नेताजी सुभाषचंद्र बोस-एक असामान्य व्यक्तिमत्व

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

"हम सब मिलकर आगे बढेंगे, तो सिध्दी प्राप्त होगी ही | हम अपनी दृष्टी को जितनी अधिक ऊपर की तरफ उठायेंगे ,उतना ही हम भुतकाल के कटु अनुभवोंको भुलते जायेंगे और तब भविष्यकाल पूर्ण प्रकाशयुक्त रुप में हमारे सामने प्रकट होगा."
नेताजी सुभाषचंद्र बोस

काल म्हणजे २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती होती . नेताजी सुभाषचंद्र बोस हे इतके महान व्यक्तिमत्व आहे की 'भारताला स्वातंत्र्य कशामुळे/कुणामुळे मिळाले?' या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतल्यास सर्वात पहिले नाव जर कुणाचे येईल तर ते नेताजींचेच अशी त्यांच्याबद्दलची माहीती मिळवल्यावर माझी खात्री झालेली आहे.पण या इतक्या महान देशभक्ताला आमच्या देशाने कृतघ्नपणे अशी वागणुक दिली की त्याला आपल्या आयुष्यातली शेवटची दशके स्वतःची ओळख लपवत काढावी लागली.

um_aerodrome_after_an_eventful_European_tour.jpg
नेताजी सुभाषचंद्र बोस हे स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणिने खुप प्रभावित झाले होते.त्यांच्यावर क्रांतिकारकांचाही खुप प्रभाव होता.आपल्या सुरुवातीच्या राजकीय जीवनात ते गांधीजींबरोबर होते.पण गांधीजींच्या कायदेभंगाला त्यांचा जरी पाठींबा होता तरीही अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळेल यावर त्यांचा विश्वास नव्हता.त्यांच्या मते 'इतिहासात चर्चेतुन कुठलाही फारसा मोठा फरक झालेला नाही.स्वातंत्र्य दिले जात नाही तर ते घेतले जाते.त्याच्यासाठी किंमत द्यावी लागते. आणि ती किंमत म्हणजे रक्त!'पण गांधीजींबद्दल सुभाषबाबुंच्या मनात प्रचंड आदरही होता.गांधीजींशी मतभेद झाल्यानंतरही बर्लिनमधुन त्यांनी दिलेल्या भाषणात त्यांनी गांधीजींना 'राष्ट्रपिता' ही उपाधी दिली.गांधीजींना काँग्रेसमधे असताना एकदा सुभाषबाबुंनी ब्रिटीशांविरुध्द राष्ट्रव्यापी चळवळ उभी करण्याची विनंती केली. हिंसाचार होईल असे गांधीजींना वाटल्याने त्यांनी त्यास नकार दिला.काही लोकांनी सुभाषबाबुंना म्हटले की 'तुम्हीच अशी चळवळ उभी का करत नाही?'तर सुभाषबाबु म्हणाले की 'मी जर बोलावल तर २० लाख लोक सहभागी होतील आणि गांधीजींनी बोलावल तर २० कोटी लोक सहभागी होतील्.' गांधीजींची असलेली लोकप्रियता सुभाषबाबुंना माहित होती ते एकदा म्हणाले होते की गांधीजींची सामान्य जनतेत जितकी लोकप्रियता आहे तितकी जगातल्या इतर कुणाला मिळाली असेल असे मला वाटत नाही.गांधीजींच्या उदाहरणावरुन आणि इतर अभ्यासातुन नेत्याची जनतेत असलेली प्रतिमा जनतेला कार्य करण्यास उद्युक्त करण्यास सर्वात महत्वाची असते असे सुभाषबाबुंचे मत झाले असावे असे वाटते. फॉरवर्ड ब्लॉकला भरपुर प्रसिध्दी देण्यासाठी १० महीन्यात सुभाषबाबुंनी १००० सभा पुर्ण देशभरात घेतल्या होत्या.त्यानंतरच्या जर्मनी आणि जपान मधील त्यांच्या वास्तव्यातही त्यांनी यावर भर दिला.त्यांचे वाढदिवस एखाद्या सणासारखे साजरे केले जात्.आपल्या सैन्याला आपल्यावर पुर्ण विश्वास असावा यासाठी ते काळजी घेत.सिंगापुरमध्ये जुलै १९४३ साली दिलेल्या एका भाषणात त्यांनी म्हटले की "मी हिंदुस्तानाशीच एकनिष्ठ राहिल.मी माझ्या मातृभुमिशी कधीच गद्दारी करणार नाही.मी मातृभुमिसाठीच जगेल तिच्यासाठीच मरेल.मला शिक्षा आणि शारीरीक त्रास देउनही ब्रिटीश मला थांबवु शकले नाहीत.ब्रिटीश मला फितवुही शकत नाहीत आणि मला फसवुही शकत नाहीत. "

नेताजींना त्यांच्या आयुष्यात ११ वेळा अटक झाली होती.त्यांचा भारतीय तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास होता.त्याचबरोबर त्यांनी पाश्चिमात्य विचारांचाही अभ्यास केला होता.त्यांची राजकीय विचारसरणी ही फॅसिझम आणि कम्युनिझम यांचे मिश्रणाची होती.ज्यास त्यांनी 'साम्यवाद' हे नाव दिले होते.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षे तरी authoritarian rule असला पाहिजे असे त्यांचे म्हणने होते.व्यक्तिपेक्षा राष्ट्र महत्वाचे आहे,निस्सीम राष्ट्रवाद अत्यावश्यक आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते.जरीही फॅसिझमला काही अंशी त्यांचा पाठींबा होता तरीही नाझी आक्रमकता आणि वंशवादास त्यांचा विरोध होता.

स्वा.सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलही येथे उल्लेख करावासा वाटतो.सध्या नेताजीम्चे अनेक समर्थक डावे असल्याने ते याच्याकडे दुर्लक्ष करतात.पण हा मुद्दा इतिहासाच्या पानांत महत्वाचा आहे.बोस्-सावरकर यांची भेट झाल्यावर सावरकरांनी त्यांना 'ब्रिटीश अधिकार्‍यांचे पुतळे उखडुन वगैरे क्षुल्लक चळवळी करुन ब्रिटीशांना तुम्ही अटक करण्याची आयतीच संधी देत आहात.त्यापेक्षा दुसर्‍या महायुध्दातील भारतीय युध्दकैद्यांची व ब्रिटीशांच्या शत्रूंची मदत घेउन तुम्ही ब्रिटीशांना देशातुन हाकलुन द्यावे.माझ्या नजरेसमोर असे करु शकणारे जे २-३ भारतीय नेते आहेत त्यापैकी एक तुम्ही आहात.' असे सांगितले.यावर सुभाषबाबुंनी नक्कीच विचार करुन ब्रिटीशांच्या तावडीतुन आपली सुटका करुन नंतर जर्मनी व जपानकडुन मदत मिळवली.सावरकर हे भारतातील 'द्रष्टे नेते' आहेत हे नंतर त्यांनी म्हटले.त्याचबरोबर अंदमानात ब्रिटीशांचा पराभव केल्यावर त्यांनी सेल्युलर जेलला भेट दिली व सावरकरांच्या '१८५७ चे स्वातंत्र्यसमर्'या पुस्तकाच्या हजारो प्रती छापुन त्या भारतीयांमध्ये वाटल्या.

ww209pi9.jpg
नेताजी सुटुन काबुल्,मॉस्को नंतर इटली व जर्मनीत गेले.मुसोलीनी आणि हिटलरची त्यांनी भेट घेतली.त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली.Orlando Mazzota ह्या नावाने ते ओळखले जात होते. जर्मनीमध्ये जर्मन सरकारने त्यांना 'Free India Radio' आणि 'Free India Cente'' सुरु करण्यास मदत केली.Free India Center ने 'जय हिंद' हा नारा दिला तसेच 'जन गण मन' हे राष्ट्रगीत बनवले आणि हिंदुस्तानीला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला.सुभाषबाबुंना 'नेताजी' किंवा Führer ही उपाधी देण्यात आली.जर्मन सरकारच्या मदतीने 'आझाद हिंद सेने'ची स्थापना केली व लष्करी शिक्षण भारतीयांना दिले गेले. सुभाषबाबुंनी स्वतः असे लष्करी शिक्षण घेतले.मार्च १९४२ मध्ये जेंव्हा नेताजी हिटलरला भेटले तेंव्हा त्यांनी भारतातही ब्रिटीशांविरुध्द क्रांतिकारक हल्ला करतील व बाहेरुन जर्मन सैन्य व आझाद हिंद सेना हल्ला करेल असे त्यांनी हिटलरला सुचवले. हिटलरने म्हटले की सशस्त्र असे काही हजारांचे सैन्यही काही लाख निशस्त्र क्रांतिकारकाविरुध्द यशस्वीपणे लढा देउ शकते.नंतर जर्मनीमध्ये हिटलरच्या उपस्थितीत आझाद हिंद सेनेतील सैनिकांना शपथ दिली गेली.त्यामध्ये हिटलरने म्हटले की "तुम्ही आणि तुमचे नेताजी ज्याप्रमाणे स्वतःच्या देशाला परकीय सत्तेला हाकलुन देण्यासाठी ज्या जिद्दीनी प्रयत्न करता आहात त्यावर मी खुष झालो आहे.तुमच्या नेताजींचे स्थान माझ्यापेक्षाही मोठे आहे.जिथे मी ८कोटी जर्मनांचा नेता आहे तिथे तुमचे नेताजी ४०कोटी भारतीयांचे नेते आहेत.सर्व बाजुंनी ते माझ्यापेक्षा मोठे नेते आणि सेनापती आहेत.मी त्यांना सॅल्युट करतो आणि जर्मनी त्यांना सॅल्युट करते.सर्व भारतीयांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी सुभाषबाबुंना त्यांचा führer म्हणुन मान्यता द्यावी.मला यात बिल्कुल शंका नाही की सर्व भारतीयांनी हे केले तर लवकरच भारत स्वतंत्र होईल". जर्मनीचा रशियाने चांगलाच प्रतिकार केल्याने सुभाषबाबुंनी जपानला जाउन त्यांची मदत घ्यायचे ठरवले आणि १३फेब्र.१९४३ साली ते पाणबुडीने जपानला गेले.

जपानमध्ये रासबिहारी बोस या क्रांतिकारकाने आधीच जपानी सरकारच्या मदतीने भारतीयांचे सैन्य उभे केले होते.नेताजी तिथे पोहोचल्यावर त्या सैन्याचे प्रमुख नेताजींना बनवण्यात आले.जपानच्या पंतप्रधान टोजोला नेताजी भेटले.टोजोने भारतीय स्वातंत्र्यचळवळिला पाठींबा दिला. जपान,सिंगापुर ,बर्मा,शहिद्-स्वराज्(अंदमान्-निकोबार्),इंफाळ येथील नेताजींची भाषणे खुप गाजली.जिथेजिथे ते गेले तिथे तिथे त्यांचे भरभरुन स्वागत झाले.५जुलै १९४३ साली आझाद हिंद सेनेचे त्यांनी नेतृत्व स्विकारले.त्यावेळी त्यात १३००० सैनिक होते.नेताजी म्हणाले की ''आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात अभिमानाचा दिवस आहे.एक वेळ अशी होती की लोक म्हणत होते की ब्रिटीश साम्राज्यात सुर्य कधीच मावळणार नाही.पण मी असल्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवला नाही.इतिहासानी मला शिकवले की प्रत्येक साम्राज्य अस्तास जाते.ब्रिटीश साम्राज्याच्या थडग्यावर उभे रहाताना आज लहान मुलालाही याचा विश्वास आहे की ब्रिटीश साम्राज्य आता इतिहासजमा झालेय.या युध्दात कोण जिवंत राहील आणि कोण धारातीर्थी पडेल मला माहीत नाही.पण मला हे नक्कीच माहीत आहे की आपण शेवटी जिंकुच.पण आपले युध्द तेंव्हाच संपेल जेंव्हा ब्रिटिश साम्राज्याच्या दुसर्‍या थडग्यावर म्हणजे दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर आपण परेड करु.हे सैनिकांनो त्यामुळे आपला एकच नारा असला पाहीजे-'चलो दिल्ली ,चलो दिल्ली'.मी नेहमीच असा विचार केला की स्वातंत्र्य मिळवण्यास भारताकडे सर्व गोष्ट्टी आहेत्.पण एक गोष्ट नव्हती,ती म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या सैन्याची.तुम्ही भाग्यवान आहात की भारताच्या पहिल्या सैन्याचे तुम्ही भाग आहात्."नेताजींना प्रचंड प्रतिसाद मिळत होता.लोक स्वतःचे सर्वस्व त्यांना अर्पण करत होते.नेताजींनी अल्पावधीत ४५,००० चे सैन्य उभे केले होते.त्यांना आर्थिक पाठींबाही भरपुर मिळत होता.श्रीमंत भारतीयांना नेताजींनी एकदा म्हटले होते की "तुम्ही लोक मला येउन विचारता की मी ५%-१०% मालमत्ता देउ का?पण जेंव्हा आम्ही सैन्य उभे करतो तेंव्हा सैनिकाला सांगतो की तुझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढ्.त्यांना आम्ही सांगु का की तुझ्या रक्ताच्या १०%पर्यंतच लढ म्हणुन्??गरीब माणस त्यांच्या आयुष्याची सर्व कमाई ,फिक्सेड डीपॉझिट्स सर्व काही देशासाठी देत आहेत्.तुम्हा श्रीमंतांपैकी कोणि आहे का जो आपले सर्वस्व देशासाठी अर्पण करेल?".त्यानंतर इंफाळची मोहीम आखली गेली. नेताजी सैन्याला दिल्लीपर्यंत जाण्यासाठी प्रोत्साहित करत होते.इंफाळवर हल्लेही सुरु झाले होते.आझाद हिंद सेनेने १५०० चौरस किमी चा भाग जिंकला होता व २५० मैल आतपर्यंत सैन्य घुसले होते.इंफाळ पडणार असे दिसु लागले.पण एप्रिल १९४४ मध्ये चित्र पालटले आणि मॉन्सुनच्या आगमनाने तर मोहिमेवर पाणी फिरवले.त्याचबरोबर जपानकडुन मदत येणेही बंद झाले.इंफाळची मोहीम ही दुसर्‍या महायुध्दातील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक ठरली.भुक्,रोगराई,मृत्यु ,पाउस यांची ती एक दुर्दैवी कहाणी ठरली. नेताजी तेथेही खंबीर होते.कधीही बॉम्बहल्ला झाला की ते म्हणत 'माझा जीव घेईल असा बॉम्ब अजुन निर्माण झालेला नाही आहे.'

bhas-Chandra-8__208__20Bose-tokyo-rally-1945.jpg
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तथाकथित अपघाती मृत्युचे गुढ भारतात अनेक वर्ष होते.पण मुखर्जी कमिशनने दिलेल्या रीपोर्टनंतर हे स्पष्ट झाले आहे की त्यावेळी सुभाषबाबुंचा मृत्यु झाला नव्हता.तैवानने अशा प्रकारचा विमान अपघात झालाच नाही हे स्पष्ट केलेय्.असे म्हटले जाते की नेताजी त्यानंतर रशियात गेले होते.तेथे सायबेरीयात त्यांना ठेवले गेले होते.स्टॅलिनच्या मुलीने दिल्लीत पत्रकारांना हे स्पष्ट केले होते.सर्वपल्ली राधाकृष्णनही नेताजींना तेथे भेटले होते असे म्हणतात.त्यानंतर नेताजी चिनमधे गेले होते.त्यानंतर तिबेटमध्ये त्यांनी संन्यास घेतला.१९५६ मध्ये भारत सरकारने हे मान्य केले की जर नेताजी भारतात आले तर त्यांना 'वॉर क्रिमिनल' म्हणुन ब्रिटनला सोपवले जाईल्.त्यानंतर १० वर्षांनी इंदिरा गांधींनीही तेच सांगितले.या सर्व काळामध्ये अनेक नेताजींच्या सहकार्‍यांनी त्यांना बघितले होते.काही जर्मन अधिकार्‍यांनीही त्यांना बघितले होते.त्यानंतर सुभाषबाबु भारतात आले आणि बरेच लोक असे म्हणतात की ते 'भगवानजी' अथवा 'परदा बाबा' या नावानी रहात असत.आनंदमयी मा,अतुल सेन,लीला रॉय,प्रतिभा मोहन रॉय वगैरेंना भगवानजी भेटले.यापैकी बरेच नेताजींना पुर्वीपासुन ओळखत होते.त्याचबरोबर इतरही अनेक नेताजींच्या साथीदारांनी भगवानजी हेच नेताजी आहेत असे सांगितले.पण नंतर भगवानजींनी अनेकांशी भेट नाकारली.नेहरुंच्या मृत्युच्या वेळीही भगवानजी त्यांना श्रध्दांजली वहायला गेले होते व काही वर्तमानपत्रात तसे फोटोही आले होते.गोळवलकर गुरुजींनीही त्यांच्याशी त्यानंतर पत्रव्यवहार केला होता.जनता पार्टीचे खासदार समर गुहा यांनी शपथेनी सांगितले की नेताजी जिवंत आहेत.आणि त्यांनी अनेकांना तसे फोटोही पाठवले.भगवानजी गुहांवर चिडले आणि परत कधीही त्यांना भेटले नाहीत्.मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यावर त्यांनीही विमान अपघातात नेताजींचा मृत्यु झाला हे अमान्य केले.नंतर त्यांनीही 'नेताजी जिवंत आहेत व त्यांनी संन्यास घेतला आहे' असे सांगितले.भगवानजींनी ४ वेळा आपण नेताजी आहोत हे मान्य केले होते.भगवानजींच्या सामानामध्ये नेताजींची जर्मन दुर्बिण व खोसला कमिशनचे सुरेश बोस यांना दिलेले ओरीजिनल समन्सही सापडले.भगवानजी आणि नेताजी दिसायला सारखेच होते असे अनेकांचे मत होते.हस्ताक्षरतज्ञ बी.लाल कपुर यांनी नेताजींचे आणि भगवानजींचे हस्ताक्षर सारखेच आहे असे सांगितले होते त्याचबरोबर नेताजींची पुतणी ललिता बोस यांनीही भगवानजींचे हस्ताक्षर हेच नेताजींचे हस्ताक्षर आहे असे सांगितले.मुखर्जी कमिशन जरी नेताजी विमान अपघातात मारले गेले नाहीत व रेणकोजी मंदिरातील अस्थि त्यांच्या नाहीत असे सांगते तरी पुराव्यांअभावी 'भगवानजी हेच नेताजी आहेत' हे मान्य करत नाही.पण 'हिंदुस्तान टाईम्स्'ने घेतलेल्या शोधानंतर व अनेक नेताजींच्या सहकार्‍यांच्या म्हणन्याप्रमाणे नेताजी हेच भगवानजी होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सर्वात महत्वाचे व्यक्तिमत्व आहे असे मी वर म्हटलेय त्याचे स्पष्टीकरण देतो. नेताजींची इंफाळ मोहिम फसली पण तरीही आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना जेंव्हा भारतात वॉर क्रिमिनल्स म्हणुन आणले गेले तेंव्हा त्यांना जनतेनी प्रचंड पाठींबा दिला.आझाद हिंद सेनेच्या फौजांच्या कर्तुत्वाने ब्रिटीश इंडीयन आर्मीमध्ये एक प्रकारची अपराधीपणाची भावना निर्माण झाली.Commander-in-Chief असलेल्या Claude Auchinleck ने म्हटले की 'भारतीय सैनिकांमध्ये आझाद हिंद सेनेबद्दल आदराची भावना आहे.'त्यानंतर रॉयल इंडीयन अयर फोर्सच्या ५२०० सैनिकांनी आझाद हिंद सेनेच्या जवानांना होणार्‍या शिक्षांच्या निषेधार्थ बंद पुकारला.आणि त्यानंतर हीच बंदाची भुमिका भारतीय सैन्याच्या विविध विभागांमध्ये पसरली.त्याचबरोबर एचएमएस तलवार व जवळजवळ संपुर्ण भारतीय नेव्हीने उठाव केला व युनियन जॅक बर्‍याच जहाजांवरुन उतरवला.त्याचबरोबर मुंबईतील ६,००,०००गिरणि कामगारांनी बंद पुकारला.या व इतर सर्व घटनांकडे ब्रिटीशांचे लक्ष होते. नवनिर्वाचित ब्रिटीश पंतप्रधान क्लिमेंट ऍटली यांनी ब्रिटनच्या संसदेत हे स्पष्ट केले की 'ब्रिटीश भारतीय सैन्य आता काही ब्रिटीश सत्तेच्या ऐकण्यात राहीलेले नाही.त्यामुळे कधीही हे संपुर्ण सैन्य ब्रिटीशांच्या विरुध्द जाउ शकते.व दुसरीकडुन भारतात सैन्य पाठवणे शक्य नाही.त्यामुळे भारताला स्वातंत्र्य देणे ब्रिटनला भाग आहे.'डॉ.आर्.सी.मुजुमदार यांच्या 'हिस्टरी ऑफ बेंगाल' पुस्तकाला कलकत्ता हायकोर्टाच्या न्यायाधिशांनी एक पत्र पाठवले होते ज्यात त्यांनी सांगितले की जेंव्हा ते राज्यपाल होते तेंव्हा पंतप्रधान ऍटलींशी त्यांची कलकत्त्यात भेट झाली.त्यावेळी चक्रवर्तींनी 'गांधीजींच्या 'भारत छोडो' आंदोलनाचा भारताच्या स्वातंत्र्य देण्यात किती वाटा आहे' असे ऍटलींना विचारल्यावर ऍटलींनी उत्तर दिले 'मि-नि-म-ल'.यावरुन हे स्पष्ट होते की आझाद हिंद सेनेच्या उदाहरणाने ब्रिटीश इंडीयन सैन्य आपल्या ऐकण्यात राहीलेले नाही हे ब्रिटीशांना कळल्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले.त्यामुळे साहजिकच नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत सर्वात महत्वाचे योगदान दिल्याचे श्रेय द्यावेच लागेल व त्यांना अशा प्रकारचे सैन्य उभे करणास प्रोत्साहित करणार्‍या स्वा.सावरकरांचे अप्रत्यक्ष योगदान देण्याचे श्रेयही द्यावेच लागेल. कुशल वक्तृत्व्,त्यातुन सैन्याला आपले सर्वस्व देउन धाडस करण्याची प्रेरणा देण्याचे कौशल्य नेताजींमध्ये होते.लेखाचा शेवट नेताजींच्या सिंगापुरमधील एका भाषणाच्या ओळींनी करतो.त्यांचा धिरगंभीर आवाज्,त्यातील हृदयाला भिडणारी भाषा यामुळे आजची परीस्थिती पुर्णपणे वेगळी असुनही अंगावर काटा उभा रहातो. आपल्या देशासाठी रक्त द्या असे सांगताना नेताजी म्हणतात "इस रास्तेपर हमें अपना खुन बहाना है|हमै कुर्बानी खाना है| सब मुश्किलोंका सामना करना है.आखिरमें कामयाबी मिलेगी | इस रास्तेमें हम क्या देंगे?हमारे हातमें है क्या?हमारे रास्तेमें आयेगी भुक,प्यास,तक्लिफें,मुसिबतें..मौत!!कोई नहीं कह सकता है जिन लोग इस जंग मै शरीक होंगे ,उनमेंसे कितने लोग निकलेंगे..जिंदा रहकर|कोई बात नहीं है...हम जिंदा रहेंगे या फिर मरेंगे...कोई बात नही है| सही बात यह है,आम बात यह है के आखिरमें हमारी कामयाबी होगी...हिंदुस्तान आझाद होगा!!!

चिन्मय कुलकर्णी

विषय: 
प्रकार: 

अतिशय उत्कृष्ट छापून सन्ग्रही ठेवावा असा लेख!
इथे लिहिल्याबद्दल चिन्या, तुला शतशः धन्यवाद! Happy
दुर्दैवाने, हा आमचा इतिहास शाळाकॉलेजातून शिकवलाच जात नाही! पुढच्या पिढीला काय माहित होणार?
...;
आपला, लिम्बुटिम्बु

LT यांना मोदक. माहीतीपूर्ण लेख.

खूप छान लेख, चिन्मय !!

अगदी महानायक मध्ये सुद्धा विश्वास पाटील यांनी वरील बरेच विषय दुर्लक्षीत केलेले आहेत.
जर हरकत नसेल तर सन्दर्भ देऊ शकतोस का वरील लेखाचे?

लिंबु,केदार्,चिन्नु,संदिप प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
संदिप नक्की कुठल्या घटनांचे संदर्भ हवे आहेत???
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

फारच छान लेख. उत्क्रुष्ट.

१९५६ मध्ये भारत सरकारने हे मान्य केले की जर नेताजी भारतात आले तर त्यांना 'वॉर क्रिमिनल' म्हणुन ब्रिटनला सोपवले जाईल्.त्यानंतर १० वर्षांनी इंदिरा गांधींनीही तेच सांगितले.

स्वतंत्र भारताच्या सरकारांनी अशी भुमीका घेन्यामागच कारण काय? मला तरी हा शुध्द मुर्खपणा वाटतो.
कदाचित सर्व श्रेय शेवट पर्यन्त गांधीजींनाच मीळाल पहिजे असा हा अट्टाहास दिसतो. ह्या पायी congress नी सावरकर व नेताजींचे फार हाल केले.

धन्यवाद संकेत!!

स्वतंत्र भारताच्या सरकारांनी अशी भुमीका घेन्यामागच कारण काय?
यामागे कारण असे असु शकते- असेही काही लोक म्हणतात की नेताजी जिवंत आहेत हे नेहरुंना माहीत होते.त्यांनी चर्चिलना सांगितले होते की नेताजींना भारतात फाळणीपुर्वी येउ देउ नका. त्यामुळे नेताजी भारतात आले असते तर नेहरुंवर वाईट परीस्थिती येण्याची शक्यता होती त्यामुळे त्यांच्या सरकारनी तशी भ्युमिका घेतली असावी
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

चिन्या परत एकदा चांगला लेख.

स्वतंत्र भारताच्या सरकारांनी अशी भुमीका घेन्यामागच कारण काय? >>

ही भुमीका स्वातंत्र्यापुर्वी पासुन होती. नेताजी इंफाळ मध्ये आल्यावर पंडित जवाहरलाल नेहरु म्हणाले होते, " आझाद हिंद सैन्याशी मी माझा प्राण जाईपर्यंत तलवारीने लढा देईल. "

त्यांचा ह्या वाक्यावर बापूंनी देखील हरकत घेतली नाही. बापुंना जवाहरचा हा लढा मान्य होता का? हे अहिंसेच्या विरोधात होते का?

जवाहरलाल ह्यांना आझाद हिंद सेनेचा सशस्त्र प्रतिकार करावा वाटले ह्याचे काय कारण हे अजुन मला तरी उलगडले नाही.

एकुनातच ह्या सुर्याला तत्कालिन काँग्रेसचे लोक मेणबत्ती समजुन बसले. १९३९ च्या रि इल्केशन मध्ये पट्टभी सितारामय्या ह्या बापूंच्या उमेदवाराचा जेंव्हा नेताजींनी पराभव केला तेंव्हा हा माणूस मेनबत्ती नाही तर सुर्य आहे ह्याची जाण होऊ लागली बहुदा.
ऐवढेच नाहीतर तो पराभव बापूंना स्वतःच वाटला. भरीस भर म्हणून नेताजींनी ब्रिटीशांना ६ महिन्याची मुदत दिली, ती पाळली गेली नाही तर त्याचे वाईट परिनाम होतील अशी तंबीही दिली. मग काय बापूंच्या अहिंसेत हे बसले नाही जवहारची तडफड चालू झाली. बापूंनी आपला हटवादी पणा कायम ठेवत नेताजींना काँग्रेस सोडायला भाग पाडले.

चिन्या हा मुद्दा तू लेखात घ्यायला हवा होतास. नेताजींनी काँग्रेसचे भरपुर काम केले ते अध्यक्षही होते पण बापू व जवाहर मंडळीची त्यांचे पटले नाही त्यामूळे काँग्रेस सोडली. तसेच भगतसिंह, नेताजी सारखे लोक हे साम्यवादी होते. फॉरवर्ड ब्लॉक बद्दलही दोन ओळी लिहायला हव्या होत्यास.

केदार माहिती बद्दल धन्यवाद.
सारंश - Congress मधे स्वातंत्र्या पुर्वीपासुन मतलबी स्वार्थी राजकारण खेळल जात होत.
आणि त्याला नेहरु - गांधी द्वयी सुध्दा जबाबदार होते.

सर्वांना गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा.
स्वातंत्र्याच सुराज्य ह्या ६० वर्षात झाल नाही ह्याच खर कारण हे घाणेरड राजकारण आहे.
स्वातंत्र्या नंतर मोठे झालेले भाजप सारखे पक्षहि ह्याला अपवाद नाहित.
स्वातंत्र्य हे Congress ची जहागीर आहे जी त्यांनी आपल्याला दिली व त्यांना म्हनुन निवडुन देण आपल इति कर्तव्य आहे अशि माननारी आपलि भाबडी जनता आहे Sad
ह्यातुनच पुढे आपल्या साठी राजकारनी आहेत असा समज वाढला. लोकनियुक्त राजकारणी लोकांचे सेवक न बनता राजे झाले. कारण आम्ही त्यांना जाब विचारनच सोडुन दिल.

चिन्मय विषयांतरा बद्दल माफी मागतो. पण आपल्या देशाला अनखी एका राजकीय क्रांतीची गरज आहे. एक नवा पक्ष - नवा विचार आणि नवा नेता आवश्यक आहे.

धन्यवाद केदार

जवाहरलाल ह्यांना आझाद हिंद सेनेचा सशस्त्र प्रतिकार करावा वाटले ह्याचे काय कारण हे अजुन मला तरी उलगडले नाही.
नेताजी भारतात आल्यास नेहरुंना फारसे काही महत्व मिळाले नसते हे नेहरुंना माहीत होते.त्यामुळे असेल बहुतेक.

हा मुद्दा तू लेखात घ्यायला हवा होतास.
या विषयावर एक वेगळा लेख होईल्.शिवाय वाचकांचे लक्ष इतर गोष्टींकडे आणि नेताजींच्या महानतेकडे न जाता या काँट्रोव्हर्शिअल मुद्द्याकडेच गेले असते म्हणुन नाही लिहिले.फॉरवर्ड ब्लॉकतर्फे नताजींनी १००० सभा घेतल्या असे मी लिहिलेय्.पण फॉरवर्ड ब्लॉक हा फारसा यशस्वी प्रयत्न नव्हता असे मला वाटते.भगतसिंग आणि नेताजींमध्ये फरक होता.भगत सिंग कम्युनिस्ट होते तर नेताजींनी कम्युनिझम आणि फॅसिझम यांचे मिश्रणाची थिअरी मांडली होती.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

नेहेमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण लेख आहे रे... फक्त ऐतिहासीक असल्याने एक परीपूर्ण आणि जबाबदार लेख होण्या साठी सर्व "संदर्भ" (पुस्तक, वृत्तपत्र, संग्रह वगैरे) लेखाखाली दिलेस तर उचित होईल..

मस्त चिन्मय. नेताजींबद्दलच्या बर्‍याच (मलातरी) माहिती नसलेल्या बाबींवर प्रकाश टाकलास.. Happy

--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!

धन्यवाद योग आणि साजिरा!!!!!
योग्,बर्‍याच गोष्टी विविध ठिकाणि आलेल्या आहेत्.त्यामुळे नक्की सोर्स माहीत नाही.काही गोष्टी त्यांच्या भाषणांमधील आहेत्,काही त्यांच्या प्त्रांमधील आहेत .फॅसिझम आणि कम्युनिझम बद्दल त्यांच्या 'द इंडीयन स्ट्रगल'मधील आहेत.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

भगवानजींचे चित्र द्यायला हवे होते. लेख माहितीपुर्ण झाला आहे. अभिनंदन!!!!!!

चिन्या चांगलं लिहीलय.

नुकतच महानायक वाचून झालय. गांधींच्या आत्यंतिक हटवादीपणाने आणि नेहरूंच्या स्वत: वर focus ठेवण्याच्या वृत्तीने बरेच जण दुर्लक्षितच राहिले असा feel आला हे पुस्तक वाचून आणि बरच frustration आलं एकूणात.
नेता चूक करू शकत नाही का? आपल्याकडे व्यक्तिपूजा इतकी महत्त्वाची का आहे?

नेताजींच्या अंगात धाडस मुरलं होतं. पण त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन करण्याचं जे धाडस दाखवलं हे जरा out of the way होतं का? यात नेताजींबद्दल अनादर कुठेच नाही. पण एका परक्या देशात परक्या सरकाराच्या मदतीने फौज उभारणं म्हणजे येरागबाळ्याचे काम नाही. किती अनन्वित कष्ट केलेत त्यानी. पण शेवटशेवट फौजेचे झालेले हाल वाचून अंगावर काटा उभा रहातो.

अजून एक म्हणजे प्रचंड कौतुक वाटतं ते नेताजींच्या कार्यासाठी आपलं सर्वस्व त्याग करणार्‍या त्यांच्या साथीदारांचं.

पाटलांनी मात्र नेताजी विमान अपघातातच गेले असं लिहीलय.

आझाद हिंद सेनेवर court marshal करता आले नाही तेंव्हा नेताजी स्वातंत्रोत्तर काळात भारतात परत आले असते तर त्यांना war criminal जाहीर करणे सोपे नसते तेंव्हा हा मुद्दा फारसा पटला नाही. असे लपून छपून दिवस काढणे तेही, ज्या उद्देशासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले ते साध्य झाल्यावर, त्यांच्या overall स्वभावाशीही ते विसंगत वाटते (मला तरी), तेंव्हा विमान अपघात हा जास्त सयुक्तिक वाटतो.

त्यांचा म्रुत्यु विमान अपघातात झाला किंवा त्यानंतर त्यांनी विजनवासात पुढचा काळ घालवला काय, दोन्हीं घटनांचा परिणाम एकच आहे. नेताजींसारखा हुरहुन्नरी लोकप्रिय नेता अजून पुढे जगता (किंवा देशात परत येता) तर भारताचे चित्र वेगळेच दिसले असते. Sad

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद बी,झेलम आणि असामी.
बी,भगवानजींचे फोटो फारसे नाहीयेत्.एक फोटो होता जेंव्हा ते संन्याशाच्या वेशात नेहरूंना श्रध्दांजली वहायला आले होते तेंव्हाचा.पण तो फोटो मला सापडला नाही नेटवर.

नेताजी स्वातंत्रोत्तर काळात भारतात परत आले असते तर त्यांना war criminal जाहीर करणे सोपे नसते तेंव्हा हा मुद्दा फारसा पटला नाही
नेताजी देशात येउ नयेत हे नेहरुंचे मत होते.त्यांना वॉर क्रिमिनल म्हणुन ब्रिटनला सोपवु असे भारताच्या तत्कालिन गृहमंत्री गोविंदवल्लभ पंत यांनी स्पष्ट केले होते.तेच इंदिरा गांधींनि १९६६ साली पुन्हा स्पष्ट केले. नेताजींचा गुन्हा जबरदस्त होता.पहीला म्हणजे त्यांनी ब्रिटनविरुध्द युध्द केल,दुसरा म्हणजे त्यांनी हिटलर आणि टोजोंची मदत घेतली आणि तिसरा म्हणजे स्वतःबरोबर ४५,००० हुन अधिक लोकांना ब्रिटनविरुध्द उभ केल.

तेंव्हा विमान अपघात हा जास्त सयुक्तिक वाटतो.
प्रश्न सयुक्तिकचा नाहीये.प्रश्न आहे की जो विमान अपघात झालाच नाही त्या विमान अपघातात नेताजींचा मृत्यु होउच कसा शकतो???तैवान सरकारनी हे स्पष्ट केलय की असा विमान अपघात झालेलाच नाहीये.
जेंव्हा भारतात फाळणी आणि स्वातंत्र्याच्या घटना चालु होत्या तेंव्हा नेताजी रशियामधे होते.स्टॅलिनने त्यांना तेथे ठेवले होते कारण पुढे गरज पडल्यास ब्रिटीशांविरुध्द त्यांचा उपयोग होउ शकत होता म्हणुन्.फाळणी वगैरे नंतर त्यांचा उपयोग नाही हे कळल्यावर स्टॅलिनने त्यांना सोडले त्यानंतर ते चिनमध्ये गेले.त्यामुळे फाळणी टाळणे त्यांना शक्य नव्हते.दुसरे म्हणजे नंतर त्यांनी संन्यास घेतला.एक संन्यासी आपल्या आधीच्या आयुष्याला सोडुन देउन नविन आयुष्य सुरु करत असतो त्यामुळे बहुतेक भगवानजींनी 'मीच नेताजी आहे' असे pudhe yeun स्पष्ट केले नसावे.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

विमान अपघात हा जास्त सयुक्तिक वाटतो.

त्यांचा म्रुत्यु विमान अपघातात झाला किंवा त्यानंतर त्यांनी विजनवासात पुढचा काळ घालवला काय, दोन्हीं घटनांचा परिणाम एकच आहे >> बरोबर आहे. त्यामूळे त्यांचे पुढे काय झाले हा प्रश्न विचारातच मी घेत नाही. ते पळून जाणारे वाटत नाहीत.

जे धाडस दाखवलं हे जरा out of the way होतं का >>

हो नक्कीच. पण त्यांना हे माहीती होते की परदेशात ब्रिटीश सैन्यासाठी काम करनारे भारतीय त्यांना मदत करतील. "शत्रूचा शत्रु तो आपला मित्र" ह्या उक्तीचा वापर सर्वांनी पहिल्या व दुसर्‍या महायुध्दात केला. म्हणूनच नंतर जर्मनी रशियासारख्या मित्रावर उलटला.
देशात कित्येक नेते असे म्हणत होते की हिच वेळ आहे, ब्रिटीश ऐवीतेवी अडचनीत आलेत तर मग हल्ला बोलू या. गांधीनी नाही सांगीतले. त्यांना ब्रिटीशांवर आलेले संकट हे स्वतःवर आलेले वाटले. मग हिंदु महासभेचे नेते (पक्षी सावरकरांच्या पक्षातले) गांधींवर आग पाखडू लागले.

नेताजींचा व्युह असा होता की इफांळ मधून जेंव्हा सेना भारतभूवर येईल तेंव्हा एत्तदेशीय सैनीक हे आ हि से मध्ये भरती होतील, पण नेहरुं व गांधींनी पत्रके काढून, भाषने देउन त्याला विरोध केला.
हे थोडेफार १८५७ सारखेच होते पण मोठ्या प्रमानावर. नक्कीच सैन्य त्यांना मिळाले असते. शिवाय इंफाळ कडे गोरे सैन्य जास्त पाठवले होते त्यामुळे इंग्रजांनाही ती शंका होतीच. त्यामूळे जास्त गोरे तिकडे गेले.

सशस्त्र क्रांती विरोधात असनारे लोक आणखी एक मुद्दा लावून धरतात तो म्हणजे क्रांती करनार्‍याकंडे नंतर देश चालविन्याचा आराखडा आहे का?
नेताजींकडे होता. त्यांचा विवीध पुस्तकात व त्यांनी काही काला करता स्थापण केलेल्या पक्षातर्फे तो दिला होता. नेताजींची काँग्रेसवरही पकड होती. त्यामुळे सर्व देशभर कॅडर बेस पक्षावर त्यांना सहज अधिकार गाजविता आला असता.

मी इथे ह्या गोष्टी वरवर मांडतोय पण ह्या सर्व गोष्टींचा त्यांनी सखोलात विचार केला असनार.

वल्लभभाई पटेलांवर पण वाच. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६ महिन्यांनतंर पटेल- नेहरू वाद झाला. काँग्रेसचे अनेक मोठे लोक पटेलांची साथ देत होते. ६ महिन्या नंतरच नेहरुंना कदाचित आपले पंतप्रधाणपद गमवावे लागले असते, मग ते परत रडत इंग्रजांकडे गेले व त्यांनी माऊंटबॅटन ह्यांना परत लक्ष घालायला सांगीतले. आपल्या देशाचे नशिब की माऊंटबॅटन नाही म्हणाले. लहान मुल चिडले की आई बाबा कडे जसे जातात तसे नेहरु गोर्या लोकांकडे गेले. पटेल माणूस मोठा, म्हणून त्यांनी माघार घेतली.

चिन्या तुझा लेख मी हायजॅक करत नाहीये पण झेलमच्या प्रतिक्रियेला पुरेशी माहीती द्यावी वाटली म्हणून.

ते पळून जाणारे वाटत नाहीत.

ते पुढे आले नाहीत म्हणजे ते पळपुटे झाले असे म्हणने साफ मुर्खपणाचे आहे.सावरकर विरोधकही त्यांच्यावर अंदमानानंतर काय वगैरे प्रश्न विचारुन ते स्वातंत्र्य्वईर नव्हतेच वगैरे चहाटळ बदबड करत असतात्. नेताजी पुढे का आले नाहीत याची नक्की कारणे माहीत नाहीत पण मला तरी संन्यास घेतल्यानंतर संन्याशाने जुन आयुष्य विसरायच असत हे कारण जास्त बरोबर वाटत्.बाकी ते पुढे का आले नाहीत हे त्यांनाच माहीत्.पण ते पुढे आले नाहीत म्हणजे ते अपघातातच मृत्युमुखी पडले हे मानणे जेंव्हा त्याच्याविरुध्द अनेक पुरावे उपलब्ध असुनही हे मला तरी साफ चुक वाटते.तथाकथित अपघातानंतरचे जे शरीर मिळाले होते त्यात व्यक्तिचा चेहरा दिसत नव्हता तसेच त्यानंतरही आझाद हिंद सेनेचे काही सैनिकांनी नेताजींना पाहिले होते.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

>आझाद हिंद सेनेवर court marshal करता आले नाही तेंव्हा नेताजी स्वातंत्रोत्तर काळात भारतात परत आले असते तर त्यांना war criminal जाहीर करणे सोपे नसते तेंव्हा हा मुद्दा फारसा पटला नाही. असे लपून छपून दिवस काढणे तेही, ज्या उद्देशासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले ते साध्य झाल्यावर, त्यांच्या overall स्वभावाशीही ते विसंगत वाटते (मला तरी), तेंव्हा विमान अपघात हा जास्त सयुक्तिक वाटतो.

असाम्या,
totally absurd!! काहीच सयुक्तीकपणा वाटत नाही या विधानात.. Happy मुख्ख्य म्हणजे ते भावनेवर जास्त आधारीत वाटते त्या उलट नेताजी नंतरही जगले, इतरांन्ना भेटले याची उदाहरणे(पुरावे) चिन्या ने लेखात दिली आहेत ती जास्त compelling वाटतात.. आणि नेताजी परत आले असते तर भारताचे भविष्य फार काही बदलले असते असे मला तरी वाटत नाही. त्यांच्या अनुपस्थितीतही कितीतरी कुशल अन चांगले नेते तेव्हा भारतात होते पण काँग्रेस ने व्यक्तीगत (नेहेरू, गांधी) हिताचे राजकरण खेळून सर्व धुळीस मिळवले.

योग्,बरोबर आहे.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

माहितीबद्दल धन्यवाद केदार. आता बघेन काही पुस्तकं मिळतात का ते.

चिन्या तू जसे पुरावे दिलेत तसेच त्याच्या विरुद्ध पुरावेही आहेत. तेंव्हा मला तरी (हे खास योग साठी) त्यापुढचा भाग वैयक्तिक धारणेचा वाटतो. ज्याला जे पटेल ते खरे.

>त्याच्या विरुद्ध पुरावेही आहेत
असाम्या,
इथे ते पुरावे लिहीलेस/संदर्भ दिलेस तर बरं होईल... कारण पुरावा हा वस्तुनिष्ठ असतो (असावा). त्यामुळे ज्याला जे पटेल ते खरे असे कसे म्हणता येईल..?

योग मला ह्यावर वाद घालायचा नाहिये. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही असे माझे मत आहे. (हवे असतील तर तुही ते पुरावे सहज शोधू शकतोस.)

असामी,ते सर्व पुरावे मुखर्जी कमिशननी विचारात घेउनच निकाल दिला आहे की तथाकथित विमान अपघातात नेताजींचा मृत्यु झाला नाही.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

>योग मला ह्यावर वाद घालायचा नाहिये. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही असे माझे मत आहे. (हवे असतील तर तुही ते पुरावे सहज शोधू शकतोस.)
अरे महाराजा, वाद घालायला इथे वेळ कुणाला आहे..?:) तू नेताजी अपघातात गेले हे conclusively म्हणत होतास त्यामुळे पुरावे द्यायची जबाबदारी ओघाने तुझ्यावरच आली ना.. मी कशाला शोधत बसू..?:)
नाहीतर मग सरळ पुरावे नाहियेत म्हणावं Wink
असो.

योग माझे post परत एकदा नीट वाच आणी मी काय म्हटलय ते समजून घे (मला सयुक्तिक वाटतय ???) आणी मग काय पुराव्याने शाबीत करायचे ते कर. ह्यालाच मी नसता वाद घालणे म्हणतोय. असो ही माझी शेवटची post तुला उद्देशून.

रेडिफ वर २००५ मधे अनिता बोस यांची मुलाखत ३ सदरात प्रसिद्ध झालेली आहे. नेताजींशी त्यांची १९४२ मधे शेवटची भेट झाली, त्यावेळी त्यांचे वय केवळ चार आठवडे होते.

http://in.rediff.com/news/2005/may/11inter1.htm

स्वातंत्र्यपुर्व काळात Indian Civil Services (ICS)च्या परि़क्षेत ते चौथे आले असतांना देखील त्यांनी आरामदायी जगणे पसंत केले नाही (जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ICS अर्धवट सोडले असे माझ्या वाचण्यात आले आहे). नेताजींवर स्वातंत्र्य पुर्व तसेच त्या नंतरच्या काळातही घोर अन्याय झालेलाच आहे याची पदोपदी जाण होते. आजही त्यांच्या मृत्यु बद्दल सामान्य भारतीय अंधारात आहे, मोठे प्रश्न चिन्ह आहेच. त्यांच्या मृत्य बद्दलची सरकारी कागदे गहाळ आहेत वा नष्ट केली गेली आहेत (असे मुखर्जीं कमीशनला सांगण्यात आले होते).

चिन्या- चांगला स्तुत्य उपक्रम. एव्हढे कष्ट घेतच आहेस तर तुला जिथे पण शक्य आहे तेथे संदर्भ टाकता (लिंक्स) येतील कां? वाचणार्‍यास मदत तर होईलच पण खोटा प्रसार थांबण्यास हात-भार लागेल. वर वर्णन केलेल्या घटनांचा (रॉयल इंडीयन अयर फोर्सच्या सैनिकांचा पाठिंबा, मुंबईतील ६,००,०००गिरणि कामगारांनी बंद पुकारला....) भारतास स्वातंत्र्य मिळवुन देण्यात मोलाचा वाटा (turning point) आहे असे मला वाटते. निव्वळ चले जाव म्हटल्याने ब्रिटिश गेले असे होत नाही.

उदय,

अनिता बोस यांची मुलाखत खरचं वाचनिय आहे. इथे संकेतस्थळ दिलेस त्याबद्दल धन्यवाद.

Pages