सिंह्स्थ गुरु आणि त्या निमीत्ताने राशी भविष्य

Submitted by नितीनचंद्र on 10 July, 2015 - 01:09

गुरु आणि शनी ह्या ग्रहांच्या राशी बदलानंतर एक मोठा कालखंडात आपल्याला जाणवेल इतका बदल आपल्या आयुष्यात घडताना दिसतो. यामुळे मला शनी किंवा गुरु च्या बदलानंतरचे राशी भविष्य लिहीण्याची इच्छा होते.

साधारण पणे १३ महिन्यांनी आणि प्रत्येक कॅलेंडर वर्षात गुरुचे एकदा राश्यांतर होत असते. या वर्षी १६ जुलैला हे राश्यांतर घडत आहे. १६ जुलैला गुरु स्वत:च्या उच्च राशीतुन ( कर्क या राशीच्या बाहेर येऊन ) सिंह ह्या राशीत प्रवेश करतो आहे.

सिंह राशीत गुरु धनु किंवा मीन या स्व:राशीत किंवा कर्क या उच्च राशीत जितका प्रभावी असतो तसा असत नाही. कोणत्याही पत्रीकेत शुक्र कलत्र म्हणजे ( पुरुषाच्या पत्रीकेत पत्नी तर स्त्री च्या पत्रीकेत पुरुष ) असतो. शुक्रावर गुरुचा प्रभाव वाढला म्हणजे विवाहाचे निर्णय होतात. प्रत्यक्ष विवाह समारंभ म्हणजे एक मोठा इव्हेंट असतो. लग्न काळात वधु/वरांच्या राशीला गुरु जर आठवा किंवा बारावा असताना हा इव्हेंट घडताना अडथळे येतात. हवा तो हॉल उपलब्ध नसणे, अपेक्शीत केटरिंग कॉन्ट्रॅक्टर उपलब्ध नसणे, पत्रीका वेळेवर छापुन न येणे अश्या अनेक गोष्टींचे को- ऑर्डीनेशन बिघडवणारा योग म्हणजे वधु/वरांना गुरु बळ नसणे. विधीवत गुरुप्रतिमा पुजनाने हे गुरुबळ मिळते असे शास्त्र सांगते परंतु लग्न पार पडणे ही वधु पित्याच्या पेशन्सची परिक्षा असते असा वैयक्तीक अनुभव मी घेतला.

सिंह राशीत गुरु असताना सिंहास्त नावाचे पर्व आहे असे पुर्वी म्हणले जायचे. बारा राशी पैकी या एकाच राशीत गुरु असताना विवाह करुच नयेत असा दंडक पुर्वीच्या काळी होता. नाईलाज असेल तर गुरुप्रतिमा पुजन करावे असा उपायही होता. आताशा याला फ़ारसे न जुमानता विवाह घडतात. संशोधन या दृष्टीने वधुपित्यांनी अनुभवावा तसेच नियोजन करताना सर्व बाजुंचा विचार करावा. कॉन्टेजन्सी प्लॅनींग असाही विचार करुन ठेवायला हरकत नाही.

याच बरोबर जुन्या ग्रंथात या विषयी काय सांगीतले आहे ते पाहु.

उद्यानचूडाव्रतबन्धदीक्षा विवाहयात्रा च वधूप्रवेश : ।

तडागकूपत्रिदशप्रतिष्ठा बृहस्पतौ सिंहगते न कुर्यात् ॥

गुरुशुक्रांच्या अस्तांत जीं कृत्यें करूं नयेत म्हणून वर लिहिलें आहे , तीं कृत्यें सिंहराशीस गुरु असतांनाही करूं नयेत .

सिंहस्थ गुरूविषयीं अपवाद .

सिंहे गुरौ सिंहलवे विवाहो नेष्टोथ गोदोत्तरतश्च यावत् ।

भागीरथीयाम्यतटे हि दोषो नान्यत्र देशे तपनेऽपि मेषे ॥

गोदावर्युत्तरतो यावद्भागीरथं तटं याम्यम् ।

तत्रं विवाहो नेष्टः सिंहस्थे देवपतिपूज्ये ॥

भागीरथ्युत्तरे कूले गौतम्या दक्षिणे तटे ।

विवाहो व्रतबन्धो वा सिंहस्थेज्ये न दुष्यति ॥

सिंहराशीला गुरु असून सिंह नवांशी असेल त्या वेळीं मात्र विवाह करूं नये , म्हणजे सिंह राशीच्या इतर नवांशांत गुरु असतां गोदावरीच्या दक्षिणभागांत विवाह केला असतां सिंहस्थाचा दोष नाहीं . गोदावरी आणि भागीरथी ह्या दोन नद्यांमधील प्रदेशांत मात्र विवाहादि शुभकार्यांना सिंहस्थाचा दोष आहे . इतर देशांत नाहीं . तसेंच , सिंहस्थांत मेषराशीला सूर्य असतां सिंहस्थाचा दोष नाहीं ( याचाच अर्थ १४ एप्रील २०१६ ते १४ मे २०१६ या काळात विवाह केला तरी चालेल ) गंगागोदावरीच्या मध्यवर्ती प्रदेशांत मात्र सिंहस्थ गुरूचा दोष मानावा , अर्थात् गोदावरीच्या दक्षिण भागांत व भागीरथीच्या उत्तरभागांत सिंहस्थ गुरूचा दोष मानूं नये . ( याचाच अर्थ मध्यप्रदेशात सिंहस्थाचा दोष आहे. याच बरोबर विदर्भातले बरेचसे जिल्हे या दोषाने बाधीत होतात. ) सिंहस्थाचे तीन अपवाद आहेत . परंतु देशाचाराप्रमाणें आचरण करावे . देशाचाराची म्हणजे समानाची संमति असेल तर शास्त्राची हरकत नाहीं . इतकेंच येथें सांगितलें आहे .

मुलांना जन्म देण्याचे नियोजन जर करत असाल तर सिंहेतल्या गुरुबदलानंतर जरा विचार करायला हवा. साधारण एप्रील २०१६ ते ऑगस्ट २०१६ या काळात गुरुच्या जोडीला राहु सिंहेत येईल. ज्योतिषाच्या परिभाषेत याला चांडाळयोग असे म्हणतात. या काळात जन्मलेली व्यक्ती मग कोणत्याही लग्नावर असो, धर्मभ्रष्ट तर असेलच पण सुखी असेल असे सांगवत नाही.

आता राशीवार भविष्य पाहु.

मेष : आपल्या पंचमस्थानातुन गुरुचे भ्रमण आहे. विद्यार्थी असाल तर आपली शैक्षणीक पात्रता वाढणार आहे हे निश्चित. बारावी नंतर हव्या त्या ब्रॅचला प्रवेश मिळण्यास अडथळे असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणी अचानक दुर होताना दिसतील. मेष राशीच्या पालकांना पाल्याच्या प्रगतीबाबत चिंता असेल तर किमान ह्या वर्षी दिलासा मिळेल. २०१५ सहामाहीचे रिझल्ट्स समाधान कारक असतील. राहुमुळे वार्षीक परिक्षेचे निकाल बिघडु नये असे वाटत असेल तर तेव्हा लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.

पंचमातल्या गुरुची दृष्टी भाग्यस्थान, लाभस्थान आणि लग्नावर सुध्दा आहे. आपल्या हातुन धार्मिक कृत्ये घडतील. आपले उत्पन्न वाढेल आणि आपल्या व्यक्तीमत्वात काही महत्वाचे बदल नक्कीच दिसतील. ३१ जानेवारी २०१६ पुर्वी महत्वाची शुभकार्ये पुर्ण केलेली बरी. असेही गुरुला सिंहेत फ़ारसे बळ नसत त्यात राहु या राशीत आल्याने आणखी वाईट परिस्थीती होताना दिसेल. जुन २०१६ ते जुलै २०१६ या काळात ही तिव्रता वाढलेली असेल.

वृषभ : आपल्या चतुर्थ स्थानामधुन गुरुचे भ्रमण आहे. कार नसेल तर कार घ्याल, लहान असेल तर मोठी घ्याल. घर विकत घेण्याचे योगही येत आहेत फ़क्त राहु भयाने ३१ जानेवारी २०१६ पुर्वी कृती करा असा सल्ला जरुर द्यावासा वाटतो. हे सर्व करणार म्हणजे खर्च होणार हे सांगणे नको.
नोकरी व्यवसायात बदल घडताना दिसतील. नोकरीत अधिकार वाढेल आणि जबाबदारी सुध्दा वाढेल हे तर ओघानेच आले. या गुरुची दृष्टी दशम व्यय आणि अष्टम स्थानावर आहे. अचानक धनलाभाचे योग सिंहेत गुरु असताना दिसतील.

मिथुन : गुरु बदलाने मोठे सन्मान होताना दिसतील. लेखक - प्रकाशक असाल तर पुस्तकांचे प्रकाशन मार्गी लागेल. अधिक अवृत्या निघतील. कॉलेजवीरांच्या मित्र/ मैत्रीणींची संख्या वाढणार हे नक्की. दैनंदीन लहान प्रवास करणारे थोडेसे वैतागणार आहेत. प्रवासाचा कालावधी या ना त्या कारणाने वाढणार आहे. पार्टनर शिप व्यवसायात वृध्दी होताना दिसेल तसेच उत्पन्नही वाढेल हे सांगणे नको. आपण पुरुष असाल तर आपल्या पत्नीचा कार्यभार वाढल्याने घराचे ताळतंत्र बिघडलेले दिसेल. तर स्त्री असाल तर पतीबरोबर सिनेमाला/ नाटकाला जाणे जरा विसराच. नवरा वेळेवर घरी येण्यापेक्शा आज घरी आला यात समाधान मानणे इष्ट.

कर्क : या वर्षी कुटुंबातील व्यक्तींची संख्या एकाने वाढणार हे नक्की. या वर्षी आपल्या रोकड/ एफ़ डी च्या संख्येत वाढ होणार हे नक्की आहे. सोन्याचा भाव काहीही असो गुंतवणुकीचे योग येणार आहेत. गोडाधोडाचे जेवणाचे योग काही ना काही कारणाने वाढतील तेव्हा नियमीत स्व:तचे वजन तपासणे करावे लागणार आहे हे सांगणे नको. आपल्या कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढणार आहेच या बरोबर आपल्याला रिपोर्ट करणारे सुध्दा वाढणार असल्याने कोणाला काय काम सोपवायचे याचे नियोजन करावे लागेल.

सिंह. आपल्या स्वत:च्या राशीत गुरुचे भ्रमण आहे. बारावा गुरुने मागील वर्षभर खर्चाचे प्रमाण बिघडवले होते ते आता नियंत्रणात येईल. वर्षभर मन प्रसन्न राहील. गोड खा अगर खाऊ नका वजन वाढणार आहे तेव्हा नियंत्रणाचा विचार असु द्यावा. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती चांगली होईल. वार्षीक परिक्षेत मात्र लक्षपुर्वक पेपर लिहावा. रोल नंबर लिहीण्याचा विसरला. पुरवणी जोडायची विसरली अश्या घटना आजकाल ऐकु येत नाहीत. पण परिक्षेचा पॅटर्न बदलला हे हमखास घडते हे गृहीत धरुन नियोजन करा. परीक्षा संपल्यावर प्रवासाचे योग येणारच आहेत.

कन्या : बारावा गुरु वर्षभर सतावेल. खर्चाचे प्रमाण वाढवेल याच बरोबर चिंता सतावेल. प्रवास घडेल पण तिर्थ यात्रांचे प्रमाण जास्त असेल. काही खर्च विनाकारण तर काही नियोजन बध्द असतील. घर बांधण्याचा विचार असेल तर या वर्षात प्लॉट घेणे जमेल. दुसरी बाजु अचानक धनलाभाची आ्हे. शेअर्स ची विक्री, आयुर्विम्याच्या पॉलीसी तुम्हाला पैसे देऊन जाणार आहेत त्यामुळे खर्च वाढला तरी ओढाताण कमी असेल.
अध्यात्मीक आवड असणारे यावर्षी अध्यात्मीक प्रगती वेगाने कराल. ध्यान सहज लागेल. दिव्य दर्शने घडण्याचा हा काळ आहे.

तुळ : दशमातुन लाभात गुरु आल्याने मागचे वर्षभर पळापळ होती ती कमी होऊन आता त्याचे निकाल हातात येतील. आपल्या अपेक्षेप्रमाणे प्राप्ती वाढण्याचे योग आहेत. व्यापार वृध्दीचे योग आहेत. लेखन करणारे या वर्षभरात भरपुर लिहु शकतील. स्पर्धा या परिक्षेत यश नक्की संपादन कराल. या ना त्या कारणाने प्रवासाचे योग आहेत. तरुणांना अनेक मित्र/ मैत्रीण लाभतील.

वृश्चिक : दशमातला गुरु कार्यभार वाढवेल. आपल्याला कामात व्यग्र ठेवेल आणि सातत्याने कामाविषयी विचार करायला भाग पाडेल. याच बरोबर दशम स्थानातला गुरु अर्थ त्रिकाणातल्या धन स्थानावर आणि षष्ठ स्थानावर दृष्टी टाकेल. आपले उत्पन्न वाढेल. रोख रक्कम शिलकी पडेल याच बरोबर आपल्यावर अवलंबुन असलेल्या नोकर मंडळींची संख्या वाढेल किंवा पगारवाढीची मागणी पुढे येईल. काम भरपुर असल्याने या मागणीचा विचार करणे अनिवार्य असेल. रोख रक्कम हातात आल्याने नविन वहान किंवा सुखाची साधने घरात आणण्याचे आपले स्वप्न पुर्ण होऊ शकेल.

धनु : भाग्य स्थानातुन गुरुचे भ्रमण एक वर्ष असताना परदेश गमनाची संधी चालुन न आली तर नवलच. याच बरोबर आपल्याला तिर्थयात्रा करण्याचे, संत दर्शनाचे योग ही येत आहेत. महाराष्ट्रात घडत असलेला नाशीकचा सिंहस्थ सोहळा या पैकी एक असल्यास धनु राशीच्या लोकांना पर्वणी आहे. संततीला भरभराटीचे योग आहेत तसेच आपले व्यक्तीमत्व सुध्दा या योगाने सुधारेल. हे वर्ष आपल्याला नवीन उमेद घेऊन येईल. लिखाण करण्याचे योग येतील. लेखन झाले असेल तर प्रकाशक लाभेल.

मकर : आपल्या अष्टम स्थानातुन होणारे गुरुचे भ्रमण आपल्याला काही काळ मागे घेऊन जाईल. नोकरीत / व्यवसायात अनेक अडथळे येतील. नोकरी व्यवसायाच्या माध्यमातुन येणारे उत्पन्न मनाजोगे असणार नाही. असे असले तरी जुन्या गुंतवणुकीतल्या शेअर्स चा भाव वधारेल. हे उत्पन्न कॅश करावयाचे असल्यास वर्षभर हे योग असतील. योग्य विचार करुन हा निर्णय घ्यायला हरकत नाही. जुन्या इन्शुरन्स पॉलीसी सुध्दा चांगले उत्पन्न या काळात देऊन जातील त्यामुळे चणचण भासणार नाही. आपण जर अध्यात्मीक विचारांचे असाल तर या वर्षी आपली प्रगती आहे.

कुंभ : आपल्या सप्तम स्थानातुन गुरुचे भ्रमण होत असल्याने विवाह व्हावा असे वाटत असेल तर या वर्षी विवाह जमेल. तो वर्षभर करायचा की पुढे ढकलायचा हा निर्णय आपला असेल. मित्र मैत्रीणींच्या सह छोट्या प्रवासाचे योग वारंवार येतील. आपल्या पत्रीकेत जर बुध अनुकुल असेल तर प्रेमाचा प्रस्ताव मांडला जाऊन तो स्विकारला सुध्दा जाईल. एक वेगळाच कालखंड तरुण - तरुणी या निमीत्ताने अनुभवतील.

मीन : अर्थ त्रिकोणाच्या महत्वाच्या सहाव्या स्थानातुन गुरुचे भ्रमण आहे. काही केसेस कोर्टात प्रलंबीत असतील तर सामोपचाराने त्या संपतील. शत्रु तुमच्या प्रगतीच्या आलेखाने नमते घेईल. या यशाने आपले नोकरीतले/ व्यवसायातले स्थान मजबुत होईल. नवीन व्यावसायीक संधी चालुन येतील. धन स्थानावर गुरुची दृष्टी असल्याने रोख/ रोकड खिशात खुळखुळेल. घरात शुभ कार्ये घडुन येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितीनचन्द्र भरपूर धन्यवाद तुम्हाला. तुम्हालाही शुभेच्छा. येते वर्ष तुम्हालाही सुख-समाधानाचे आणी आरोग्याचे जावो.

झकासराव,

गुरु सिंह राशीत असताना ताकदवान नसतो. सिंह राशीत गुरु असताना विवाह कोणत्याही राशीच्या वधु / वरांचा विवाह करावयाचा झाल्यास काय करावे हे टेक्नीकल वर दिलेले आहे. तुमचे लग्न झालेले आहे त्यामुळे काळजी नसावी.

सुरवातीचं टेक्निकल काहि कळाल नाही.
राशी भविष्य वाचुन बरं वाटल.>>>>> +१

माझे सुध्दा लग्न झालेले आहे, म्हणून नो प्रॉब्लेम.:)

सिंहराशीला गुरु असून सिंह नवांशी असेल त्या वेळीं मात्र विवाह करूं नये , म्हणजे सिंह राशीच्या इतर नवांशांत गुरु असतां गोदावरीच्या दक्षिणभागांत विवाह केला असतां सिंहस्थाचा दोष नाहीं . गोदावरी आणि भागीरथी ह्या दोन नद्यांमधील प्रदेशांत मात्र विवाहादि शुभकार्यांना सिंहस्थाचा दोष आहे . इतर देशांत नाहीं . तसेंच , सिंहस्थांत मेषराशीला सूर्य असतां सिंहस्थाचा दोष नाहीं ( याचाच अर्थ १४ एप्रील २०१६ ते १४ मे २०१६ या काळात विवाह केला तरी चालेल ) गंगागोदावरीच्या मध्यवर्ती प्रदेशांत मात्र सिंहस्थ गुरूचा दोष मानावा , अर्थात् गोदावरीच्या दक्षिण भागांत व भागीरथीच्या उत्तरभागांत सिंहस्थ गुरूचा दोष मानूं नये . ( याचाच अर्थ मध्यप्रदेशात सिंहस्थाचा दोष आहे. याच बरोबर विदर्भातले बरेचसे जिल्हे या दोषाने बाधीत होतात. ) सिंहस्थाचे तीन अपवाद आहेत . परंतु देशाचाराप्रमाणें आचरण करावे . देशाचाराची म्हणजे समानाची संमति असेल तर शास्त्राची हरकत नाहीं . इतकेंच येथें सांगितलें आहे .

हा टेक्नीकल भाग विस्ताराने समजेल असा लिहावा ही अपेक्षा आहे का ?

मागच्या सिंहस्थाच्या वेळी आमच्या गुरुजींशी खेळीमेळीची चर्चा चालू असता (मुहूर्ताविषयी बोलणे चालू होते) ते म्हणाले, अहो कसला दोष नि काय. सिंहस्थ म्हणजे सर्व ब्रह्मवृंदांना पर्वणि असते. या काळात गोदातीरी पुष्कळ कार्ये, दानधर्म होतो. म्हणून जुन्या काळी उत्तर महाराष्ट्रातला ब्रह्मवृंद गोदातीरी मुक्काम ठोकून असे. त्यामुळे इतरांना विवाहादि कार्यासाठी भटजी मिळत नसत. शिवाय सगळे गुरुजी विवाहादि कार्यांत अडकून पडले तर गोदातीरीच्या धर्मकार्याला मुकतील म्हणून हा निर्णय झाला असावा.
अर्थात ही गंमतच असावी.

>>> अर्थात ही गंमतच असावी. <<<
हीरा... सविस्तर मजकुर लिहिल्यानंतरचे हे वाक्य वाचून गंमत वाटली.

होय, ही नुसती गंमतच नव्हे तर अत्यंत घृणास्पद खोडसाळ गंमत आहे ब्राह्मणांविरुद्धची.
आधिचे वर्णन तर असे केलय जसे काही "पूर्वीच्या काळी" जेव्हा वाहतुकीच्या सोईही नव्हत्या, तरी आख्ख्या महाराष्ट्रातले ब्राह्मण उठून धन्द्याकरता गोदातिरी जमत. अन त्यामुळे म्हणे बाकि विधींना ब्राह्मण नाही म्हणून मुहुर्त नाही. हे वर्णन वा युक्तिवाद कसल्याही वस्तुनिष्ठ तर्कावर आधारित नसून निव्वळ ब्राह्मण व हिंदूधर्म यातिल रितीरिवाजांवर्/शास्त्रावर सडक्या मेंदुने केलेली अश्लाघ्य टीका आहे, जी निव्वळ "वरवरती" वाचुन हल्लीचे तथाकथित सुशिक्षित ब्राह्मण पण या रेम्या डोक्याच्या री मधे री ओढत रहातात, तर बाकी समाजाचे बोलायलाच नको.

या धाग्याचा हा विषय नाही, व धागा माझा नाही, सबब इथेच थांबतो.

साधारण एप्रील २०१६ ते ऑगस्ट २०१६ या काळात गुरुच्या जोडीला राहु सिंहेत येईल. ज्योतिषाच्या परिभाषेत याला चांडाळयोग असे म्हणतात. या काळात जन्मलेली व्यक्ती मग कोणत्याही लग्नावर असो, धर्मभ्रष्ट तर असेलच पण सुखी असेल असे सांगवत नाही.>> म्हणजे नेमके काय? या काळात जन्माला आलेले मुल वाईट वर्तनाचे असेल.. असं का?

साधारण एप्रील २०१६ ते ऑगस्ट २०१६ या काळात गुरुच्या जोडीला राहु सिंहेत येईल. ज्योतिषाच्या परिभाषेत याला चांडाळयोग असे म्हणतात. या काळात जन्मलेली व्यक्ती मग कोणत्याही लग्नावर असो, धर्मभ्रष्ट तर असेलच पण सुखी असेल असे सांगवत नाही.>> म्हणजे नेमके काय? या काळात जन्माला आलेले मुल वाईट वर्तनाचे असेल.. असं का?>>>>>>>> कृपया सांगाल का?

माझ्या मते गुरू राहू शनि हे हळूहळू भ्रमण करतात ते अमुक एक युती वगैरे योगात /जवळ इत्यादी बराच काळ राहतात.त्या चार पाच महिन्यांत ( उदा वरील चांडाळ योग वगैरे) बय्राच मुलांच्या कुंडलीत येईल.रोज बारा स्थाने बदलेल त्याप्रमाणे त्यास्थानाच्या फलात फक्त दोष उत्पन्न होण्याची शक्यता अधिक.हल्ली मूल योग्य(?)वेळी जन्माला घालण्याचे खूळ वाढले असल्याने अशा काही ज्योतिषी टिप्सचा वापर करण्याकडे कल वाढतो आहे.