांडली गेली आहे असे वाटले नाही. मुलीनेही तिचे सर्व विचार संयतपणे मांडलेले दिसत आहेत. लेखात झालेली चर्चा ही मुळातच एक संयत चर्चा आहे, चिडचिडीचे प्रमाण अत्यल्प आहे. आता एकाच विशिष्ट बाजूने लिहिणे हे लेखकाचे स्वातंत्र्य आहे आणि त्याने ते चांगले लिहिले आहे हे तुम्हीही मान्य केले आहेत हे उत्तमच!

पणः

प्रेमात पडताना जोडीदाराचे ध्येय काय आहे असा विचार केला जातो असे मला तरी वाटत नाही. तसे केले जात असेल तर ते मनातल्या मनात केलेले अ‍ॅरेंज्ड मॅरेज झाले. ध्येय वगैरे काहीही न पाहता केलेला प्रेमविवाह किंवा तश्या प्रेमविवाहाची कामना काही फार ग्रेट वगैरे असते असे मुळीच म्हणायचे नाही. किंबहुना, सर्व काही पाहून, जोखून केलेले विवाह अधिक तडजोडींनी नटलेले पण तरीही अधिक यशस्वी असू शकतात अशी उदाहरणे पाहण्यात आहेत. पण प्रेमविवाहापुरते बोलायचे झाले तर लग्न होण्याआधीच ही चर्चा झाली हे फार चांगले झाले, हे मत ह्या विशिष्ट ह्या लेखापुरतेच!

चौकट राजा, होय बॅलन्स्ड लेख नाहीये.. पण यापुढे सुरू होणारे विचारचक्र बॅलन्सड असू शकते. Happy

तिला परदेशाची क्रेझ आहे आणि मुलगा तिथे कम्फर्टेबल नाही. लग्न म्हणजे अ‍ॅडजस्टमेंट आलीच पण त्याच्यासाठी एवढी मोठी अ‍ॅडजस्टमेंट सोपी नाही.
पण मुलगीच इच्छा लादतेय असेही नाही. आजच्या तारखेला दोघे भारतात आहेत त्यामुळे मुलीला परदेशात राहणे जस्टीफाय करायचेय ईतकेच.

आणि वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे प्रेमात पडल्यावर एका टप्प्यानंतरच अश्या गोष्टींबद्दल सिरीअसली बोलले जाते.
आणि हे संभाषण म्हणजे त्यांच्यातील या विषयावरचे पहिलेच आहे असेही नाही.
" तुला सिरीअसली नाहीच बोलायचे आहे का यावर? " म्हणजे हा त्यांचा अधूनमधून चालणारा टॉपिक आहे, लग्नाची वेळ जवळ येतेय तसे विषयातील गांभीर्य वाढतेय.

बेफिकीर धन्यवाद,
माझा हा वरचा प्रतिसाद टाकण्यापूर्वी मी आपला वरचा प्रतिसाद वाचला नव्हता, अन्यथा यातीलच काही वाक्ये कोट करत प्लस वन दिला असता. Happy

बेफि, ऋन्मेऽऽष,

आता असं वाटतय कि मी ह्या लेखाची "फेस व्हॅल्यु" वाचुन पुढे जायला हवं होतं. वाचताना जवळच्या काही लोकांची उदाहरणं आठवली आणि त्यांच्याशी तुलना करता लेखातला संवाद काही पचनी पडेना म्हणून उगाच जास्त विचार करत बसलो. व्यक्ती / प्रसंगानुसार हाच संवाद खुप वेगळा होईल किंवा होणारच नाही. मला काय म्हणायचय ते सविस्तर लिहित बसलो तर लेखा एवढा मोठा प्रतिसाद होईल आणि चर्चा वाढत जाईल. तेवढा विचार व चर्चा करायची मला ईच्छा आणि वेळ राहिली नाही.
एकुणच हा संवाद मला फारसा पचला नाही एवढे लिहितो आणि चर्चेला पुर्णविराम देतो. लोभ असावा.

चौकट राजा,
मी देखील काही ओळखीतील एक वा अनेक उदाहरणे घेऊनच हे लिहिलेय. पण अर्थातच व्यक्ती आणि प्रसंगानुरूप हा संवाद बदलणार याच्याशी सहमत. म्हणून आपल्याला जे वाटले ते न खोडता मी जे मांडलेय ते देखील चूक नाही ईतकेच म्हणायचे होते Happy

काय संबंध? तुझे स्वप्न आहे अ‍ॅब्रोड सेटल व्हायचे.. त्यासाठी तू मला नेणार.. आणि सोबत माझ्या आईवडिलांनाही. >>> सर सर सर.... माफ करा. वहीनी राहिल्या ना ?

सुंदर चर्चा..संयतपणे मांडलय.. आणि नशीब आधी clear आहे.. लग्ना नंतर कुठे बाहेर संधी मिळाल्यावर मग दृष्टिकोन बदलला तर काय करणार ना..

अब्रॉड सेटल होणे हे अँबिशन असू शकत नाही.
पण ठराविक देशात सेटल होणे हे असू शकते.

अर्थात आपल्यापेक्षा प्रगत देशात (यू एस, यूके) सेटल होण्याला कुणीही तयार होईलच हे गृहीतक चुकीचे आहे.

@ मानव, हो. एखाद्या वा अनेक ठराविक आवडीच्या देशात सेटल होणे हे ॲम्बिशन असू शकते. म्हणजे एखाद्याचे अमेरीकेत सेटल व्हायचे ॲम्बिशन असेल तर तो त्यासाठी तिथे नोकरी शोधेल वा अमेरीकेची छोकरी शोधेल.

लेखात जेव्हा मुलगा बाहेर जायला तयार नसतो त्यावर ती मुलगी जेव्हा त्याला म्हणते की तुला काही ॲम्बिशन नाही का त्यावर त्याने उत्तर दिले आहे. ॲम्बिशनसाठी जगाच्या पाठीवर कुठेही जायची तयारी त्या मुलाची असेलही. पण जात नाही म्हणजे ॲम्बिशनच नाही असा अर्थ होत नाही. त्याचे जे काही छोटेमोठे ध्येय असेल ते राहत्या घरातही साध्य होत असेल तर ते सोडायची गरज नाही. त्याचे ॲम्बिशन वा ड्रीम बाहेर सेटल होणे नाहीये ईतकेच.

किंबहुना एखाद्याचे ॲम्बिशन त्याच्या राहत्या गावातच सेटल होणेही असू शकते. त्यासाठी तो गावाबाहेरील संधी नाकारून गावातच काही करता येईल का हे बघू शकतो.

आमच्यात एकेकाळी साधारण असा संवाद घडायचा त्यावर हे लिहिले होते. प्रत्येकाच्या घरच्या संवादातील तपशील वेगळा असेल. आज तो जमाना राहिला नाही जे बायको नवऱ्याच्या घरी नांदायला जाते वा दावणीला बांधल्यासारखे त्याच्यासोबत जगभर फिरते. आज जेव्हा नवरा बायको दोघे करीअरचा विचार करतात, तेव्हा असा काही वादसंवाद प्रत्येकाकडे होत असेल, तो वेळीच झालेला ऊत्तम.

आणि हो. सर्व नवीन प्रतिसादांचे धन्यवाद.
च्रप्स यांचेही धन्यवाद Happy

अंबिशन असणारे किती लोक असतील ,आणि फक्त आंबिशन आहे असेच फेकणारे किती असतील.
मला डॉक्टर च बनायचे आहे,मला आयपीएस च बनायचे आहे असे ठरवून किती डॉक्टर आणि आयपीएस बनतात.
अगदी नगण्य..
ठरवून काहीच होत नाही.
फक्त अमेरिकेत जायचे स्वप्न आहे म्हणून कोणी अमेरिकेत पोचत नाही.
जीवनाच्या रस्त्यावर वळण येणे हे अनपेक्षित पणेच घडते
कोणत्या स्थिती मध्ये,कोणत्या ही ठिकाणी settle होण्याची कुवत असणारेच ध्येय वादी असतं

बस कंडक्टर चा अभिनेता बनतो,रस्त्यावर चा फेरीवाला उद्योगपती बनतो.
चांगल्या शाळेत शिकणाऱ्या ,हुशार व्यक्ती आयुष्यात बेरोजगार राहतो .
आणि दहावी पास कोणत्या तरी कंपनीचा मालक असतो.
काही ही घडते.
वरील लेखातील संवाद मध्ये संधी मिळाल्यावर ती साधण्यासाठी धडपड चालू आहे.
स्वार्थी विचारणे केलेला तो संवाद आहे.

Pages