वेदने तुला न अंत का ?

Submitted by vilasrao on 10 July, 2015 - 11:31

वर्तमान त्रासला जरा
भूतकाळ जागला जरा

खंजिरा तुला सरावली
पाठ म्हणत आपला जरा !

स्वाभिमान काय तो असा
जर नसून जागला जरा !

वेदने तुला न अंत का
जो नशेत भासला जरा

मित्र एक भेटता खरा
धीर वाटला मला जरा

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्तमान त्रासला जरा
भूतकाळ जागला जरा

मित्र एक भेटला खरा
धीर वाटला मला जरा

वरिल दोन्ही शेर आवड्ले.