आयुष्यातला वेस्ट ऑफ टाईम .,~/~,.

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 July, 2015 - 16:46

सारे डिजाईन तयार होते. कॅलक्युलेशन रिपोर्ट सुद्धा रेडी होता. बस्स, सबमिट करायच्या आधी एक शेवटची प्रूफ चेकींग चालू होती. इतक्यात क्लायंटकडून मेल आला. ईनपुट रिवाईज झाले आहे. बराचसा डाटा चेंज झाला आहे. आता पुन्हा नवीन वॅल्यू घेऊन डिजाईन करा. म्हणजे आधी जे केले, तेच ते पुन्हा करा. अर्थात त्याचे कंपनीला एक्स्ट्रा पैसे मिळणार होते, माझा पगार नेहमीसारखाच चालू असणार होता, वेळप्रसंगी ओव्हरटाईम करावा लागल्यास त्याचेही ज्यादा पैसे मिळणार होते. पण, नवीन काहीच शिकायला मिळणार नव्हते, ना नवीन काम केल्याचा आनंद त्यात होता.

आधी जी केली ती ईंजिनीअरींग होती, आणि आता जी करावी लागणार ती खर्डेघाशी होती.

..........................................

सकाळी घाईघाईत ईंडिकेटरवर विश्वास ठेवत ट्रेन कुठली आहे हे न बघता धावतच तिच्यात चढलो. खिडकीची जागा पकडून झोपी गेलो. पुढे कधीतरी जाग आली आणि अनोळखी स्टेशन बघून लक्षात आले की आपण भलतीच ट्रेन पकडलीय. मग तिथून पुन्हा मागे जा आणि पुन्हा फिरून आपल्या इच्छित स्थळी.

गरज नसताना उगाचच ट्रेनच्या गर्दीतून घडलेला प्रवास. त्या गर्दीचा त्रास होण्याबरोबर उगाचच वेळ फुकट गेला याचीच खंत जास्त.

..........................................

सरकारी कार्यालयात कसलेसे काम होते, पण ऑफिसची वेळ आणि त्या कार्यालयाची वेळ नेमकी एकच असल्याने मुहुर्त मिळत नव्हता. एकेदिवशी खास हाल्फ’डे टाकून ते काम उरकायचे ठरवले. पण तिथे जाऊन पाहतो तर काय., नेमके त्याच दिवशी संबंधित अधिकारी सुट्टीवर गेला होता.

माझ्या सुट्टीचा मात्र अर्धाएक दिवस, ना कसली मजा करत, ना कसलेही काम उरकता, फुकट गेला होता. आणि पुन्हा याच कामासाठी आणखी एक सुट्टी खर्च करावी लागणार होती.

..........................................

सहा दिवस ऑफिसमध्ये मरमरून काम केल्यानंतर रविवारी सकाळी,. अंह दुपारपर्यंत, मस्त ताणून द्यायची होती. पण दूरदेशी ऑस्ट्रेलियामध्ये, भारतातल्या भल्या पहाटे खेळली जाणारी क्रिकेट मॅच या भल्या माणसाला चुकवायची नव्हती. अलार्म न लावताही अर्ली मॉर्निंग जाग आली, अन मोबाईलवर स्कोर चेक केला तर सामना रंगतदार अवस्थेत आला होता. झोप तर काय दुपारीही घेता येईल, त्या आधी एका ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार होऊया म्हणत बाहेर येऊन टिव्हीसमोर बसलो. पण थोड्याच वेळात त्या दूरदेशी ऑस्ट्रेलियावर ढग दाटून आले. अन पावसाची रिमझिम सुरू झाली. बस्स आता थोड्यावेळात सामना सुरू होईल म्हणता म्हणता भारतात चक्क उजाडले देखील. आईने उठून चहा करून दिला आणि आंघोळीला पिटाळले. पण सामना काही शेवटपर्यंत झालाच नाही.

एकवेळ सामना सुरू होऊन आपण हरलो असतो तरी परवडले असते, पण त्या संभाव्य पराभवापेक्षाही आपल्या झोपेचे खोबरे झाले हिच चुटपुट मनाला जास्त लागून राहिली.

...

काही दिवसांपूर्वीच पहिल्या पावसाच्या तडाख्यात मुंबई लोकल ठप्प झाली, ज्यावर मी "मुंबईकरांचे अच्छे दिन केव्हा येणार" असा धागा सुद्धा काढला होता. अश्या रखडलेल्या लोकल ट्रेनमध्ये अडकलेले असताना मनस्थिती नेमकी अशीच असते की काहीही भव्यदिव्य उदात्त न घडता वेळ उगाचच खर्च होत आहे.

हे वरचे सारे आणि आणखीही बरेच काही, माझ्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात फ्रिक्वेंटली घडणारे किस्से आहेत. साल्ली चार दिन कि झिंदगानी; उससे भी कम ये जवानी; कितीतरी अशीच फुकट जाते. ज्यात पैसा आणि श्रम फुकट जाण्यापेक्षा आयुष्यातील बहुमूल्य असा वेळ फुकट गेलाय याचीच टाचणी जास्त लागते.

असेच काहीसे, पण..
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा वेस्ट ऑफ टाईम होते बारावीचे वर्ष!

वर्षभर मी ना दंगा केला, ना मस्ती केली. ना कसला छंद जोपासला, ना कसल्या नादाला लागलो. ना कुठले व्यसन, ना कुठले प्रेमप्रकरण.. आणि तरीही, बारावीच्या मुलाने जे करणे अपेक्षित असते, तो अभ्यास देखील नाही केला. वर्ष अखेरीस त्या वाया गेलेल्या वर्षाची भरपाई करण्यासाठी परीक्षा न देता गॅप घेतली आणि आणखी एक वर्ष अभ्यास करून पुढच्या वर्षी ती परीक्षा दिली.
... पण विशेष काही तारे नाही तोडले. जेवढे गुण माझी ठिकठाक हुशारी पाहता मला पहिल्याच वर्षात मिळणे अपेक्षित होते तेवढेच मी अतिरीक्त वर्ष खर्च करत कमावले.. थोडक्यात एक अख्खे शैक्षणिक वर्ष गमावले!

खरे तर नापास होणार्‍या वर्षातही आपण ईतर दुनियादारी आणि बरेच काही शिकतो. पण मी माझ्या मनाशी प्रामाणिक आहे की मी तसेही विशेष काही शिकलो नाही. त्यामुळे ते वाया गेलेले वर्ष निव्वळ शैक्षणिक नसून आयुष्यातील वाया गेलेले एक वर्ष होते.. आणि कदाचित त्यामुळेच मला त्यानंतरही ते कित्येक काळ छळत होते.

शैक्षणिक कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर असेच जाणवत होते की जिथे मी आज आहे तिथे एक वर्ष आधीच असायला हवे होते. अगदी मी ठरवून दुप्पट जोमाने अभ्यास केला असता तरी चार वर्षांची डिग्री तीन वर्षांत होणार नव्हती. त्यामुळे ते वाटणे कायमच माझ्या सोबत राहणार होते ज्याचे मी काहीही करू शकणार नव्हतो.

पण आज कॉलेजच्या बाहेर मोकळ्या जगात आल्यावर त्या फुकट गेलेल्या वर्षाच्या दुखवट्यातील फोलपणा जाणवला. कारण ईथे प्रत्येक जण आपल्याला हव्या त्या वेगाने स्पर्धेत उतरू शकतो. ठरवले तर कोणाला जे वीस-पंचवीस वर्षात नाही साध्य करता येत ते ध्येय एखादा दोन वर्षातही गाठू शकतो. ईथे एखादे वर्ष अगदी पार फुकट गेले तरी पुढच्या वर्षी दुप्पट चौपट जोमाने त्याची भरपाई करायला मैदानात ऊतरू शकतो. एवढेच नव्हे तर आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर नवी सुरुवात करू शकतो, आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो.

आज हे अचानक सारे विस्कळीतपणे आठवायचे, जाणवायचे कारण ...
कारण आज मला मायबोलीवर संपूर्ण एक वर्ष होत आहे..

त्या दिवशी एका धाग्यावर विषय निघाल्याने मी सहज चेक केले तेव्हा मला हे समजले. अन्यथा ईतर कोणी सांगता यावर विश्वासच बसला नसता.
कसा बसणार,
कधी वाटते, आपण अजूनही ईथे नवीनच आहोत. जे मोजून चार लोकं ओळखतात आपल्याला. अन जेमतेम चौदा लोकांनी विचारपूस केली असेल या वर्षभरात..
तर कधी वाटते, नसेना कोणी फारसे ओळखत आपल्याला. पण आपण तर ईथल्या प्रत्येकाला ओळखतो हे पुरेसे नाही का. ओळखतच नाही तर जाणतो देखील.. कोण कुठल्या धाग्यावर कशी पोस्ट टाकणार हे देखील आता समजू लागले आहे.
ईतके सारे धागे झाले आहेत माझे, की ते मोजणे देखील आज मला वेस्ट ऑफ टाईम वाटतेय. कारण या वर्षभरातील माझी कमाई ते धागे नसून त्या धाग्यांवरील प्रतिसाद आहेत, ईतरांचे माहितीपुर्ण लेख, कथा अन कविता आहेत ज्याने माझा माहितीचा साठा समृद्ध आणि मनोरंजनाचा कोटा सुफल संपुर्ण झाला आहे., होत आहे., होत राहील.. आणि म्हणूनच तुम्हा सर्वांचा धन्यवाद आहे., आणि राहील.. दोन टक्क्यांचा ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साल्ली चार दिन कि झिंदगानी; उससे भी कम ये जवानी; कितीतरी अशीच फुकट जाते >>> खरं आहे. इथे इतके धागे काढण्यात कशाला वेळ घालवतोस मग?

एक धागा सुखाचा नी शम्भर धागे रुन्म्याचे अशा जरतारी वस्त्र नेसलेल्या मायबोलीवर हा धागा वाचुन
पन्धरा मिनटे वेस्ट केली! जरा पण दु:ख झाले नाही.
वेस्ट टाइम इज बेस्ट टाइम Happy

आजपर्यंत तरी केलेला नाही कारण सदरहू लेखकूंचा एकही धागा पूर्ण वाचलेला नाही.
आणि पुढे वाचणारही नाही अशी प्रतिज्ञा आधीच केली आहे.

(ही प्रतिक्रिया केवळ टायटल वाचून दिलेली आहे).

अरे वा! ऋन्मेष, माबोवाढदिवसाच्या शुभेच्छा!
एका वर्षात किती झाले धागे मग?
अर्थात पहिल्याच एका वर्षात जास्तीत जास्त धागे काढण्याचा विक्रम बहुतेक मोडला नसशील तू अजून.
आणि आता कुणीतरी तो पहिला विक्रमही मोडण्याच्या मार्गावर आहे.

मी तर तुला फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डसारखं 'बेस्ट डेब्यू (मेल) मायाबोली अ‍ॅवॉर्ड ' देईन.

ऋन्मेऽऽष....
मा. बो. वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
>>ईतके सारे धागे झाले आहेत माझे, की ते मोजणे देखील आज मला वेस्ट ऑफ टाईम वाटतेय. कारण ................................................ आणि म्हणूनच तुम्हा सर्वांचा धन्यवाद<<
ह्यातच सगळे आले, तु थोडक्यात गोषावारा मांडलास की, काही धाग्यांमुळे निव्वळ "वेस्ट ऑफ टाईम" झाले पण प्रतिसादांमुळे तुला ज्ञान मिळाले, निखळ मनोरंजन झाले...साला लाईफ में भी तो येही फंडा है! वेस्ट ऑफ टाईम होने के बावजुद भी कुछ अच्छी बातें हम लोग सिख ही लेते है उस वेस्ट हुए टाईम से....बाकी नवनवीन धाग्यांसाठी आलेस गुटं ! म्हणजे जर्मन भाषेत All the Best !!

बादवे राज, >>आमच्याकडुन सप्रेम फुल न फुलाची पाकळी...<< आवरा !!!!...ती बया अक्खी गोबी का फुल है, और आप उसे पाकळी कह रहे हो...ये तौहीन है सई की ! Lol Lol
ऋन्मेऽऽष...तुला दिवे बरं का !! Happy

बरेच दिवसांनी मायबोलीवर आलो उत्सुकतेने नवीन धागे पाहिले, त्यातील बरेचसे स्वजो, शाखा आणि गफ्रे चे पाहून जीव पिळवटून गेला. तशीच भावना आली जशी या धाग्याच्या लेखकाला प्रोग्राम परत लिहिताना, ट्रेन चुकल्यावर, सुट्टी वाया गेल्यावर आली.

अरे वा 'ऋन्मेऽऽष' या आय डी ने एक वर्ष पुर्ण केले. Happy

.....वर्ष अखेरीस त्या वाया गेलेल्या वर्षाची भरपाई करण्यासाठी परीक्षा न देता गॅप घेतली आणि आणखी एक वर्ष अभ्यास करून पुढच्या वर्षी ती परीक्षा दिली.>> हे वाक्य अजून एका आय डी ने लिहिलेले आठवले. Happy

वादिहाशु Happy

सगळ्यात पहिला किस्सा हा वेस्ट ऑफ टाइम नाहिये हा.
आपल्याला रोजी रोटी मिळते.
रिसेशनच्या काळात अशा वाढिव इन्पुटवर तगुन जातो माणुस. Lol

ही गाडी आपल्या गावाला जात नाही याची खात्री असूनही लोक त्या गाडीत बसतात आणि मग माझा वेळ वाया गेला म्हणून करवादतात याची गंमत वाटते. आपण बसलो नाही, तर ती गाडी फलाटावरून हलून हवी असलेली गाडी येणार नाही असं काही आहे का? माबोवर तर हव्वे तितके फलाट आहेत. चुकीच्या गाडीत बसण्यापेक्षा योग्य गाडीचा फलाट शोधण्यात थोडा वेळ 'इन्व्हेस्ट' करायचा. Wink

उगा लेखाची भरताड करून वाढदिवस साजरे करणे आणि चौकाचौकात फलक लावणे यात फरक तो काय? लिखाण चांगले असेल तर कौतुक आहे पण उगाच रुमाल कुठला घ्यावा, दारू कुठली प्यावी व तत्सम लेखाचे रतीब लावू नयेत.

वेळ कशात इन्वेस्ट करावा हे माबो वर लेख पाडून विचारायची वेळ अजून आली नाही.

अरे व्वा... बघता बघता न थकता वर्षाचा झालास की तू... गुड्ड.

>>>> कारण आज मला मायबोलीवर संपूर्ण एक वर्ष होत आहे.. <<<<
हे वर्ष वाया गेले असा धागा काढायचा विचार आहे का? इथेच काढशील का कुठे मिपा/मनोगत/ऐअ वगैरे जागी? Proud

भरत, नरेन, अहो पण वेळ ही काय इन्व्हेस्ट करायची गोष्ट आहे का?
त्यावर व्याज म्हणून अधिकची वेळ मिळते का? केल्या जास्तवेळच्या कामाबद्दल सीऑफ मिळतो, पण तो व्याज स्वरुपात नसतो. अन मिळालेल्या सीऑफची इन्व्हेस्टमेंट कशी करावी हा परत प्रश्न आहेच.
मायबोलीवरील जाणकार गुंतवणूक अर्थतज्ञच यावर भाष्य करू शकतील.

मला तरी वाटते की वेळ केवळ सत्कारणी लावावा अन गेल्या वेळेचे दु:ख करू नये. आता हेच बघा ना की मी भाजी फोडणीस टाकत होतो अन तेव्हाच टीव्हीवरील सायकल रेस बघु लागलो अन फोडणी करपली. मग मी सरळ करपलेली फोडणी टाकून देऊन नविन फोडणी केली अन छानपैकी जेवलो.

एक मात्र खर हं ऋन्मेषा, तुझ्या इतक्या धाग्यांनी व त्यावरील प्रतिसादांनी सगळ्यांनी मिळून माझा बीमोड केलाय! Proud

...वर्ष अखेरीस त्या वाया गेलेल्या वर्षाची भरपाई करण्यासाठी परीक्षा न देता गॅप घेतली आणि आणखी एक वर्ष अभ्यास करून पुढच्या वर्षी ती परीक्षा दिली.>> हे वाक्य अजून एका आय डी ने लिहिलेले आठवले.>>
मी पण हे एका लेखात वाचलेय.. बहुधा 'तुमचा अभिषेक' या आयडीच्या. Happy

पहिल्या माबोवाढदिवसाच्या शुभेच्छा!

लिम्बुजी, तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे.
खरच वेळ सत्कारणी लावला पाहिजे, नाहीतर असे ओढून ताणून वाढदिवस साजरे करायची वेळ येते.

शुभेच्छा प्रथम घ्या.

""साल्ली चार दिन कि झिंदगानी; उससे भी कम ये जवानी; कितीतरी अशीच फुकट जाते. ज्यात पैसा आणि श्रम फुकट"---या वाक्यावर पहिलाच प्रतिसाद सिंडरेलाचा. मला वाटलं साल्ली चिडली कि काय पण तसा काहीच अर्थ काढला नव्हता.

तो रुमालाचा धागा एक उत्तम ललित लेखन होतं परंतू बय्राच मायबोलीकरांना समजलंच नाही.मग "संपादक मंडळ यांना हाकला वगैरे गिल्ला केलेला आता ऋन्मेssषच्या लेखाची वाट पाहतात.

कारण आज मला मायबोलीवर संपूर्ण एक वर्ष होत आहे..
म्हणजे तुमचे अख्खे एक वर्ष फुकट गेले.
( माफ करा, मला तसे तुमच्या सारखे मराठीत इंग्रजी घुसडून लिहीता येत नाही, मराठी शब्दच आधी आठवतात. वाटल्यास अशिक्षित आहे असे म्हणा)
काय मिळाले इथे येऊन? चार पाच शिव्या, टिंगल नि काही अत्यंत निरर्थक अश्या गप्पा ज्याला इथे चर्चा म्हणतात. म्हणजे तो हि वेळ वायाच गेला, त्यापेक्षा आनंद, ज्ञान मिळेल असे काही केले असते तर?

ही मायबोली म्हणजे माझ्या सारख्या सेवा निवृत्त होऊन घरी बसलेल्या लोकांसाठी पर्वतीचा पायथा आहे. फुकट येऊन बसायचे नि उगाच वाट्टेल ते विषयावर वाट्टेल ते लिहायचे.

जसे पैसे गुंतवून त्यातून व्याज मिळते तसे वेळ गुंतवून जास्तीचा वेळ मिळत नाही, पण जसे पुजेची पूर्ण तयारी करण्यात थोडा वेळ खर्चला, तर पूजा करताना ऐनवेळी, अहो, हळद संपली आहे, कापूर कुठे आहे? नैवेद्याची वेळ झाल्या वर मग शिर्‍याच्या पदार्थांची शोधाशोध करून शिरा करायला लागायचे नि मग तोपर्यंत भटजी बुवांना पुढल्या पूजेला जायला उशीर करायचा असे प्रसंग घडलेले आहेत.
याचा अर्थ, आधी वेळ गुंतवला असता तर नंतरचा बराच वेळ वाचला असता, दुसर्‍या ठिकाणी पूजेला जाण्यापूर्वी क्षणिक विश्रांति मिळाली तर तो वेळ व्याज मिळाल्या सारखाच.

"ही मायबोली म्हणजे माझ्या सारख्या सेवा निवृत्त होऊन घरी बसलेल्या लोकांसाठी पर्वतीचा पायथा आहे. फुकट येऊन बसायचे नि उगाच वाट्टेल ते विषयावर वाट्टेल ते लिहायचे."----
मी हा प्रकार करून पाहिला ( जवळच्या बागेत )परंतू कोणी ऐकून नाही घेत.इकडे बरं आहे.चांगला प्रतिसाद वाचून दाद देतात आणि चांगला नसला तर दुर्लक्ष करतात -वय झालं आहे यांचं म्हणून.

Pages